कशी केली ओंकारने प्राध्यापकाची हत्या ? पोलिसांना दिली माहिती

मुंबई : मालाड स्टेशनवर शनिवारी रात्री प्राध्यापक आलोक सिंह यांची हत्या झाली. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी ओंकार शिंदे (२७) याला अटक केली आहे. ट्रेनमधून उतरताना धक्का लागल्यावरुन वाद झाला आणि ओंकारने प्राध्यापक आलोक सिंह यांची हत्या केली. पोलिसांनी प्राध्यापकाच्या हत्येप्रकरणी सीसीटीव्ही फूटेजच्या मदतीने आरोपीचा शोध घेतला आणि त्याला अटक केली. सध्या आरोपीची बोरिवली पोलीस ठाण्यात चौकशी सुरू आहे.



हत्या केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरुन पळून गेला होता. पोलिसांनी आरोपीला शोधून अटक केली. फक्त ट्रेनमधून उतरताना धक्का लागला म्हणून ओंकारने हत्या केली की या हत्येमागे वेगळे कारण आहे याचा तपास पोलीस करत आहेत. पोलिसांच्या प्रश्नांना उत्तरं देताना आरोपी ओंकारने धक्कादायक माहिती दिली आहे. प्राध्यापकाची हत्या कशा प्रकारे केली याची सविस्तर माहितीच ओंकारने पोलिसांना दिली आहे.



ओंकारने चाकूने नाही तर चिमट्याने केली हत्या


प्राध्यापक आलोक सिंह आणि ओंकार शिंदे हे योगायोगाने एकाच लोकमधून प्रवास करत होते. ट्रेनमधून उतरण्याच्यावेळी चुकून धक्का लागण्याचे निमित्त झाले. ओंकार आणि आलोक सिंह यांच्यात धक्का लागण्यावरुन वाद झाला. वाद वाढला आणि ओंकारने लोकल मालाड स्टेशनजवळ असताना स्वतःकडे असलेल्या टोकदार हत्याराने आलोक यांच्यावर एकच जीवघेणा वार केला. हा वार इतका भयंकर होता की अलोक यांच्या पोटातून रक्ताची धार सुटली. हल्ला झाल्यानंतर त्यांनी स्वत:ला सावरत कसा बसा प्लॅटफॉर्म गाठला. ते तेथील बाकड्यावर जाऊन बसले. पण मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने अलोक यांचा जागीच मृत्यू झाला.


ओंकारने आलोक यांच्या पोटात एक टोकदार वस्तू जोरात खुपसली. या जोरात झालेल्या आघातामुळे गंभीर जखमी झालेल्या आलोक यांचा प्रचंड रक्तस्राव झाल्यामुळे थोड्याच वेळात मृत्यू झाला. या प्रकरणात आरोपी ओंकार विरोधात पोलीस कारवाई सुरू आहे. ओंकारवर पोलिसांनी प्राध्यापक आलोक सिंह यांच्या हत्येचा आरोप ठेवला आहे.



ओंकारने कुठुन आणला चिमटा ?


ओंकार शिंदे दक्षिण मुंबईतील खेतवाडी परिसरातील एका कारखान्यात नोकरी करतो. त्याच्याकडे हिरेजडित वस्तू हाताळण्यासाठी वापरण्यात येणारा लोखंडी टोकदार चिमटा होता. या चिमट्याचा वापर करुन ओंकारने प्राध्यापक आलोक सिंह यांच्या पोटात जोरदार वार केला. चिमटा टोकदार होता आणि तो वेगाने तो पोटात खोलवर घुसला. यामुळे पोटातून भळाभळा रक्त वाहू लागले आणि थोड्याच वेळात आलोक यांचा मृत्यू झाला.



कोण होते प्राध्यापक आलोक सिंह ?


नरसी मोनजी कॉलेज, विलेपार्ले येथे २०२४ पासून कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना शिकवत होते. स्वभावाने शांत, दयाळू आणि सभ्य होते.वाद करणे, म्हणणे पटवून देण्यासाठी युक्तिवाद करत बसणे असा आलोक यांचा स्वभाव नव्हता. ते साधे होते आणि कोणावरही कधी संतापत नव्हते; अशी माहिती त्यांना ओळखणाऱ्यांनी दिली आहे.


आलोक सिंह शनिवार २४ जानेवारी २०२६ रोजी रात्री विलेपार्ले स्टेशनवरुन बोरिवलीला जाणाऱ्या ट्रेनमध्ये बसले. मालाड स्टेशनवर आलोक यांची हत्या झाली.


आलोक यांचे काकाही प्राध्यापक होते. जेमतेम दोन वर्षांपूर्वी आलोक यांचे लग्न झाले होते. पण शनिवारी घडलेल्या घटनेमुळे आलोक यांच्या नातलगांना जबर धक्का बसला आहे.

Comments
Add Comment

अवघ्या १० षटकांत किवींचा उडवला धुव्वा, सूर्या-अभिषेकच्या वादळी खेळीने मालिका खिशात

गुवाहाटी  : भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात क्रिकेट विश्वाला अचंबित करणारा विजय

संजीवनी सैनिकी स्कूल राष्ट्रीय ब्रास बॅण्ड स्पर्धेत देशात प्रथम

कोपरगाव : ७७ व्या प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्ली येथील नॅशनल बाल भवन येथे भारत सरकारच्या संरक्षण

पंचम' डिजिटल चॅटबॉट लाँच, घरबसल्या मोबाईलवर ग्रामपंचायतीशी संबंधित कामे मार्गी लागणार

नवी दिल्ली : गावांमधील प्रशासकीय कामे अधिक सुलभ आणि पारदर्शक करण्यासाठी केंद्रीय पंचायती राज मंत्रालयाने

चीनसोबत करार केल्यास कॅनडावर १०० टक्के टॅरिफ लावणार: ट्रम्प

वॉशिंग्टन :अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडाला कडक इशारा देत सांगितले आहे की, कॅनडाने जर

तामिळनाडूमध्ये हिंदीवर बंदीच राहणार, मुख्यमंत्री स्टॅलिनचा केंद्राला स्पष्ट इशारा

चेन्नई : तामिळनाडूमध्ये हिंदी लादण्यास कुठलेही स्थान नाही आणि कधीही होणार नाही, असे तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि

तेजस्वी यादव आरजेडीचे कार्यकारी अध्यक्ष

पाटणा: पाटणा येथे झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत राष्ट्रीय जनता दलाने मोठा निर्णय घेतला असून