Rajya Sabha : राज्यसभेसाठी भाजपकडून 'सोशल इंजिनिअरिंग'; विनोद तावडे, आठवलेंसह दोन नव्या चेहऱ्यांना संधी

मुंबई : बहुचर्चित राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपने बुधवारी उमेदवारांची घोषणा केली असून, नेहमीप्रमाणे यंदाही 'धक्कातंत्रा'चा अवलंब केला आहे. पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले या दिग्गज नेत्यांसोबतच, भाजपने माया ईवनाते आणि रामराव वडकुते या दोन नव्या चेहऱ्यांना संधी देऊन सामाजिक समीकरणे साधण्याचा प्रयत्न केला आहे.


भाजपने यंदा उमेदवारी देताना राज्यातील महत्त्वाच्या समाजघटकांना प्रतिनिधीत्व दिले आहे. नागपूरच्या माजी महापौर राहिलेल्या माया इवनाते या भाजपचा राज्यातील महत्त्वाचा आदिवासी चेहरा आहेत. त्या अनुसूचित जमाती राष्ट्रीय आयोगाच्या सदस्या होत्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख असून, त्यांच्या निवडीतून भाजपने विदर्भातील आदिवासी मतांचे समीकरण साधले आहे.


धनगर समाजाचे प्रतिनिधित्व करणारे रामराव वडकुते यांनी अहिल्यादेवी होळकर शेळी-मेंढी विकास महामंडळाचे अध्यक्ष म्हणून दीर्घकाळ काम केले आहे. विधान परिषदेचा अनुभव गाठीशी असलेल्या वडकुते यांच्या रूपाने भाजपने पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील धनगर समाजाला साद घातली आहे.





विनोद तावडे पुन्हा संसदीय राजकारणात:


पक्षाच्या राष्ट्रीय राजकारणात महत्त्वाची भूमिका निभावणारे विनोद तावडे यांना अपेक्षेप्रमाणे राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय झाला आहे. तर, मित्रपक्ष असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले) प्रमुख रामदास आठवले यांच्यावर भाजपने पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे. राज्यातील विधानसभेच्या सध्याच्या संख्याबळानुसार, राज्यसभेच्या सात जागांपैकी भाजपचे चार उमेदवार सहज निवडून येऊ शकतात. उर्वरित जागांवर शिवसेनेच्या वतीने माजी खासदार राहुल शेवाळे यांचे नाव जवळपास निश्चित मानले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून पार्थ पवार गुरुवारी अर्ज दाखल करतील.



महाविकास आघाडीची कोंडी?


दुसरीकडे, महाविकास आघाडीकडे असलेल्या संख्याबळानुसार त्यांची केवळ एक जागा निवडून येऊ शकते. मात्र, या जागेवर शरद पवार गट, काँग्रेस की उबाठा गट आपला उमेदवार देणार, याबाबत अद्याप एकमत झालेले नाही. दरम्यान, भाजपने आपल्या उमेदवारांच्या माध्यमातून मराठा, दलित, आदिवासी आणि धनगर अशा सर्वच समाजघटकांना सामावून घेण्याचा प्रयत्न केल्याने, ही निवडणूक केवळ औपचारिकता उरते की काही वेगळे वळण घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Comments
Add Comment

US Military Plane : अमेरिकेचं लष्करी विमान थेट रशियात उतरलं; मॉस्कोतील लँडिंगने खळबळ

मॉस्को : रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि रशियामधील संबंध अत्यंत संवेदनशील असताना,

BWF world rankings : बीडब्ल्यूएफ जागतिक क्रमवारीत त्रिशा आणि गायत्रीची मोठी झेप

नवी दिल्ली : नुकत्याच झालेल्या बॅडमिंटन विश्वचॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकल्यानंतर, भारतीय महिला दुहेरी

Arun Datte : गुरुत्वाकर्षणालाही चकवणारी कला!

मूर्तिकार अरुण दत्ते या वर्षी काय नवा 'बॅलन्स' साधणार ? मुंबई : गणेशोत्सवाचे वेध सर्वत्र लागले असून यंदाच्या

Rahul Dravid : टीम इंडियाला डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरीत पोहोचण्याची संधी, पण मार्ग खडतर - राहुल द्रविड

नवी दिल्ली : भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचे मत आहे की, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (डब्ल्यूटीसी)

Xi Jinping : ब्रिक्स परिषदेसाठी शी जिनपिंग भारत दौऱ्यावर येण्याची शक्यता; ४०० लोकांचे शिष्टमंडळही येणार

बीजिंग : पुढील महिन्यात दिल्लीत होणाऱ्या ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी

PA's daughter : रोहित पवारांच्या PAच्या मुलीचा मृत्यू; पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती

बारामती : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांचे स्वीय सहाय्यक अजित दशावतारे