अवघ्या १० षटकांत किवींचा उडवला धुव्वा, सूर्या-अभिषेकच्या वादळी खेळीने मालिका खिशात

गुवाहाटी  : भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात क्रिकेट विश्वाला अचंबित करणारा विजय नोंदवला आहे. सूर्यकुमार यादव आणि अभिषेक शर्मा यांच्या तुफानी फटकेबाजीच्या जोरावर भारताने केवळ १० षटकांत विजयाचे लक्ष्य गाठून मालिका आपल्या नावावर केली. भारताने या सामन्यात पॉवरप्लेमध्ये धावांचा पाऊस पाडत ऑस्ट्रेलियाचा ८ वर्ष जुना जागतिक विक्रमही मोडीत काढला.


नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा भारताचा निर्णय गोलंदाजांनी सार्थ ठरवला. जसप्रीत बुमराहच्या (३ विकेट्स) भेदक माऱ्यासमोर किवी फलंदाजांनी गुडघे टेकले. ग्लेन फिलिप्स (४८) आणि मार्क चॅपमन (३२) यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला, पण हार्दिक पांड्या आणि रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी २ बळी घेत न्यूझीलंडला ९ बाद १५३ धावांवर रोखले. १५४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात धक्कादायक झाली. संजू सॅमसन पहिल्याच चेंडूवर बाद झाला. मात्र, त्यानंतर इशान किशन (२८ धावा, १३ चेंडू) आणि अभिषेक शर्मा यांनी १९ चेंडूंत ५३ धावांची वेगवान भागीदारी करत न्यूझीलंडच्या गोलंदाजीच्या चिंधड्या उडवल्या. इशान बाद झाल्यानंतर आलेल्या सूर्यकुमार यादवने अभिषेक शर्माच्या साथीने केवळ ४० चेंडूंत १०२ धावांची नाबाद भागीदारी केली.


भारताने पहिल्या ६ षटकांत २ बाद ९४ धावा कुटल्या. ही भारताची पॉवरप्लेमधील दुसरी सर्वोत्तम आणि न्यूझीलंडविरुद्धची सर्वोच्च धावसंख्या ठरली. भारताने २०१८ मधील ऑकलंड येथे ऑस्ट्रेलियाने केलेल्या ९१ धावांचा विक्रम मोडला. अभिषेक शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांनी आपली वादळी अर्धशतके पूर्ण करत १० व्या षटकांतच भारताला विजय मिळवून दिला. भारताच्या या 'विराट' विजयामुळे न्यूझीलंडचा संघ पूर्णपणे बॅकफूटवर गेला असून भारतीय युवा संघाच्या या आक्रमक शैलीचे जगभर कौतुक होत आहे.

रोहित शर्माचा मोडला विक्रम


अभिषेक शर्माने न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात तिसरा षटकार मारताच रोहित शर्माचा मोठा विक्रमही मोडीत काढला. याआधी न्यूझीलंड विरुद्धच्या द्विपक्षीय टी-२० मालिकेत सर्वाधिक १० षटकारांचा विक्रम हा रोहित शर्माच्या नावे होता. अभिषेक शर्माने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या दोन सामन्यात ८ षटकार मारले होते. तिसऱ्या टी-२० सामन्यात त्याने रोहित शर्माला मागे टाकत न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत सिक्सर किंग होण्याचा नवा रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे.

Comments
Add Comment

IND vs ZIM 2nd T20 : मालिकेवर वर्चस्वासाठी टीम इंडिया सज्ज! वैभव सूर्यवंशीवर नजर, श्रेयस अय्यरसमोर वर्ल्ड रेकॉर्डची संधी

मुंबई : भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसरा सामना आज (२५ जुलै) हरारे स्पोर्ट्स

Commonwealth Games 2026 : भारताने पदाकाचे खाते उघडले, झंडू कुमारला पॅरा पॉवरलिफ्टिंगमध्ये कांस्यपदक

ग्लासगो : भारताने २०२६ च्या राष्ट्रकुल खेळांच्या दुसऱ्या दिवसाचा शेवट एका पदकासह आणि अनेक दमदार कामगिरींसह

ISSF World Cup : आयएसएसएफ विश्वचषक: सैन्यमने १० मीटर एअर पिस्तूलमध्ये पटकावले रौप्यपदक

नवी दिल्ली : भारताची नेमबाज सैन्यम हिने चीनमधील हांगझोउ येथे सुरू असलेल्या आयएसएसएफ विश्वचषक

Judoka Tulika Maan : ज्युदोपटू तुलिका मानचे 'नाडा'कडून तात्पुरते निलंबन

नवी दिल्ली : भारताची आघाडीची ज्युदोपटू तुलिका मान हिला 'नाडा'च्या (National Anti-Doping Agency

FIDE Interim President : विश्वनाथन आनंद फिडेचे हंगामी अध्यक्ष

नवी दिल्ली : रशिया-युक्रेन युद्धाशी संबंधित युरोपियन युनियनच्या प्रतिबंधांच्या यादीत विद्यमान अध्यक्ष आर्काडी

Asian Cup Schedule 2026 : एशियन गेम्स २०२६ चे वेळेपत्रक जाहीर, भारत-पाकिस्तान सामना कधी होणार ?

मुंबई : एशियन गेम्स २०२६ क्रिकेट स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. एशियन गेम्स २०२६ क्रिकेट स्पर्धा