बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीनिमित्त राज्यभरात समाजोपयोगी उपक्रम

शिवसेनेचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा


‘आरोग्य आपल्या दारी’, गडकोट स्वच्छता, मराठी भाषा संवर्धनाची मोहीम


मुंबई : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त शिवसेनेकडून ‘आरोग्य आपल्या दारी’, गडकोट स्वच्छता मोहीम, ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागरी लोककल्याण अभियान’ यांसह अनेक लोकोपयोगी उपक्रमांची घोषणा शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी केली. बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी मंत्री प्रताप सरनाईक, मंत्री उदय सामंत, विधान परिषद उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम, शिवसेना सरचिटणीस राहुल शेवाळे, उपनेत्या शीतल म्हात्रे व इतर प्रमुख नेते उपस्थित होते.


उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीनिमित्त मुंबई महापालिकेच्या वतीने ‘बाळासाहेब ठाकरे आरोग्य आपल्या दारी’ अभियानाच्या माध्यमातून घरोघरी आरोग्य तपासणी मोहीम सुरू केली जाईल. सुरुवातीला मुंबईत आणि त्यानंतर उर्वरित महाराष्ट्रात हे अभियान राबवू, अशी माहिती उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिली. मुंबई महापालिका रुग्णालयांमध्ये रुग्णांना झीरो प्रिस्क्रिप्शन आणि कॅशलेस सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. प्रदूषण नियामक मंडळाच्या माध्यमातून राज्यात ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे गडकोट किल्ले स्वच्छता मोहीम’ राबवली जाणार आहे. या गडकोटांवर आरओ फिल्टर बसवले जातील, तसेच प्लास्टिक मुक्त गडकोट किल्ले अशी मोहीम हाती घेतली जाणार आहे. युनेस्कोने समावेश केलेल्या जागतिक वारसा यादीतील ११ किल्ल्यांपासून ही मोहीम सुरू होईल. यात सहभागी होणाऱ्या शिवभक्तांना आणि संस्थांना १ लाख रुपये मानधन दिले जाणार आहे.


ते पुढे म्हणाले की, आरोग्य, शिक्षण याबरोबरच ज्येष्ठांसाठी एसटी संगे तीर्थाटन योजना, महिला बचत गटांच्या सक्षमीकरणासाठी १०० कोटी, मराठी भाषा संवर्धनासाठी १०० कोटी, रस्ता सुरक्षा मोहिमेसाठी १०० कोटींची तरतूद केली आहे. तसेच १० हजार विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे धडे, शालेय शिक्षण विभागाकडून निबंध, वक्तृत्व, चित्रकला, व्यंगचित्रकला स्पर्धांचे आयोजन केले जाईल. झोपडपट्टीमुक्त मुंबईचे बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हाडा, सिडको, एमएमआरडीए यांसारख्या संस्थांच्या माध्यमातून काम सुरू झाले आहे. ४० लाख मुंबईकरांना हक्काचे घर देणार आहोत, असे ते म्हणाले.


राज्यातील २९ महापालिका आणि ३९४ नगर परिषदांमध्ये ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागरी लोककल्याण अभियान’ राबवले जाणार आहे. यासाठी नगर परिषदांना १ कोटी आणि महापालिकांना ३ कोटींचा निधी दिला जाईल, यासाठी नगर विकास खात्याकडून ५३९ कोटींची तरतूद करण्यात आली आहे, असे ते म्हणाले.

Comments
Add Comment

मुंबई मेट्रोच्या वेळापत्रकात ८ एप्रिलपासून बदल; लाईन ९ व २ बी सेवेत, प्रवाशांसाठी अधिक सुलभ व जलद सेवा

मुंबई: मुंबई महानगर प्रदेशातील मेट्रो जाळ्याच्या विस्ताराच्या पार्श्वभूमीवर, मुंबई महानगर प्रदेश विकास

Sunetra Pawar: 'बारामती हा केवळ मतदारसंघ नसून दादांचा श्वास होता आणि त्या श्वासाशी नाळ जुळलेली प्रत्येक व्यक्ती माझ्यासाठी महत्त्वाची'

बारामती: बारामती हा केवळ मतदारसंघ नसून दादांचा श्वास होता आणि त्या श्वासाशी नाळ जुळलेली प्रत्येक व्यक्ती

Chandrashekhar Bawankule: अजित दादांची सावली आता बारामतीत सुनेत्रा माऊली; बावनकुळेंनी जागवल्या ३२ वर्षांच्या ऋणानुबंधांच्या आठवणी

बारामती: "ज्यांच्या शब्दाला महाराष्ट्राच्या राजकारणात चांद्यापासून बांद्यापर्यंत वजन होतं, ज्यांनी उभं आयुष्य

मुंबईतील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीमध्ये रंगणार चित्रपट महोत्सव

मुंबई: राज्य शासनाचा अधिकृत ‘चित्रपताका’ चित्रपट महोत्सव यंदा १२ ते १५ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत पु. ल. देशपांडे

Goregaon News : गोरेगावात शोभायात्रेदरम्यान दोन गट भिडले; पोलिसांचा लाठीचार्ज, ८ जणांना अटक

मुंबई : काल गोरेगाव पूर्व येथील संतोष नगर परिसरात शोभायात्रेदरम्यान दोन गटांमध्ये अचानक उसळलेल्या वादाने हिंसक

उपनगरांचा 'वेग' वाढणार!

 'मेट्रो ९' आणि '२-बी'चे लोकार्पण; ठाणे-बोरिवली अंतर आता काही मिनिटांवर मुंबई : मुंबईच्या दळणवळण व्यवस्थेचा