पहिला महापौर करण्याची संधी मनसेने गमावली!

शिवसेनेऐवजी भाजपबरोबर गेले असते तर... राजकीय चर्चांना वेग


कल्याण/ डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत मनसेने पहिला महापौर करण्याची सुवर्णसंधी गमावल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. महापौरपदाचे आरक्षण जाहीर होण्यापूर्वीच शिवसेनेसोबत युती करण्याची घाई मनसेला महागात पडल्याचे बोलले जात आहे. महापौर आरक्षण सोडतीनंतर महापौरपद अनुसूचित जमातीसाठी (एसटी) राखीव झाले.


आरक्षणापूर्वीच मनसेने भाजप-शिवसेनेच्या रस्सीखेचीत शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा देत स्वतंत्र गट स्थापन केला. गट स्थापनेपूर्वीच मनसेने महापौरपदाचा ठोस शब्द घेतला असता आज मनसेचा पहिला महापौर होण्याची संधी प्रत्यक्षात येऊ शकली असती, अशी चर्चा आहे. एसटी प्रवर्गातून केवळ तीन नगरसेवक विजयी झाले त्यापैकी दोन शिवसेनेकडून तर एक मनसेकडून निवडून आला आहे. मनसेच्या शीतल मंढारी या एसटी आरक्षित जागेवरून विजयी झाल्याने मनसेकडे महापौरपदाची संधी निर्माण झाली असती. किरण भांगले हे शिवसेना दे गटाचे नवनिर्वाचित नगरसेवक असून त्यांनी प्रथमच निवडणूक लढवली आहे. तर हर्षाली थवील या अनुभवी नगरसेविका असून पालिकेच्या कामकाजाचा त्यांना मोठा अनुभव आहे. महिला महापौर म्हणून त्यांना संधी दिली जाणार का, याकडेही लक्ष लागले आहे.


कल्याणला महापौरपदाची शक्यता :
मागील टर्ममध्ये डोंबिवलीला महापौरपदाची संधी मिळाली. यंदा पुन्हा तीच संधी मिळणार का अशी चर्चा होती. डोंबिवलीतून एकही एसटी प्रवर्गातील नगरसेवक नसल्याने महापौरपदाची संधी कल्याणकडे झुकली. दोन महिला आणि एक पुरुष नगरसेवक असल्याने उत्सुकता शिगेला आहे.

Comments
Add Comment

MHADA Thane : ठाण्यात म्हाडाची घरं आता स्वस्त! ४४ ते ४६ लाखांत मिळणार सदनिका; नव्याने निघणार लॉटरी

ठाण्यातील चितळसर-मानपाडा येथील म्हाडाच्या गृहप्रकल्पातील घरांच्या किमती आता कमी होणार आहेत. उपमुख्यमंत्री

Dog bite incident in Kalyan : कल्याणमध्ये एकाच पिसाळलेल्या भटक्या श्वानाचा धुमाकूळ; अवघ्या सात तासांत तब्बल १३० जणांना घेतला चावा

कल्याण : कल्याण पश्चिमेतील बिर्ला महाविद्यालय परिसरातील संदीप हाॅटेल भागात रविवारी दुपारपासून एका पिसाळलेल्या

Dombivli Barvi Dam : कल्याण - डोंबिवलीकरांसाठी आनंदाची बातमी, बारवी धरण ९९.८८ टक्के भरले

डोंबिवली : कल्याण - डोंबिवलीसह ठाणे जिल्ह्यातील मोठ्या भागाची तहान भागविणारे बारवी धरण ९९.८८

Vinayak Raut : सुनेने केलेल्या कौटुंबिक छळ अन् अंधश्रद्धेच्या आरोपांवर सुनावणी; विनायक राऊतांना कोर्टाकडून अटकपूर्व जामीन

ठाणे : माजी खासदार आणि शिवसेना (UBT) नेते विनायक राऊत (Vinayak Raut) यांना ठाणे सत्र न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे.

'क्राइम पेट्रोल'मध्ये पोलिसाची भूमिका; पण खऱ्या आयुष्यात २५ लाखांचा गंडा! अभिनेत्यावर नक्की काय ओढावलं?

डोंबिवली : गुन्हेगारीच्या सत्य घटनांवर आधारित प्रसिद्ध टीव्ही मालिका 'क्राइम पेट्रोल'च्या (Crime Patrol) माध्यमातून

Kalyan News : कल्याणमध्ये वैद्यकीय निष्काळजीपणाचा संतापजनक प्रकार; रेबीजचे इंजेक्शन देताना चिमुरड्याच्या कमरेत अडकली तुटलेली सुई!

कल्याण: कल्याण पूर्व भागातून आरोग्याशी संबंधित एका अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे.