दावोसमध्ये महाराष्ट्राचे ३० लाख कोटींचे सामंजस्य करार

४० लाख रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट


मुंबई : दावोसमध्ये आयोजित वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये महाराष्ट्राने ३० लाख कोटी रुपयांचे गुंतवणूक करार केले असून, आणखी १० लाख कोटींच्या गुंतवणूक करारांची प्राथमिक बोलणी पूर्ण झाली असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांना दिली. यातून ४० लाख रोजगारनिर्मितीचे उद्दिष्ट साध्य होणार आहे असेही त्यांनी सांगितले.


या करारांपैकी ८३ टक्के करारांमध्ये थेट परकीय गुंतवणूक असून, एकूण १८ देशांमधून महाराष्ट्रात ही गुंतवणूक येते आहे. १६ टक्के गुंतवणूक ही परकीय तंत्रज्ञान भागिदारीत आहे. या १८ देशांमध्ये अमेरिका, इंग्लंड, सिंगापूर, जपान, स्वित्झर्लंड, स्वीडन, नेदरलँड, नॉर्वे, इटली, जर्मनी, फ्रान्स, ऑस्ट्रिया, युएई, स्पेन, कॅनडा, बेल्जियम इत्यादींचा समावेश आहे. औद्योगिक, सेवा, कृषी, तंत्रज्ञान अशा सर्वच क्षेत्रात ही गुंतवणूक येते आहे. सामंजस्य करार प्रत्यक्षात परावर्तित होण्याचा दर हा ७५ टक्के आहे. गेल्या वर्षीचे करार हे ७५ टक्के प्रत्यक्षात आलेले आहेत, अशीही माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.


ही गुंतवणूक ३ ते ७ वर्षांत परावर्तित होत असते, असे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, एसबीजी, ब्रुकफिल्ड, आर्सेलर मित्तल, फिनमन ग्लोबल, इस्सार, स्कोडा ऑटो, फॉक्सवेगन, एसटीटी टेलिमीडिया, टाटा, अदानी, रिलायन्स, जेबीएल, कोकाकोला, बॉश, कॅपिटल लँड, आयर्न माऊंटेन अशा अनेक कंपन्यांशी हे करार झालेले आहेत. काही समूह हे भारतीय असले तरी त्यांची सुमारे १६५ देशांमध्ये गुंतवणूक आहे. क्वांटम काम्प्युटिंग, एआय, जीसीसी, डेटा सेंटर्स, आरोग्य, अन्न प्रक्रिया, ग्रीन स्टील, नगरविकास, जहाजनिर्माण, फिनटेक, लॉजिस्टीक, डिजिटल इन्फ्रा अशा सर्वच क्षेत्रात ही गुंतवणूक आली आहे.


देशातील पहिली इनोव्हेशन सिटी : टाटांसोबत देशातील पहिली इनोव्हेशन सिटी मुंबईजवळ तयार करणार आहोत, येणाऱ्या ६ ते ८ महिन्यात याचे सविस्तर नियोजन होईल. ही संकल्पना गेल्याच वर्षी दावोसमध्ये आली होती. टाटा सन्सचे एन. चंद्रशेखरन यांच्यासोबत याबाबत चर्चा झाली. यासाठी १ लाख कोटींहून अधिक गुंतवणूक टाटा करणार आहेत. इतरही अनेक देशातील गुंतवणूकदार यासाठी गुंतवणूक करणार आहेत, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.


मुंबईत सर्क्युलर इकॉनॉमीचा विकास : मुंबईत सर्क्युलर इकॉनॉमी तयार करणार असून मुंबईतील पाणी, हवा याचे प्रश्न यातून सोडविण्यात येतील. सर्व प्रकारच्या वेस्टवर प्रक्रिया झाली पाहिजे, हा प्रयत्न यातून करण्यात येणार आहे. पुढे हीच संकल्पना सर्व मोठ्या शहरांमध्ये नेण्यात येईल. मुंबईत पुढच्या 2 ते 3 वर्षात हा परिणाम आपण दाखवू शकू. रायगड-पेण ग्रोथ सेंटरची घोषणा याच दावोसमध्ये करण्यात आली. या ग्रोथ सेंटरमुळे एक बिझनेस डिस्ट्रीक्ट तयार होईल. यात 1 लाख कोटींची गुंतवणूक कालच आली आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

Comments
Add Comment

सलग सुट्ट्यांमुळे महामार्गांवर वाहतूक कोंडी; दृतगती मार्गासह, मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांचा खोळंबा

मुंबई : सलग सुट्ट्यामुळे रायगड जिल्ह्यातून जाणाऱ्या महामार्गांवर शनिवारी दिवसभर वाहतूक कोंडी निर्माण झाली

भिवंडीमध्ये मानवतेला काळीमा; कॅन्सरशी झुंज देणाऱ्या पत्नीवर हुंड्यासाठी ......, पतीसह सात आरोपींवर गुन्हा

भिवंडी : कर्करोगाच्या चौथ्या टप्प्यात उपचार सुरू असताना एका महिलेवर हुंड्याच्या हव्यासापोटी अमानुष छळ

Mumbai Vileparle : मुंबईकरांच्या पार्ले-जीचा सुगंध आता कायमचा हरवणार! ८७ वर्षांचा पार्ले-जीचा कारखाना होणार जमीनदोस्त; नेमकं कारण काय ?

मुंबई : मुंबईच्या विलेपार्ले (पूर्व) परिसरातील ज्या कारखान्यामुळे या उपनगराला एक वेगळी ओळख मिळाली, तो पार्ले

77th Republic Day : ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त, संविधानातील नियमांचा रोजच्या जीवनातील महत्व आणि ताकद जाणून घ्या

मुंबई : २६ जानेवारी हा दिवस भारताच्या लोकशाही प्रवासातील निर्णायक टप्पा मानला जातो. १९५० साली याच दिवशी भारतीय

युनेस्को दर्जाप्राप्त गडकिल्ल्यांची स्वच्छता आणि संवर्धन मोहीम

पर्यटन वाढीमुळे निर्माण झालेल्या कचऱ्यावर आळा मुंबई : युनेस्कोचा जागतिक वारसास्थळाचा दर्जा प्राप्त झालेल्या

प्रभाकर शिंदे ‘स्थायी’, तर खणकर सभागृह नेता?

मुंबई : मुंबई महापालिकेत भाजप-शिवसेना महायुतीचा महापौर बसणार हे आता जवळपास निश्चित झाले असून तसे झाल्यास सभागृह