पालकमंत्री नितेश राणे यांचा मनसेला जोरदार धक्का

वैभववाडी : वैभववाडी मनसे अध्यक्ष महेश कदम यांनी भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला. त्यांच्यासोबत मनसेच्या असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत कणकवली येथील ओम गणेश बंगला या ठिकाणी हा प्रवेश पार पडला. कदम यांच्या प्रवेशाने वैभववाडीतील मनसे पूर्णता खिळखिळी बनली आहे. मनसेसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.


प्रवेश करणाऱ्यांमध्ये मनसे कार्यकर्ते संजय चव्हाण, गणेश गुरव, चंदन पाटणे, बबन डकरे, राजेंद्र गुरव, संतोष गुरव, बबन शिंगरे, सुरेश कदम, शांताराम कोलते, अशोक कदम, अरुणा कोलते, अरुण कोलते अवनी कदम, राजन कदम, अमोल कोलते, वनिता लाड, सुगंधा पोवार, मनीषा मनवे आणि असंख्य कार्यकर्त्यांचा समावेश आहे.


महेश उर्फ भैय्या कदम हे करुळ गावचे आहेत. त्यांनी उपसरपंच म्हणून काम केले आहे. गावच्या सामाजिक क्षेत्रात त्यांचे योगदान आहे. शिवशभो संघटनेत कार्याध्यक्ष, वैभववाडी टेम्पो सघटनेत उपाध्यक्ष पदावर त्यांनी काम केले आहे. यावेळी वैभववाडी भाजपा मंडल अध्यक्ष सुधीर नकाशे, जिल्हा बँक माजी संचालक दिगंबर पाटील, शक्ती केंद्रप्रमुख प्रकाश सावंत, सरपंच नरेंद्र कोलते, बूथ अध्यक्ष दीपक लाड व पदाधिकारी उपस्थित होते.

Comments
Add Comment

पंजाबमध्ये प्रजासत्ताक दिनापूर्वी रेल्वे रुळावर स्फोट

अमृतसर : प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर पंजाबमधील सरहिंद रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे रुळावर स्फोट झाल्याची

“मुंब्रा को हरा बना देंगे” म्हणणाऱ्या सहर शेखचा माफीनामा

ठाणे : ‘कैसा हराया’ म्हणत मुंब्रा येथील ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षाच्या नवनिर्वाचित नगरसेवक

आयसीसीचा बांगलादेशला दणका, टी-२० विश्वचषकातून पत्ता कट, स्कॉटलंडचा प्रवेश

मुंबई  : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने अखेर बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या आडमुठ्या भूमिकेवर कठोर कारवाई केली

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीसाठी भारतीय संघाची घोषणा

हरमनप्रीत कौरकडे संघाची धुरा मुंबई (प्रतिनिधी) : महिला प्रीमियर लीग २०२६ स्पर्धा संपल्यानंतर भारतीय महिला संघ

T20I : गुवाहाटीत रविवारी भारत विरुद्ध न्यूझीलंड लढत, भारताला मालिका जिंकण्याची संधी

गुवाहाटी  : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील तिसरा महत्त्वपूर्ण सामना रविवारी

भारत पेट्रोलियमचा दमदार तिमाही निकाल नफ्यात ८९% वाढ 'इतका' लाभांशही जाहीर

मोहित सोमण: देशातील मोठी पीएसयु भारत पेट्रोलियम कंपनी लिमिटेडने आपला तिमाही निकाल जाहीर केला. एक्सचेंज