भाजपच्या खारेपाटण जि.प.उमेदवार प्राची इस्वालकर बिनविरोध

ठाकरे सेनेला आणखी धक्का


उबाठा सेनेच्या खारेपाटण जि. प. च्या उमेदवार मीनल तळगावकर यांनी घेतली माघार


कणकवली : तालुक्यात सुरू असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भाजपाकडून ठाकरे सेनेला सलग धक्के दिले जात आहेत. सलग दुसऱ्या दिवशी खारेपाटण जिल्हा परिषद मतदार संघातील ठाकरे सेनेच्या उमेदवार मीनल तळगावकर यांनी जिल्हा परिषद सदस्य पदाच्या निवडणूक रिंगणातून माघार घेतली. त्यामुळे या मतदार संघातील भाजपाच्या उमेदवार प्राची इस्वलकर या बिनविरोध निवडून आल्या आहेत.


या घडामोडींमुळे कणकवली तालुक्यात भाजपाकडून बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांची संख्या ३ झाली असून, कणकवली विधानसभा मतदारसंघात ही संख्या एकूण ४ पोहोचली आहे.


पालकमंत्री . नितेश राणे यांचे ‘दे धक्का तंत्र’ सध्या केवळ मतदार संघातच नव्हे, तर राज्यभरात चर्चेचा विषय ठरत आहे. मीनल तळगावकर यांच्या माघारीच्या निर्णयामुळे ठाकरे सेनेला हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.


विशेष म्हणजे शनिवार असूनही निवडणूक प्रक्रियेमुळे निवडणूक कार्यालय सुरू ठेवण्यात आले होते. दुपारी ३ वाजेपर्यंत आणखी कोण उमेदवार माघार घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. कालच या मतदार संघातील अपक्ष उमेदवार उज्ज्वला चिके यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला होता. त्यानंतर आज ठाकरे शिवसेनेच्या एकमेव विरोधी उमेदवार मीनल तळगावकर यांनीही माघार घेतल्याने प्राची इस्वलकर या या मतदार संघातील एकमेव उमेदवार राहिल्या. दरम्यान, ‘दे धक्का’ तंत्राचा मोठा फटका २७ जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी आणखी बसण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

Border 2 Movie Review : बॉक्स ऑफिसवर 'बॉर्डर २'चा! २९ वर्षांनंतरही सनी देओलचा तोच दरारा; चाहत्यांच्या थिएटरमध्ये शिट्ट्या आणि टाळ्या

मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रतिष्ठित युद्धावर आधारित चित्रपट 'बॉर्डर'चा वारसा २९ वर्षांनंतर

जिओ फायनांशियल सर्विसेसकडून आपली उपकंपनी जिओ अल्टरनेटिव इन्व्हेसमेंट मॅनेजर लिमिटेडची नोंदणी

मोहित सोमण: जिओ फायनान्स लिमिटेड (Jio Finance Limited) कंपनीने आज आपली संपूर्ण मालकीची असलेली जिओ अल्टरनेटिव इन्व्हेसमेंट

युएसला भारताकडून प्रजासत्ताक दिनी मिळणार मोठे व्यापारी चॅलेंज? 'मदर ऑफ ऑल ट्रेड' पुढील ४८ तासात मिळणार गूड न्यूज!

मोहित सोमण: पुढील ४८ तासांत भारत व ईयु (युरोपियन युनियन) यांच्यातील द्विपक्षीय करार म्हणजेच फ्री ट्रेड

भिवंडीमध्ये मानवतेला काळीमा; कॅन्सरशी झुंज देणाऱ्या पत्नीवर हुंड्यासाठी ......, पतीसह सात आरोपींवर गुन्हा

भिवंडी : कर्करोगाच्या चौथ्या टप्प्यात उपचार सुरू असताना एका महिलेवर हुंड्याच्या हव्यासापोटी अमानुष छळ

सरकारने आठव्या वेतन आयोगासाठी उद्या बोलावली तातडीची बैठक

प्रतिनिधी: एकीकडे आठव्या वेतन आयोगाची चर्चा जोरात असताना वेतन आयोगाच्या अहवालातील शिफारशी आयोग अध्यक्षा रंजना

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम शिखर परिषदेची दावोस येथे सांगता, सकारात्मक आंतरदेशीय संबंधावर विकास अवलंबून असल्याचे अधोरेखित

दावोस: जागतिक अर्थकारणात महत्वाचे स्थान ग्रहण करणाऱ्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या दावोस येथील परिषदेची अखेर