कोकणात भाजप फॉर्मात, जाणून घ्या बिनविरोध विजयी झालेल्या उमेदवारांची यादी

सिंधुदुर्ग : काही दिवसांपूर्वी राज्यात झालेल्या महापालिकांच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रातला सर्वात मोठा पक्ष असल्याचे दाखवून दिले. आता जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्येही भारतीय जनता पार्टीच फॉर्मात असल्याचे चित्र आहे. राज्यातील बारा जिल्हा परिषदा आणि या जिल्हा परिषदांतर्गत येणाऱ्या १२५ पंचायत समित्यांसाठी पाच फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. मतमोजणी सात फेब्रुवारी रोजी होणार आहे. पण मतदान होण्याआधीच महायुतीचे ११ उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. यात भाजपच्या दहा आणि शिवसेनेच्या एका उमेदवाराचा समावेश आहे.


सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत भाजप - शिवसेना महायुती निवडणूक लढवत आहे. तसेच सिंधुदुर्ग अंतर्गत कणकवली तालुका पंचायत समिती, देवगड तालुका पंचायत आणि वैभववाडी तालुका पंचायत समिती येथे महायुती निवडणूक लढवत आहे. आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार या निवडणुकांमध्ये मतदान होण्याआधीच महायुतीचे ११ उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत.



सिंधुदुर्ग जिल्हा परिषद



  1. खारेपाटण जि.प.उमेदवार; प्राची इस्वलकर(भाजप)

  2. जाणवली जिल्हा प.रुहिता राजेश तांबे (शिवसेना)

  3. पडेल जिल्हा प.(देवगड)सुयोगी रवींद्र घाडी (भाजप)

  4. बापर्डे जिल्हा प. (देवगड)अवनी अमोल तेली (भाजप)

  5. बांदा जिल्हा प. उमेदवार प्रमोद कामत (भाजप)


कणकवली तालुका पंचायत समिती



  1. बिडवाडी - संजना संतोष राणे (भाजप )

  2. वरवडे - सोनू सावंत (भाजपा)


देवगड तालुका पंचायत समिती



  1. पडेल –अंकुश यशवंत ठूकरूल (भाजप)

  2. नाडण –गणेश सदाशिव राणे (भाजप)

  3. बापर्डे – संजना संजय लाड (भाजप)


वैभववाडी तालुका पंचायत समिती



  1. कोकिसरे - साधना सुधीर नकाशे (भाजप)

Comments
Add Comment

पंजाबमध्ये प्रजासत्ताक दिनापूर्वी रेल्वे रुळावर स्फोट

अमृतसर : प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर पंजाबमधील सरहिंद रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे रुळावर स्फोट झाल्याची

“मुंब्रा को हरा बना देंगे” म्हणणाऱ्या सहर शेखचा माफीनामा

ठाणे : ‘कैसा हराया’ म्हणत मुंब्रा येथील ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षाच्या नवनिर्वाचित नगरसेवक

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी मंगळवारी सर्वपक्षीय बैठक

नवी दिल्ली : संसदेत आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी सरकारने राजकीय एकमत साधण्यासाठी तयारी सुरू केली आहे. बजेट

सलग सुट्ट्यांमुळे महामार्गांवर वाहतूक कोंडी; दृतगती मार्गासह, मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांचा खोळंबा

मुंबई : सलग सुट्ट्यामुळे रायगड जिल्ह्यातून जाणाऱ्या महामार्गांवर शनिवारी दिवसभर वाहतूक कोंडी निर्माण झाली

पालकमंत्री नितेश राणे यांचा मनसेला जोरदार धक्का

वैभववाडी : वैभववाडी मनसे अध्यक्ष महेश कदम यांनी भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला. त्यांच्यासोबत मनसेच्या

यूट्युब बघून वजन कमी करण्यासाठी परस्पर औषधे घेतली अन्...

मदुराई : तामिळनाडूतील मदुराईमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मदुराईत राहणाऱ्या एका तरुणीने यूट्युब बघून वजन