भारत पेट्रोलियमचा दमदार तिमाही निकाल नफ्यात ८९% वाढ 'इतका' लाभांशही जाहीर

मोहित सोमण: देशातील मोठी पीएसयु भारत पेट्रोलियम कंपनी लिमिटेडने आपला तिमाही निकाल जाहीर केला. एक्सचेंज फायलिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसार, कंपनीला इयर ऑन इयर बेसिसवर करोत्तर नफा (Profit after tax PAT) गेल्या वर्षीच्या ४६४९ कोटी तुलनेत यंदा ७५४५ कोटींवर प्राप्त केला. म्हणजेच कंपनीच्या निव्वळ नफ्यात ८९% वाढ झाली असल्याचे सांगितले गेले. तसेच कंपनीच्या करपूर्व नफ्यात (Profit before tax PBT) इयर ऑन इयर बेसिसवर ६१७६ कोटींवरून १००९४ कोटींवर वाढ झाली. विशेष म्हणजे कंपनीच्या व्याजातील खर्चात (Interest Expense) इयर ऑन इयर बेसिसवर ४२९ कोटीवरून ३६१ कोटींवर घसरण झाली. तर व्याज उत्पन्न (Interest Income) मध्ये इयर ऑन इयर बेसिसवर ३६९ कोटीवरून ३२२ कोटीवर घसरण झाली आहे.


विशेष म्हणजे जागतिक स्तरावरील परदेशी चलन विनिमय (Foreign Exchange) मुळे कंपनीच्या नफ्यात परिणाम झाल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले. कंपनीच्या आकडेवारीनुसार तो फरक २७३ कोटीवरून १६७ कोटींवर गेल्याचे म्हटले गेले. कंपनीच्या थकबाकीतही इयर ऑन इयर बेसिसवर १९६२२ वरून ५२९३ कोटीत घसरण झाली. जीआरएम (Gross Refining Margin) मध्ये मुंबईत ४.५० युएस अब्ज डॉलरवरून ११.४० इतकी मोठी वाढ झाली आहे तर कोची रिफायनरीत ५.४७ युएस अब्ज डॉलरवरून १२.७० अब्ज डॉलर व बिना रिफायनरीतून ७.७८ वरून १८.१७ अब्ज डॉलरवर ही वाढ गेली. तसेच निकालासह कंपनीने थेट १० रूपये लाभांश जाहीर केला आहे.


संचालक मंडळाने शुक्रवार, २३ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या त्यांच्या बैठकीत २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी १००% म्हणजेच १० रुपये दर्शनी मूल्याच्या प्रति इक्विटी शेअरचा दुसरा अंतरिम लाभांश जाहीर केला. याविषयी बोलताना एक्सचेंज फायलिंगमध्ये कंपनीने,प्रति इक्विटी शेअरचा दुसरा इक्विटी शेअर १० रुपये इतका अंतरिम लाभांश रेकॉर्ड डेट बंद होताना म्हणजेच सोमवार, २ फेब्रुवारी २०२६ रोजी कंपनीचे इक्विटी शेअर्स असलेल्या भागधारकांना दिला जाईल असे स्पष्ट केले. काल बाजार बंद होताना कंपनीचा शेअर १.२६% कोसळला असून गेल्या ५ दिवसांत कंपनीच्या शेअर्समध्ये ३.६८% घसरण झाली. गेल्या १ महिन्यात कंपनीच्या शेअर्समध्ये ४.४३% घसरण झाली असून वर्षभरात शेअर्समध्ये ३२.५६% वाढ झाली आहे तर इयर टू डेट बेसिसवर (YTD) ८.३४% वाढ झाली आहे.

Comments
Add Comment

पंजाबमध्ये प्रजासत्ताक दिनापूर्वी रेल्वे रुळावर स्फोट

अमृतसर : प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर पंजाबमधील सरहिंद रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे रुळावर स्फोट झाल्याची

“मुंब्रा को हरा बना देंगे” म्हणणाऱ्या सहर शेखचा माफीनामा

ठाणे : ‘कैसा हराया’ म्हणत मुंब्रा येथील ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षाच्या नवनिर्वाचित नगरसेवक

पालकमंत्री नितेश राणे यांचा मनसेला जोरदार धक्का

वैभववाडी : वैभववाडी मनसे अध्यक्ष महेश कदम यांनी भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला. त्यांच्यासोबत मनसेच्या

आयसीसीचा बांगलादेशला दणका, टी-२० विश्वचषकातून पत्ता कट, स्कॉटलंडचा प्रवेश

मुंबई  : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने अखेर बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या आडमुठ्या भूमिकेवर कठोर कारवाई केली

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीसाठी भारतीय संघाची घोषणा

हरमनप्रीत कौरकडे संघाची धुरा मुंबई (प्रतिनिधी) : महिला प्रीमियर लीग २०२६ स्पर्धा संपल्यानंतर भारतीय महिला संघ

T20I : गुवाहाटीत रविवारी भारत विरुद्ध न्यूझीलंड लढत, भारताला मालिका जिंकण्याची संधी

गुवाहाटी  : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील तिसरा महत्त्वपूर्ण सामना रविवारी