Harbour AC local Update : हार्बर मार्गावर पुन्हा एसी लोकल; 'या' तारखेपासून प्रवाशांना मिळणार ‘कूल’ प्रवासाचा अनुभव

नवी मुंबई : मुंबईकर लोकल प्रवाशांसाठी दिलासादायक अपडेट समोर आली आहे. मध्य रेल्वेने २६ जानेवारीपासून हार्बर मार्गावर पुन्हा एकदा एसी लोकल सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, यासोबतच पश्चिम रेल्वेवरही एसी लोकलच्या अतिरिक्त फेऱ्या वाढवण्यात येणार आहेत. त्यामुळे दररोजच्या प्रवासात प्रवाशांना अधिक आरामदायी सुविधा मिळणार आहेत.


रेल्वेच्या नव्या नियोजनानुसार प्रजासत्ताक दिनापासून सीएसएमटी, वडाळा रोड ते पनवेल या हार्बर मार्गावर एकूण १४ एसी लोकल फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. यासाठी काही निवडक वेळच्या सामान्य लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार असून, त्या वेळेत एसी लोकल धावतील. गर्दीच्या वेळेत होणारे हे बदल लक्षात घेता प्रवाशांना वेळापत्रक तपासून प्रवासाचे नियोजन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


हार्बर मार्गावर यापूर्वी १ डिसेंबर २०२१ रोजी एसी लोकलची सुरुवात करण्यात आली होती. मात्र सामान्य लोकलच्या तुलनेत एसी लोकलचे तिकीट आणि पास महाग असल्याने प्रवाशांचा अपेक्षित प्रतिसाद मिळाला नव्हता. यामुळे काही काळासाठी हार्बर मार्गावरील एसी लोकल सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली होती. आता नव्या वेळापत्रकासह आणि मर्यादित फेऱ्यांद्वारे पुन्हा ही सेवा सुरू करण्यात येत आहे.



हार्बर मार्गावरील एसी लोकलचे वेळापत्रक


पहाटे ४.१५ वाशी-वडाळा रोड
सकाळी ६.१७ पनवेल-सीएसएमटी
सकाळी ९.०९ पनवेल-सीएसएमटी
दुपारी १२.०३ पनवेल-वडाळा रोड
दुपारी २.३१ पनवेल-सीएसएमटी
दुपारी ४.५५ वाशी-वहाळा रोड
संध्याकाळी ६.३७ पनवेल-सीएसएमटी
सकाळी ५.०६ वडाळा रोड-पनवेल
सकाळी ७.४० सीएसएमटी-पनवेल
सकाळी १०.३४ सीएसएमटी-पनवेल
दुपारी १.१७ वडाळा रोड-पनवेल
दुपारी ३.५४ सीएसएमटी-वाशी
संध्याकाळी ५.३० वडाळा रोडा-पनवेल
रात्री ८ सीएमएमटी-पनवेल


या निर्णयामुळे हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांना अधिक सोयीस्कर, सुरक्षित आणि वातानुकूलित प्रवासाचा पर्याय उपलब्ध होणार असून, दैनंदिन प्रवासात मोठा दिलासा मिळणार आहे.

Comments
Add Comment

Guidelines for Rainwater Harvesting : जुन्या इमारतींमध्ये रेनवॉटर हार्वेस्टिंग आणि घनकचरा व्यवस्थापनासाठी नियमावली

- नगरविकास विभागाचा निर्णय; नवीन जलनिस्सारण जोडणीचा मार्ग सुलभ मुंबई : राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका आणि

YouTube च्या नियमात मोठे बदल! आता नवीन क्रिएटर्ससाठी कमाईचा मार्ग होणार आणखी कठीण

नवी दिल्ली : युट्यूब (YouTube) वरून कमाई करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या नवीन क्रिएटर्ससाठी महत्त्वाची बातमी आहे.

Ashish Shelar : झारखंडमधील विद्यार्थी मारहाणीवर राज-उद्धव ठाकरे गप्प का; मंत्री आशिष शेलार यांचा सवाल

 'मातोश्री' आणि 'शिवतीर्थ'वरून सोयीची

Nashik : त्र्यंबकेश्वर देवस्थानचा व्हीआयपी दर्शनाबाबत मोठा निर्णय

Nashik : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर देवस्थानने व्हीआयपी दर्शनाबाबत मोठा

Virar Fake Currency : विरारमध्ये बनावट नोटांचा मोठा पर्दाफाश! १ कोटींच्या नकली नोटा जप्त; ३० लाखांत विक्रीचा कट उधळला

वसई : वसई क्राईम ब्रँच युनिट-२ ने मुंबई-अहमदाबाद महामार्गावर मोठी कारवाई करत १ कोटी रुपये दर्शनी मूल्य असलेल्या

Nashik : चार महिन्यांपूर्वीचा काँक्रिटीकरण झालेला रस्ता पुन्हा फोडला, नाशिक महापालिकेच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह

Nashik : नाशिक शहरातील सीबीएस ते कॅनडा कॉर्नरदरम्यान (CBS to Canada Corner) अवघ्या चार महिन्यांपूर्वी काँक्रिटीकरण करण्यात आलेला