मुंबईत रस्त्यांच्या दुतर्फा विजेच्या खांबावर अनधिकृत बॅनर

मुंबई महापालिकेच्या परवाना विभागात ३ पोलिस ठाण्यात एफआयआर


मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिका प्रशासनाने महानगरपालिका हद्दीत तात्पुरत्या स्वरूपातील जाहिराती प्रदर्शित करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिलेल्या असतांनाही काही संस्था, संघटना आणि व्यावसायिकांकडून रस्त्यांच्या दुतर्फा असलेल्या विजेच्या खांबांवर अनधिकृतपणे बॅनर्स लावण्यात येत आहेत. अशा संस्था, संघटना आणि व्यावसायिकांविरोधात परवाना विभागाकडून गावदेवी, मलबार हिल, डॉ. डी. बी मार्ग पोलिस स्थानकात अनोळखी व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  २१ आणि २२ जानेवारी २०२६ या दोन दिवसांत ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत एकूण ४१ बॅनर्स काढण्यात  आले.


मुंबई महानगरपालिका उप आयुक्त (विशेष)  चंदा जाधव मार्गदर्शनाखाली परवाना विभागाकडून ही कारवाई करण्यात आली. महानगरपालिकेच्या डी विभागातील डॉ. गोपाळराव देशमुख मार्ग (पेडर रोड), पंडिता रमाबाई मार्ग, भुलाभाई देसाई मार्ग, वाळकेश्वर, मलबार हिल, डॉ. दादासाहेब भडकमकर मार्ग, मौलाना शौकत अली मार्ग, सरदार वल्लभभाई पटेल मार्ग तसेच राजा राममोहन रॉय मार्ग या ठिकाणी परवाना विभागाकडून कारवाई करण्यात आली. तसेच गावदेवी, मलबार हिल, डॉ. दादासाहेब भडकमकर मार्ग या तीन पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्याबाबतचे प्रथम खबरी अहवाल (एफआयआर) सादर करण्यात आले आहेत. त्यानुसार संबंधित पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, मुंबईतील सार्वजनिक ठिकाणी विनापरवाना कोणतेही फलक, बॅनर, पोस्टर प्रदर्शित करण्यास मनाई आहे. मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सार्वजनिक रस्ते तसेच पदपथांवर महानगरपालिकेच्या पूर्व परवानगीशिवाय कोणत्याही विषयाचे जाहिरात फलक (होर्डिंग), बॅनर किंवा पोस्टर लावण्यास प्रतिबंध आहे. अशा प्रकारच्या विना परवानगी जाहिरात फलक, बॅनर, पोस्टर लावणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थेविरोधात ‘महाराष्ट्र मालमत्ता विद्रुपीकरण प्रतिबंधक कायदा-१९९५’ मधील तरतुदी तसेच ‘मुंबई महानगरपालिका अधिनियम १८८८’मधील कलम ३२८/३२८-अ, ४७१ अन्वये कायदेशीर कारवाई करण्याची तरतूद आहे. या तरतुदींचा भंग करताना आढळल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करणे तसेच न्यायालयीन दावा दाखल करणे या कायदेशीर कारवाईंचा समावेश असल्याची माहिती परवाना विभागाने दिली आहे. महानगरपालिकेने मंजुरी दिलेल्या ठिकाणीच परवानगी घेऊन जाहिराती प्रदर्शित कराव्यात, असे आवाहनही महानगरपालिकेच्या परवाना विभागाने केले आहे.  तसेच यापुढेही सार्वजनिक ठिकाणी विनापरवाना बॅनर्स, फलक, पोस्टर्स लावणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे महानगरपालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

टोल फ्री क्रमांकावर तक्रार करण्याची सुविधा


विनापरवाना आणि अनधिकृत जाहिरात फलक (होर्डिंग) तसेच बॅनरविरोधात तक्रार नोंदविण्यासाठी नागरिकांनी १९१६ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. विनापरवाना प्रदर्शित केलेल्या जाहिरात फलकांविरोधात तक्रार नोंदविण्याची सुविधा महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर www.mcgm.gov.in आणि @mybmc या समाजमाध्यमांवरही उपलब्ध आहे.
Comments
Add Comment

Poisonous Snakes : मान्सूनमध्ये वाढतो 'या' ४ सापांचा वावर; कोणते आहेत हे जीवघेणे सर्प?

मुंबई : पावसाळा सुरू होताच निसर्ग हिरवागार होतो, मात्र त्याचवेळी विषारी सापांचा (Poisonous Snakes) वावरही मोठ्या प्रमाणात

Mhada: म्हाडातर्फे १३ जुलै रोजी १९ वा लोकशाही दिन साजरा होणार

मुंबई(Mumbai) : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणातर्फे (Mhada) एकोणीसावा लोकशाही दिन सोमवार १३ जुलै २०२६

Government of Maharashtra : 'आपत्तीवर वॉर मोड'! पावसाळी संकटाशी लढण्यासाठी महाराष्ट्र शासन सज्ज; मोशी, पालघरसह राज्यभर बचावकार्य वेगात

मुंबई : राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूर, भूस्खलन आणि इतर नैसर्गिक आपत्तींच्या

Water Management : धरण ओव्हरफ्लो, तरी पाणीटंचाई कायम!

मुंबई(Mumbai) : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरण क्षेत्रांत पावसाने दमदार सुरुवात केली आहे. त्यामुळे धरणातील

Weather Update : बंगालच्या उपसागरातील ढग निवळले,राज्यातील पावसाचा जोर ओसरणार; पुणे, सातारा घाटमाथ्याला 'ऑरेंज अलर्ट'

मुंबई(Mumbai) : राज्यात गेल्या काही दिवसांपासून थैमान घालणाऱ्या पावसाचा जोर आता हळूहळू कमी होताना दिसत आहे. मात्र,

Central Railway : लोणावळा–कर्जत रेल्वेमार्गावरील भूस्खलनाचा मोठा परिणाम! डेक्कन क्वीनसह अनेक एक्सप्रेस गाड्या १७ जुलैपर्यंत रद्द

मुंबई : मुसळधार पावसामुळे लोणावळा–कर्जत घाट विभागात झालेल्या भीषण भूस्खलनाचा फटका मध्य रेल्वेच्या वाहतुकीला