बदलापूरमध्ये शाळेच्या बस चालकाकडून चिमुकलीवर अत्याचार

बदलापूर : बदलापूर शहरात पुन्हा एकदा संतापजनक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. शाळेच्या मिनी बस चालकाने ४ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केल्याचा गंभीर आरोप उघडकीस आला असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. प्राप्त माहितीनुसार, बदलापूर पश्चिम भागात ही घटना घडली. संबंधित चिमुकलीने घरी आल्यानंतर घडलेला प्रकार पालकांना सांगितला. त्यानंतर पालकांनी तात्काळ पोलिसांकडे धाव घेतली. या प्रकरणी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी बस चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत. काही महिन्यांपूर्वी बदलापुरात अशाच स्वरूपाच्या घटनेने संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले होते. त्या पार्श्वभूमीवर पुन्हा घडलेल्या या घटनेने नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.


दरम्यान, बदलापूरच्या उपनगराध्यक्ष प्रियंका दामले यांनी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे. त्या म्हणाल्या, “खासगी शाळेच्या बस चालकाने केलेला हा प्रकार अत्यंत निंदनीय आहे. आरोपीवर तात्काळ कारवाई करण्यात आली असून पीडित मुलीला न्याय मिळावा, यासाठी पोलीस योग्य ती कठोर पावले उचलतील, अशी अपेक्षा आहे.” या घटनेनंतर पालक वर्गात भीतीचे वातावरण पसरले असून, शाळा वाहतूक व्यवस्थेच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

Comments
Add Comment

Kalyan News : कल्याण हादरलं! गांधारी परिसरात नागाचा थरार; एकापाठोपाठ तीन भटक्या कुत्र्यांचा मृत्यू

कल्याण : कल्याण पश्चिम भागातील गांधारी परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि भीतीदायक घटना समोर आली आहे. गेल्या अनेक

उबाठा सेनेच्या शहरप्रमुखाचा भाजपात प्रवेश

डोंबिवली : भारतीय जनता पार्टी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी डोंबिवली पश्चिम

अंबरनाथमध्ये चिमुकलीवर भटक्या कुत्र्याचा हल्ला; पण भावाला वाचवलं

अंबरनाथ : भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या त्रासाचे आणखी एक गंभीर उदाहरण अंबरनाथमधून समोर आले आहे. श्वानाने लहान

व्यावसायिक एलपीजीच्या कोट्यात ५० टक्क्यांपर्यंत वाढ; हॉटेल आणि उद्योगांना मोठा दिलासा

ठाणे : देशातील व्यावसायिक एलपीजी (LPG) गॅसच्या पुरवठ्याबाबत केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून,

ठाणे जिल्ह्यात पमी गुरुचा दबदबा, व्हायरल झाले अनेक रील

ठाणे : नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यात अशोक खरात नावाच्या भोंदू बाबाने धुमाकूळ घातला. या भोंदू बाबाला पोलिसांनी

बदलापूर ते नवी मुंबई थेट लोकलचा प्रस्ताव

बदलापूर : बदलापूर येथून थेट नवी मुंबईपर्यंत लोकल सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने मोठी हालचाल सुरू झाली आहे.