करण जौहरचा चित्रपट ऑस्कर 2026 मधुन बाहेर;चाहत्यांमध्ये निराशा..

मुंबई :ऑस्कर २०२६, ९८व्या अकॅडमी अवॉर्ड्सच्या नामांकनांची अधिकृत यादी जाहीर झाली असून, भारताकडून अधिकृत प्रवेश म्हणून पाठवण्यात आलेला करण जौहरचा बॅालीवुडमधील ‘होमबाउंड’ चित्रपट या शर्यतीतून बाहेर झाला आहे. बेस्ट इंटरनॅशनल फिचर फिल्म या महत्त्वाच्या श्रेणीत भारताला यंदा अंतिम नामांकनात स्थान मिळाले नाही, त्यामुळे भारतीय चित्रपटसृष्टीसह चाहत्यांचा मोठी निराशा पसरली आहे.

करण जौहरच्या धर्मा प्रोडक्शनमधुन निर्मीत केलेला ‘होमबाउंड’ हा चित्रपट अपूर्वा मेहता आणि आदर पूनावाला यांच्या सहनिर्मितीत साकारण्यात आला होता. या चित्रपटाकडून ऑस्करमध्ये भारताचे प्रतिनिधित्व होईल, अशी मोठी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, अंतिम नामांकन यादीत या चित्रपटाचा समावेश होऊ शकला नाही. ‘होमबाउंड’ हा उत्तर भारतातील एका छोट्या गावात घडलेल्या सत्य घटनेवर आधारित चित्रपट आहे. चंदन आणि शोएब या दोन मित्रांची कथा या चित्रपटात मांडण्यात आली आहे. पोलीस भरतीद्वारे समाजात सन्मान आणि चांगले आयुष्य मिळवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या या दोघांच्या आयुष्यात जातीय भेदभाव, गरिबी आणि कोविड-१९ महामारीमुळे अनेक अडथळे निर्माण होतात. बसारत पीर यांच्या सत्यकथेवर आधारित हा चित्रपट सामाजिक वास्तवाचे प्रभावी चित्रण करतो.

ऑस्करच्या बेस्ट इंटरनॅशनल फिचर फिल्म श्रेणीत नामांकन मिळवणारा शेवटचा भारतीय चित्रपट २००२ साली प्रदर्शित झालेला आमिर खानचा ‘लगान’ होता. त्यानंतर अनेक वर्षांपासून भारताला या श्रेणीत अंतिम नामांकन मिळालेले नाही.होमबाउंडच्या अपयशामुळे पुन्हा एकदा ऑस्करमध्ये भारतीय चित्रपटांच्या निवडीच्या प्रक्रियेवर आणि जागतिक स्तरावर आपल्या सिनेमाच्या पोहोचवर चर्चा सुरू झाली आहे.
Comments
Add Comment

‘तो ती आणि फुजी’ पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सुपरहिट

पुणे : शिलादित्य बोरा निर्मित आणि मोहित टकळकर दिग्दर्शित मराठी–जापानी चित्रपट ‘तो ती आणि फुजी’चा २४व्या पुणे

साईबाबांच्या पालखीच्या प्रवासातील साई भक्तांच्या अढळ श्रद्धेवर आणि भक्तीवर आधारित , 'पालखी' चित्रपटाचा मुहूर्त

मुंबई : श्रद्धा ही केवळ भावना नाही, ती आयुष्याला नवी दिशा देणारी शक्ती आहे. साईबाबांच्या कृपेवर आणि अढळ

भय आणि भ्रमाच्या विळख्यातला थरार ‘सालबर्डी’

मुंबई : इतिहासाच्या गर्भात दडलेल्या अनेक रहस्यांचा कधीच शोध लागत नाही, ती नेहमीच अनुत्तरीतच रहातात. काहींचा शोध

मराठी मनोरंजनाचा समृद्ध खजिना घेऊन 'नाफा स्ट्रीम'ची नॉर्थ अमेरिकेत धडाकेबाज एंट्री!

सॅन होजे (मनोरंजन प्रतिनिधी) : राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त ‘देऊळ’ आणि ‘भारतीय’ या गाजलेल्या चित्रपटांचे

फरहान अख्तर अभिनीत ‘120 बहादूर’पासून सनी देओलच्या ‘बॉर्डर’पर्यंत – या प्रजासत्ताक दिनी पाहा 7 देशभक्तीपर चित्रपट

प्रजासत्ताक दिन विशेष: फरहान अख्तर अभिनीत ‘120 बहादूर’पासून सनी देओलच्या ‘बॉर्डर’पर्यंत – हे सात प्रेरणादायी

सारांश नंतरचा दुसरा चित्रपट; अनुपम खेर यांचा 'तन्वी द ग्रेट' चित्रपट ऑस्करसाठी ठरला पात्र

मुंबई : अनुपम खेर यांनी दिग्दर्शित केलेल्या 'तन्वी द ग्रेट' या चित्रपटाला प्रेक्षकवर्गाचा प्रतिसाद मिळाला आहे,