मोहित सोमण: गेल्या महिनाभरात डीजीसीए (DGCA) या नियामक मंडळाच्या कचाट्यात सापडलेल्या इंडिगो (इंटरग्लोब एव्हिऐशन लिमिटेड) कंपनीने आपला तिमाही आर्थिक निकाल जाहीर केला आहे. त्यामुळे आज कंपनीच्या शेअर्समध्ये सुरुवातीला ३% घसरण झाली आहे. कंपनीने आर्थिक निकाल जाहीर केल्याप्रमाणे कंपनीच्या निव्वळ नफ्यात इयर ऑन इयर बेसिसवर डिसेंबरपर्यंत थेट ७८% (७७.५%) घसरण झाली आहे. सातत्याने रद्द झालेल्या विमानामुळे, कार्यक्षमतेत झालेल्या घटीमुळे व नव्या नियमांची पूर्तता करण्यासाठी मनुष्यबळ नसल्याने रद्द झालेल्या विमानांमुळे कंपनीच्या आर्थिक आरोग्यात एकत्रितपणे परिणाम झाला असून परिणामी कंपनीच्या निव्वळ नफ्यात (Net Profit) इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) २४४८.८ कोटीवरून ५४९.८ कोटींवर घसरण झाली. तर कंपनीच्या एकूण उत्पन्नात (Total Income) इयर ऑन इयर बेसिसवर २२९९.२८ कोटींवरून २४५४.०६ कोटीवर घसरण झाली आहे. तसेच देशातली क्रमांक चीनची एअरलाईन्स असलेल्या इंडिगोने एक्सचेंज फायलिंगमधील माहितीनुसार, महसूलात ६% वाढ यंदाच्या तिमाहीत नोंदवली. गेल्या वर्षीच्या तिमाहीतील २२९९२.५८ कोटी तुलनेत यंदा २४५४४.० कोटींवर वाढ नोंदवली.
कंपनीच्या खर्चातही २०४६५.७ कोटीवरून २२४३१.९ कोटीवर वाढ झाली. भारताचे नवीन कामगार कायदे, जे वेतन संहिता, २०१९, औद्योगिक संबंध संहिता, २०२०, सामाजिक सुरक्षा संहिता, २०२० आणि व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य आणि कामाच्या परिस्थिती संहिता, २०२० अंतर्गत एकत्रित करण्यात आले आहेत, ते २१ नोव्हेंबर रोजी लागू झाले. या कायद्याने वेतनाची एकसमान व्याख्या लागू केली आहे. व्यवहारात यामुळे कंपन्यांना वैधानिक देयके (Debt) कमी ठेवण्यासाठी पगाराचा मोठा भाग भत्त्यांमध्ये दाखवण्यापासून रोखले जाते. त्यानुसार, मूळ वेतन (Basic Pay) हे सीटीसीच्या किमान ५०% असणे आवश्यक आहे. नवीन कायद्यांचा भाग म्हणून पगार विलंबावर बंदी, ओव्हरटाईम वेतनाचे नियम आणि इतर अनेक बदल लागू करण्यात आले आहेत. नवीन कामगार कायद्यांमुळे इंडिगोला ९६९.३ कोटी रुपयांचे एकवेळचे असाधारण नुकसान झाले. इंडिगोने सांगितले की, आर्थिक वर्ष २६ च्या तिसऱ्या तिमाहीत तिची क्षमता वार्षिक आधारावर ११.२ टक्क्यांनी वाढून ४५४० कोटी झाली, तर प्रवाशांची संख्या वार्षिक आधारावर २.८ टक्क्यांनी वाढून ३,१९० कोटी झाली.
एअरलाइनचा लोड फॅक्टर २.४ बेसिस पॉइंट्सने कमी होऊन ८४.६ टक्के झाला, तर उत्पन्न १.८% कमी होऊन ५.३३ रुपये झाले. इंधन CASK २.८% कमी होऊन १.५३ रुपये झाला. इंडिगोला चौथ्या तिमाहीत उपलब्ध आसन किलोमीटर (ASK) मध्ये मोजली जाणारी क्षमता १०% वाढण्याची अपेक्षा आहे. तिसऱ्या तिमाहीत तिचा एकूण खर्च जवळपास १० टक्क्यांनी वाढला, ज्यात इंधनाचा खर्च ८% वाढला. गेल्या महिन्याच्या सुरुवातीला, इंडिगोला मोठ्या प्रमाणावर उड्डाणे रद्द झाल्याचा आणि त्यानंतर संपूर्ण भारतातील प्रमुख विमानतळांवर प्रचंड गोंधळाचा सामना करावा लागला. या गोंधळामागील एक महत्त्वाचे कारण म्हणजे सुधारित फ्लाइट ड्युटी टाइम लिमिटेशन (FDTL) नियम लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांची (विशेषतः वैमानिकांची, तीव्र कमतरता). नवीन नियमांनुसार अधिक विश्रांतीचे तास आणि मानवी वेळापत्रक अनिवार्य आहे परंतु इंडिगोला त्यानुसार आपले नेटवर्क पुन्हा संरेखित करण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे असे कंपनीने फायलिंगमध्ये म्हटले.
उपलब्ध माहितीनुसार, डिसेंबर २०२५ च्या सुरुवातीला या व्यत्ययामुळे ३००००० हून अधिक प्रवाशांना फटका बसला होता. त्यानंतर कंपनीने नुकसानभरपाईची घोषणा केली होती. डिसेंबर २०२५ च्या पहिल्या आठवड्यात, कंपनीला अनपेक्षित कार्यात्मक आव्हानांचा मोठ्या प्रमाणात सामना करावा लागला ज्यामुळे ३ डिसेंबर २०२५ ते ५ डिसेंबर २०२५ दरम्यान मोठ्या प्रमाणात उड्डाणे रद्द झाली आणि विलंबाने धावली. या व्यत्ययांमुळे प्रभावित कालावधीत प्रवासी महसुलात लक्षणीय घट झाली असल्याचे तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे.त्यानंतर कार्यवाही पूर्ववत करण्यासाठी कंपनीने आपले नेटवर्क आणि सिस्टीम रीबूट करण्यासाठी आणि कर्मचाऱ्यांची पुनर्रचना करण्यासाठी उपाययोजना केल्या होत्या. या सुधारात्मक कृतींमुळे कंपनीला सुधारित स्थिरतेसह अधिक संख्येने विमानांचे संचालन करणे शक्य झाले असे सांगितले जाते. नियामकांचा आदेशानंतर,कंपनीने ग्राहकांना नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतला याव्यतिरिक्त गंभीरपणे प्रभावित झालेल्या ग्राहकांना प्रवास व्हाउचर देखील देत असल्याचे घोषित केले.
कंपनीने एक्सचेंज फायलिंगमध्ये दिलेल्या माहितीत,' या बाबींचा, इतर संबंधित खर्चांसह, अंदाजित परिणाम ५५५० दशलक्ष रुपये इतका असून तो ३१ डिसेंबर २०२५ रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊ महिन्यांच्या कालावधीसाठीच्या एकत्रित आर्थिक निकालांमध्ये एक अपवादात्मक बाब म्हणून नोंदवला गेला आहे. Ind AS 115 अंतर्गत कामकाजातून मिळणारा महसूल, अपवादात्मक बाब वगळता, ३१ डिसेंबर २०२५ रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊ महिन्यांच्या कालावधीसाठी अनुक्रमे २२९,३७२ दशलक्ष रुपये आणि ६१९,८८८ दशलक्ष रुपये इतका असता.पुढे १७ जानेवारी २०२६ रोजी, कंपनीला नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडून (DGCA) कामकाजातील व्यत्ययांशी संबंधित २२२ दशलक्ष (२२ कोटी) रुपयांच्या दंडाचा आदेश प्राप्त झाला. कंपनीकडून या आदेशाचे मूल्यांकन केले जात असले तरी ही रक्कम ३१ डिसेंबर २०२५ रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊ महिन्यांच्या कालावधीसाठीच्या एकत्रित आर्थिक निकालांमध्ये एक अपवादात्मक बाब म्हणून तरतूद करण्यात आली आहे. DGCA ने कंपनीला 'इंडिगो सिस्टेमिक रिफॉर्म अँश्युरन्स स्कीम' ('ISRAS') अंतर्गत ५०० दशलक्ष रुपयांची बँक गॅरंटी सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. बँक गॅरंटीची सुटका, टप्प्याटप्प्याने, योजनेनुसार निर्धारित केलेल्या DGCA च्या पडताळणीच्या अधीन आहे.कंपनी नियामक अनुपालनासाठी वचनबद्ध आहे, घडामोडींवर लक्ष ठेवत आहे आणि आवश्यक असल्यास पुढील कोणत्याही परिणामाचे मूल्यांकन करेल'. असे म्हटले.
आर्थिक निकालातील माहितीनुसार, कंपनीच्या ईपीएस (Earning per share EPS) मध्ये ६३.३८ वरून १४.२२ रूपये इतकी घसरण झाली आहे. एकूणच या तिमाहीत, ' कंपनीला मोठ्या कार्यात्मक अडथळ्यांना सामोरे जावे लागले, ज्यामुळे ३ ते ५ डिसेंबर दरम्यान मोठ्या प्रमाणात विमानांची उड्डाणे रद्द झाली आणि त्यांना विलंब झाला. आमच्या ग्राहकांना झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही मनापासून दिलगीर आहोत आणि त्यांच्या संयमाबद्दल व विश्वासाबद्दल आम्ही त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो. मी इंडिगोच्या सर्व सहकाऱ्यांचेही आभार मानू इच्छितो, ज्यांनी कामकाज पूर्ववत करण्यासाठी अथक परिश्रम घेतले. तुमच्या समर्पणामुळे आणि 'मनापासून दिलेल्या सेवेमुळे' आम्ही लवकरच सामान्य कामकाजाकडे परत येऊ शकलो. सामान्य परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी दिलेल्या पाठिंब्याबद्दल आम्ही सरकार, विमान वाहतूक प्राधिकरण आणि भारतीय विमान वाहतूक क्षेत्रातील इतर सर्व भागीदारांचे आभारी आहोत असे इंडिगोचे सीईओ पीटर एल्बर्स कंपनीच्या निर्णयाबाबत म्हणाले आहेत.
'या कार्यात्मक अडथळ्यांनंतरही, इंडिगोने महसुलात जोरदार वाढ नोंदवली. या तिमाहीत आम्ही जवळपास ३२ दशलक्ष ग्राहकांचे आणि २०२५ या कॅलेंडर वर्षात सुमारे १२४ दशलक्ष ग्राहकांचे स्वागत केले. आमच्या वाढत्या विमान ताफ्यामुळे आणि विस्तारणाऱ्या देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय जाळ्यामुळे आमचे दीर्घकालीन मूलभूत घटक मजबूत आहेत. भविष्याचा विचार करता, आम्ही विश्वसनीयता, कार्यात्मक उत्कृष्टता आणि सुधारित ग्राहक अनुभवासाठी कटिबद्ध आहोत' असेही सीईओ पुढे म्हणाले आहेत. इंडिगो शेअर्समध्ये गेल्या ५ दिवसात इयर ऑन इयर बेसिसवर २.१६% घसरण झाली असून गेल्या एक महिन्यात कंपनीच्या शेअरमध्ये ७.४२% घसरण झाली आहे. तर गेल्या वर्षभरात शेअरमध्ये १५.५८% वाढ झाली असून इयर टू डेट बेसिसवर (YTD) शेअर्समध्ये ६.४९% घसरण झाली आहे.