मोदींप्रती मला आदर; ते माझे जवळचे मित्र!

दावोसमधील आर्थिक परिषदेत ट्रम्प यांच्यांकडून कौतुकाचा वर्षाव


दावोस: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. ‘जवळचा मित्र’ व ‘उत्तम व्यक्ती’ अशा शब्दांत ट्रम्प यांनी मोदींवर स्तुतिसुमने उधळली. उभय देशांमध्ये लवकरच व्यापार करार होईल असा आत्मविश्वास ट्रम्प यांनी यावेळी व्यक्त केला. वार्षिक आर्थिक परिषद, दावोस येथे ट्रम्प बोलत होते. डोनाल्ड ट्रम्प यांनी मनीकंट्रोलशी साधलेल्या संवादात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी असलेले संबंध आणि दोन्ही देशांमधील व्यापार करारावर भाष्य केले. ‘तुमच्या पंतप्रधानांप्रती मला खूप आदर आहे. ते उत्तम व्यक्ती असून माझे जवळचे मित्र आहेत. लवकरच आम्ही मोठा करार करू’, असे ट्रम्प म्हणाले.

५० टक्के टॅरिफचा फटका


भारत – अमेरिकेतील व्यापारी संबंध ताणले असताना ट्रम्प यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भाष्य करताना पॉलिसी केंद्रस्थानी ठेवत व्यक्तिगत टीका टाळल्याचे दिसून आले. अमेरिकेने भारतावर ५० टक्के टॅरिफ लादले आहे. भारतातील अमेरिकन राजदूत सरजिओ गोर यांनी दोन्ही देशातील संबंधावर सकारात्मक भाष्य केले आहे. व्यापारामुळे ताणलेले संबंध पूर्ववत होतील, असा विश्वास व्यक्त केला.


शेअर बाजारात पडसाद : ट्रम्प यांनी आयात शुल्काबाबत घेतलेल्या मवाळ भूमिकेचे सकारात्मक पडसाद भारतीय शेअर बाजारात उमटले. गेल्या तीन सत्रांपासून सुरू असलेल्या घसरणीला पूर्णविराम देत बाजार जोमाने सावरला. आयटी, फार्मा व मेटल क्षेत्रातील जोरदार खरेदीमुळे सेन्सेक्सने पुन्हा ८२ हजार ३०० चा टप्पा गाठला. बाजारात २ हजार ८०३ शेअर्समध्ये तेजी दिसून आली, तर १ हजार २३५ शेअर्स घसरणीसह बंद झाले. मिडकॅप व स्मॉलकॅप निर्देशांकांमध्येही प्रत्येकी १ टक्क्याची वाढ झाल्याने बाजारात सर्वसमावेशक मजबुतीचे संकेत मिळाले आहेत.

Comments
Add Comment

Green Asha Indian Ship : भारताचे आठवे जहाज २० हजार टन एलपीजी घेऊन होर्मुझ सामुद्रधुनीतून सुरक्षित बाहेर

भारताचे आठवे जहाज ‘ग्रीन आशा’ने होर्मुझ सामुद्रधुनी यशस्वीरित्या पार केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय

अमेरिकेच्या लष्कराने इराणमध्ये केला स्वतःच्याच विमानांवर हल्ला; कारण काय आणि किती नुकसान झाले?

नवी दिल्ली: अमेरिकेने इराणमधून आपल्या लढाऊ वैमानिकांना परत आणण्यासाठी एक जोखमीची बचाव मोहीम सुरू केली होती.

Iran-US-Israel War : ४५ दिवसांचा युद्धविराम होणार? अमेरिका - इराण एकमेकांच्या अटी मान्य करणार?

मध्य पूर्वेत सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर आता युद्धविराम (सीजफायर) होण्याची शक्यता व्यक्त केली जात

Iran Attack on Kuwait : इराणचा कुवैतमधील मंत्रालयाच्या इमारतींवर हल्ले

इराणने रविवारी (५ एप्रिल) कुवैतमधील अनेक इमारतींना लक्ष्य केले. कुवैतच्या वित्त मंत्रालयाने सांगितले की, तेल

Middle East War : मध्य-पूर्व आशियातील युद्धामुळे युक्रेनवरील अमेरिकेचा वरदहस्त कमी होणार ?

 झेलेन्स्की यांना व्यक्त केली भीती कीव : पश्चिम आशियातील संकटाचा परिणाम जागतिक स्तरावर दिसून येत असून संपूर्ण

पश्चिम आशियात युद्ध तीव्र; इस्रायलचे इराण-लेबनॉनमध्ये मोठे हवाई हल्ले

जेरुसलेम : पश्चिम आशियामध्ये अमेरिका-इस्रायलसोबत सुरू असलेल्या इराणच्या युद्धाला पाच आठवड्यांहून अधिक काळ