योग, आयुर्वेद अन् ॲलोपॅथीचा संगम

गृहमंत्री अमित शाहांच्या हस्ते 'हायब्रिड' पतंजली रुग्णालयाचे उद्घाटन 

हरिद्वार  : भारताच्या आरोग्य क्षेत्रात एक ऐतिहासिक अध्याय जोडला गेला आहे. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी पतंजली योगपीठ संचालित 'पतंजली इमर्जन्सी अँड क्रिटिकल केअर हॉस्पिटल'चे भव्य उद्घाटन केले. हे रुग्णालय योग, आयुर्वेद आणि आधुनिक वैद्यकीय शास्त्राचा (ॲलोपॅथी) संगम असलेले जगातील पहिले एकात्मिक औषध प्रणाली केंद्र ठरले आहे. उद्घाटनानंतर अमित शाह यांनी रुग्णालयातील विविध विभागांची पाहणी केली. यावेळी त्यांनी या उपक्रमाचे तोंडभरून कौतुक केले. "पतंजलीने आधुनिक वैद्यकशास्त्र आणि प्राचीन आयुर्वेद यांची सांगड घालून जगाला पहिले 'हायब्रिड' रुग्णालय दिले आहे," अशा शब्दांत त्यांनी या केंद्राचा गौरव केला. हे रुग्णालय केवळ भारतीय नागरिकांनाच नव्हे, तर जागतिक स्तरावर दर्जेदार आरोग्य सेवा देणारे प्रमुख केंद्र ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या पतंजली दौऱ्यावर होते. या काळात त्यांनी स्वामी रामदेव जी आणि आचार्य बाळकृष्ण जी यांच्यासोबत 'रोगमुक्त जग' आणि 'सनातन जीवनशैली' या विषयांवर सखोल चर्चा केली. काल रात्री त्यांनी पतंजली योगपीठ परिसरात मुक्काम करून शिक्षण, वैद्यकशास्त्र आणि ऋषी मुनींच्या ज्ञानाच्या वारशाला जागतिक स्तरावर प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी पतंजलीच्या भविष्यातील भूमिकेवर विचारमंथन केले. या प्रसंगी पतंजली गुरुकुलम आणि आचार्यकुलमच्या विद्यार्थ्यांनी तसेच अनेक संतांनी गृहमंत्र्यांचे उत्साहात स्वागत केले. स्वामी रामदेव जी यांनी गृहमंत्र्यांचे आभार मानताना म्हटले की, "राष्ट्रीय धर्म आणि सनातन धर्माला सर्वोच्च मानणाऱ्या नेत्याच्या हस्ते या ऐतिहासिक केंद्राचे उद्घाटन होणे हा अभिमानाचा क्षण आहे." हे रुग्णालय आता भविष्यातील आरोग्य सेवांसाठी एक जागतिक मॉडेल म्हणून पाहिले जात आहे.
Comments
Add Comment

कर्नाटकमध्ये प्रत्येक आमदाराला शुभारंभाच्या सामन्याचे VIP पास मिळणार

बंगळुरू : कर्नाटकमध्ये प्रत्येक आमदाराला आयपीएलच्या राज्यातील शुभारंभाच्या सामन्याचे VIP पास मिळणार आहेत.

लडाखमध्ये हिमस्खलन, सात जणांचा मृत्यू; श्रीनगर-लेह महामार्ग बंद

लडाख : लडाखमधील झोजी ला येथे श्रीनगर-लेह महामार्गावर झालेल्या हिमस्खलनात अनेक वाहने बर्फाखाली गाडली गेली.

महाराष्ट्र आणि गोव्याला पंधराव्या वित्त आयोगाच्या अनुदानाअंतर्गत ५९२ कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी प्राप्त

नवी दिल्ली : केंद्र सरकारने, पंधराव्या वित्त आयोगाच्या शिफारसीनुसार, आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी, महाराष्ट्र आणि

एस-400 मिसाइलसह संरक्षण उपकरणांच्या खरेदीस मंजुरी

नवी दिल्ली : भारतीय संरक्षण मंत्रालयाने हवाई दलासाठी रशियाकडून एस-400 एअर डिफेन्स सिस्टमची अतिरिक्त बॅटरी खरेदी

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या नेतृत्त्वात उच्चस्तरीय गटाची स्थापना

- पश्चिम आशियातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा निर्णय इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या

PM Narendra Modi : युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी करणार सर्व मुख्यमंत्र्यांसोबत बैठक

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज म्हणजेच शुक्रवार २७ मार्च रोजी सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ