मुंबईत मंगळवारपासून पुढील सात दिवस शहर आणि पूर्व उपनगरात १० टक्के पाणीकपात

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेस पाणीपुरवठा करणाऱया पिसे येथील ‘न्यूमॅटिक गेट सिस्टिम’च्या वार्षिक परिरक्षणाचे काम हाती घेतले जाणार आहे. हे कामकाज मंगळवार, २७ जानेवारी २०२६ पासून शनिवार, ७ फेब्रुवारी २०२६ पर्यंत नियोजित आहे. त्यामुळे शहर विभाग आणि पूर्व उपनगरांतील बहुतेक प्रशासकीय विभागांचा पाणीपुरवठा प्रभावित होणार आहे. या कालावधीत शहर विभाग व पूर्व उपनगरांमध्ये १० टक्के पाणीकपात लागू करण्यात‍ येणार आहे. तसेच ठाणे व भिवंडी महानगरपालिकेच्या हद्दीतील ज्या भागास मुंबई महानगरपालिकेतर्फे पाणीपुरवठा होतो त्या भागांमध्येही ही १० टक्के पाणीकपात लागू राहणार आहे. तरी परिसरांमधील सर्व नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून या कालावधीत पाणी काटकसरीने वापरावे आणि सहकार्य करावे, असे आवाहन मुंबई मनपा प्रशासनाने केले आहे.



या भागात असेल पाणीकपात


मुंबई शहर :




  1. ‘ए’ विभाग - नेव्हल डॉकयार्ड क्षेत्र

  2. ‘बी’ विभाग - संपूर्ण विभाग

  3. ‘सी’ विभाग - भेंडी बाजार, बोहरी मोहल्ला, घोगरी मोहल्ला क्षेत्र

  4. ‘ई’ विभाग - पूर्ण विभाग

  5. ‘एफ दक्षिण’ विभाग - संपूर्ण विभाग

  6. ‘एफ उत्तर’ विभाग - संपूर्ण विभाग


पूर्व उपनगरे :




  1. ‘टी’ विभाग - मुलुंड (पूर्व) आणि (पश्चिम) क्षेत्र

  2. ‘एस’ विभाग - भांडुप, नाहूर, कांजूरमार्ग आणि विक्रोळी (पूर्व) क्षेत्र

  3. ‘एन’ विभाग - विक्रोळी, घाटकोपर (पूर्व), घाटकोपर

  4. ‘एल’ विभाग - कुर्ला (पूर्व) क्षेत्र

  5. ‘एम पूर्व’ विभाग – संपूर्ण विभाग

  6. ‘एम पश्चिम’ विभाग – संपूर्ण विभाग

Comments
Add Comment

महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ‘बीग्सी’ अभिनव, खर्चमुक्त उपक्रम

मुंबई : महिला प्रवाशांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत गृह विभाग तसेच परिवहन विभागाच्या सहकार्याने

मुंबईच्या नव्या महापौरांच्या स्वागतासाठी सज्ज होत आहे राणीबागेतला महापौर बंगला

मुंबई : मुंबई महापालिकेचे महापौरपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. मुंबई महापालिकेत भाजपा

Mahalakshmi Bridge : रेल्वे रुळांवरून धावणार पालिकेचा पहिला 'केबल-स्टेड' पूल; ५५% काम फत्ते; सात रस्ता, महालक्ष्मी...अजून कुठे कुठे? पाहा नेमका मार्ग

मुंबई : दक्षिण मुंबईतील महालक्ष्मी रेल्वे स्थानक परिसरातील वाहतूक सुलभ करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेतर्फे

महाराष्ट्रातील सात जिल्ह्यांत हवामानाचा बदल; ढगाळ वातावरणासह पावसाचा अंदाज, बळीराजा चिंतेत

मुंबई : देशाच्या विविध भागांमध्ये सध्या हवामानात मोठे चढ-उतार पाहायला मिळत आहेत. बंगालच्या उपसागरात निर्माण

मध्य रेल्वेद्वारा मुंबई–नागपूर / मडगाव दरम्यान ४ विशेष रेल्वे सेवा

मुंबई  : रेल्वे प्रवासाच्या वाढत्या मागणीचा विचार करता, मध्य रेल्वे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई –

पश्चिम रेल्वेचे दोन गाड्यांच्या टर्मिनल आणि डब्यांच्या रचनेत तात्पुरते बदल

मुंबई कर्णावती एक्सप्रेस वांद्रे टर्मिनस येथून आणि वंदे भारत एक्सप्रेस २० डब्यांच्या रेकसह धावणार मुंबई  : २२