एमपीसीबीचा ओसाखा सिटी प्रशासनासोबत सामंजस्य करार

मुंबई : पर्यावरण संवर्धन आणि प्रदूषण नियंत्रणासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) जपानच्या ओसाखा सिटी प्रशासनासोबत सामंजस्य करार केला. या कराराद्वारे राज्यातील घनकचरा व्यवस्थापन, जल व हवा प्रदूषण तसेच कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. यावेळी महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचे अध्यक्ष सिध्देश कदम, मंडळाचे सदस्य सचिव एम. देवेंदर सिंह भा. प्र. से., जपानचे मुंबईतील कॉन्सुलेट जनरल कोजी यागी- सान यांच्या उपस्थितीत ओसाखा सिटी शासनाचे पर्यावरण ब्युरो शुनसुके कावाबे, ग्लोबल इंन्व्हायरमेंट सेंटर जपानचे वरिष्ठ कार्यक्रम अधिकारी आकीको डोई, तोमोया मोटोडा, नकाजिमा नाओ, चिका काटा ओका, सुनिची होंडा, आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा सांमज्यस करार करण्यात आला आहे. १९६० च्या दशकात औद्योगिकीकरणामुळे जपानमध्ये प्रदूषणाचे गंभीर प्रश्न निर्माण झाले होते. ओसाखा सिटीने कडक कायदे, प्रभावी अंमलबजावणी आणि लोकसहभागाद्वारे जल, हवा, घनकचरा आणि कार्बन उत्सर्जन नियंत्रणात यश मिळवले असून ते आज जागतिक रोल मॉडेल मानले जाते. या कराराअंतर्गत तंत्रज्ञानाची देवाण-घेवाण, कौशल्य विकास, प्रशिक्षण आणि अभ्यासगट राबवले जातील. सिंगल-यूज प्लास्टिक पुनर्वापर, घनकचरा प्रक्रिया आणि प्रदूषण नियंत्रणासाठी ओसाखा सिटी प्रशासन महाराष्ट्राला मदत करणार आहे. या माध्यमातून राज्यात हरित पर्यावरण निर्मितीस मोठा हातभार लागेल, असे अध्यक्ष कदम
यांनी सांगितले.

Comments
Add Comment

Mumbai Mayor 2026 : तेजस्वी घोसाळकर की राजश्री शिरवाडकर? आरक्षण जाहीर होताच भाजपच्या 'या' महिला नगरसेविकांची नावे चर्चेत

मुंबई : देशातील सर्वात श्रीमंत आणि प्रतिष्ठेची मानली जाणारी मुंबई महानगरपालिका (BMC) आता पुन्हा एकदा महिला

मुंबई, पुण्यात महिलाराज : राज्यातील २९ महापालिकांच्या महापौर पदासाठी आरक्षण जाहीर

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या महापौर पदासाठीची बहुप्रतिक्षित आरक्षण सोडत अखेर आज मंत्रालयात पार पडली.

Maharashtra Municipal Election Results : महानगरपालिकांचा 'सस्पेन्स' संपला! राज्यातील २९ महापालिकांचे महापौर आरक्षण जाहीर; तुमच्या शहरात कोणत्या प्रवर्गाचा राज?

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर गेली आठवडाभर सुरू असलेली उत्सुकता आता

Mumbai Local Train : आता लोकल ट्रेनवर सुध्दा CCTV कॅमेरे मध्य रेल्वेचा निर्णय; पण CCTV का जाणुन घ्या ?

मुंबई : मुंबईकरांची लाईफलाईन असलेल्या लोकल ट्रेनच्या सुरक्षेच्या दृष्टीने मध्य रेल्वेने एक महत्त्वाचा निर्णय

लोकमान्य टिळक मंडईतील विक्रेत्यांवर कारवाई

नूतनीकरणावरून वाद तीव्र मुंबई : लोकमान्य टिळक मंडईमध्ये कोणतीही पूर्वसूचना किंवा नोटीस न देता वाढीव बांधकामावर

टोल थकबाकीमुळे वाहन सेवा थांबणार

एनओसी, फिटनेस प्रमाणपत्र व नॅशनल परमिटवर बंदी मुंबई : राष्ट्रीय महामार्गांवर प्रवास करणाऱ्या वाहनधारकांसाठी