मुंबई महापालिकेत भाजप शिवसेनेचा एकच गट?

स्वीकृत नगरसेवकांसह समित्यांमधील बदलणार समिकरणे


मुंबई : मुंबई महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेनेने महायुतीमध्ये निवडणूक लढवली असली तरी निवडून आल्यानंतर कोकण विभागीय आयुक्तांच्या कार्यालयात आपल्या गटांची स्वतंत्र नोंदणी न करता एकत्रपणे आपल्या गटाची नोंदणी करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहे. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेच्या एकाच गटाची नोंदणी झाल्यास सभागृहातील पदनिर्देशित सदस्य अर्थात स्वीकृत नगरसेवकांसह वैधानिक आणि विशेष समित्यांमधील सदस्यांची समिकरणे बदलली जाण्याची शक्यता आहे. यामुळे वैधानिक आणि विशेष समित्यांमध्ये भाजपा शिवसेनेची गणसंख्या वाढलेली पहायला मिळणार आहे. तसेच झाल्यास महायुतीतील घटक पक्षांचे संख्याबळ वाढून विरोधकांचे संख्याबळ कमी होणार आहे.


मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजपचे ८९ तर शिवसेनेचे २९ नगरसेवक निवडून आले आहेत. तर उबाठाचे ६५ नगरसेवक निवडून आले आहेत. उबाठाचे ६५ आणि काँग्रेसचे २४ तसेच मनसेचे ०६ यासर्वांची कोकण भवनामध्ये नोंदणी झाली आहे. मात्र, सभागृहात एमआयएमचा एक स्वीकृत नगरसेवक वाढत असल्याने भाजप आणि शिवसेनेने स्वतंत्र नोंदणी न करता एक गट स्थापन करून नोंदणी केल्यास एमआयएमचा एक सदस्य कमी होवून भाजप आणि शिवसेनेचे एकूण सहा स्वीकृत निवडून येवू शकतात. सध्या स्वतंत्र गट ठेवल्यास भाजपचे चार आणि शिवसेनेचा एक अशाप्रकारे पाच सदस्य निवडून येणार होते. ही समिकरणे दोन्ही पक्षाचे एकत्र गट बनवल्यास बदलली जावू शकतात. तसेच स्थायी समिती, शिक्षण समिती, बेस्ट समिती आणि सुधार समितीमध्ये भाजप आणि शिवसेनेचा एक सदस्य तसेच विशेष समित्यांमध्ये दोन सदस्य वाढले जावू शकतात. त्यामुळे एमआयएमचा एक स्वीकृत नगरसेवक कमी करून महायुतीचा एक सदस्य वाढवणे आणि वैधानिक तसेच विशेष समित्यांमध्ये एक गट करून आपला एक सदस्य वाढवणे यासाठी भाजप आणि शिवसेनेचा प्रयत्न सुुरु आहे. त्यामुळे शनिवारी हे दोन्ही पक्ष स्वतंत्र नोंदणी न करता एकत्रपणे नोंदणी करू शकतात अशी माहिती मिळत आहे.

Comments
Add Comment

Mumbai: भांडुप रेल्वे स्टेशनच्या परिसरात इमारतीचा भाग कोसळला

मुंबई: मुंबईतील भांडुप रेल्वे स्टेशनच्या परिसरात एका इमारतीचा भाग कोसळला आहे. अत्यंत रहदारीचा असलेल्या या

ठाणे, पुणे नागपूरसह ११ जिल्ह्यांत होणार अप्पर जिल्हाधिकारी कार्यालये

प्रशासकीय भार हलका करण्यासाठी निर्णय; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा मुंबई : राज्यातील वाढती

विधान परिषदेचा अवमान करणार्‍या शरद पवार गटाच्या पदाधिकार्‍याला शिक्षा ?

पदाधिकार्‍याला ३० दिवसांच्या कारावासाची शिफारस घटनात्मक पदांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणे भोवले;

विधिमंडळातील चर्चांकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

विधानसभा अध्यक्षांनी घेतली गंभीर दखल; कठोर कारवाईचा दिला इशारा मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पासारख्या अतिशय

आता महिनाभरात होणार जमीन मोजणी - राज्यात २०० 'खासगी भूमापकांची' नियुक्ती; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

मुंबई : राज्यातील प्रलंबित मोजणी प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी आणि नागरिकांना जलद सेवा देण्यासाठी महसूल

आखाती देशांमध्ये अडकलेल्या तरुणांच्या सुरक्षिततेबाबत विधानपरिषदेत चर्चा

महाराष्ट्र विधानपरिषदेत आज कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲड. निरंजन डावखरे यांनी आखाती (Gulf) देशांमध्ये निर्माण