पाच दिवसांचा आठवडा लागू करा; बँक कर्मचाऱ्यांचा मंगळवारी देशव्यापी संप

सरकारच्या चालढकलीविरोधात आझाद मैदानावर कर्मचाऱ्यांचे आंदोलन


मुंबई : देशभरातील बँक कर्मचाऱ्यांचा ५ दिवसाचा आठवडा करावा या मागणीसाठी देशव्यापी संप मंगळवारी (दि.२७) होणार आहे. या संपादिवशी मुंबई शहरातील बँक कर्मचारी आझाद मैदानात सकाळी ११वाजता एकत्रित जमून सरकार व बँक प्रशासनाच्या विरोधात महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉईज फेडरेशन निदर्शने करणार आहे, अशी माहिती फेडरेशनचे जनरल सेक्रेटरी देवीदास तुळजापुरकर यांनी दिली.


२०१० ला बँकर्सनी पाच दिवसांचा आठवडा ही मागणी तत्वत: मान्य करत असताना दोन शनिवार अर्ध्या दिवसांची सुट्टी रद्द करून उर्वरित दोन शनिवार पूर्ण सुट्टी लागू केली. त्यानंतर ११ व्या द्विपक्ष करारात पुन्हा ही मागणी तत्वतः मान्य करत उर्वरित दोन दिवसांच्या सुट्टीचा प्रस्ताव सरकारला सादर केला जाईल असे मान्य केले. १२ व्या द्विपक्ष करारात पुन्हा ही मागणी मान्य करत शिफारशी सह अंमलबजावणीसाठी हा प्रस्ताव सरकारला सादर केला जाईल असे सांगितले. तसा तो प्रस्ताव सरकारला सादर केला. पण दोन वर्षांपासून सरकारने अंमलबजावणीत चालढकल केली. अद्यापही या संदर्भात कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही. यामुळे बँक कर्मचाऱ्यात संतापाची भावना आहे.


सरकार एकीकडे डिजिटल इंडिया, डिजिटल बँकिंगचे मोठ मोठे दावे करते. पण दुसरीकडे बँक कर्मचाऱ्यांना ५ दिवसांचा आठवडा लागू करावयाचा म्हटले की, ग्राहकांची ढाल पुढे करून तो निर्णय घेण्याचे टाळते. सरकार एलआयसी, रिझर्व्ह बँक, नाबार्ड, सेबी यासर्वांसाठी ५ दिवसांचा आठवडा लागू करते. पण बँक कर्मचाऱ्यांना लागू करत नाही. यासाठी युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने २७ जानेवारीला एकदिवसाच्या देशव्यापी संपाची हाक दिली आहे.

Comments
Add Comment

Mumbai Mayor 2026 : तेजस्वी घोसाळकर की राजश्री शिरवाडकर? आरक्षण जाहीर होताच भाजपच्या 'या' महिला नगरसेविकांची नावे चर्चेत

मुंबई : देशातील सर्वात श्रीमंत आणि प्रतिष्ठेची मानली जाणारी मुंबई महानगरपालिका (BMC) आता पुन्हा एकदा महिला

मुंबई, पुण्यात महिलाराज : राज्यातील २९ महापालिकांच्या महापौर पदासाठी आरक्षण जाहीर

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या महापौर पदासाठीची बहुप्रतिक्षित आरक्षण सोडत अखेर आज मंत्रालयात पार पडली.

Maharashtra Municipal Election Results : महानगरपालिकांचा 'सस्पेन्स' संपला! राज्यातील २९ महापालिकांचे महापौर आरक्षण जाहीर; तुमच्या शहरात कोणत्या प्रवर्गाचा राज?

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर गेली आठवडाभर सुरू असलेली उत्सुकता आता

मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात ७ दिवसीय माघी गणेशोत्स..

मुंबई : मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरात आज आपल्याला प्रचंड प्रमाणात भाविकांची गर्दी दिसून येते. आज माघी

फार्मा कंपनी डॉ रेड्डीज कंपनीचा तिमाही निकाल जाहीर शेअर इंट्राडे ६% उसळला

मोहित सोमण: डॉ रेड्डीज लॅब्स लिमिटेडने आपला तिमाही निकाल जाहीर केला आहे. कंपनीच्या निव्वळ नफ्यात (Net Profit) इयर ऑन इयर

सजली अवघी धरती, पाहण्यास तुमची कीर्ती...माघी गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

माघी गणपती जयंती हा हिंदू धर्मातील अतिशय महत्वाचा दिवस आहे. याच दिवशी आपल्या लाडक्या बाप्पाचा जन्म झाला आहे.