प्रजासत्ताक दिनी राज्यपाल मुंबईत; उपमुख्यमंत्री शिंदे ठाण्यात ध्वजवंदन करणार!

मुख्यमंत्री फडणवीस दादरमध्ये, अजित पवार पुण्यात हजेरी लावणार


मुंबई : राज्यातील विविध जिल्ह्यांचे पालकमंत्री जाहीर झाल्यानंतर प्रजासत्ताक दिनी कोणत्या मंत्र्यांच्या हस्ते कोठे ध्वजवंदन होईल, याची यादी सरकारने जाहीर केली आहे. राज्यातील काही मंत्र्यांना दोन दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते दादर येथील शिवाजी पार्कमध्ये ध्वजवंदनाचा मुख्य कार्यक्रम होईल. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहतील. त्यामुळे गडचिरोली येथील ध्वजवंदनाची जबाबदारी गडचिरोलीचे सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांना देण्यात आली आहे.


उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाणे जिल्ह्याचे आणि मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. ते ठाणे येथे ध्वजवंदन करतील, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पालकमंत्री नितेश राणे ध्वजवंदन करतील. ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्यातील ३६ जिल्ह्यांत ध्वजवंदन करणाऱ्या मंत्र्यांची यादी बुधवारी सामान्य प्रशासन विभागाने जाहीर केली. त्यानुसार, पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार, नागपूरमध्ये चंद्रशेखर बावनकुळे, अहिल्यानगर राधाकृष्ण विखे-पाटील, सांगली चंद्रकांत पाटील, नाशिक गिरीश महाजन, पालघर गणेश नाईक, जळगाव गुलाबराव पाटील, अमरावती दादाजी भुसे, यवतमाळ संजय राठोड, मुंबई (शहर) मंगलप्रभात लोढा, रत्नागिरी उदय सामंत, धुळे जयकुमार रावल, जालना पंकजा मुंडे, नांदेड अतुल सावे, चंद्रपूर अशोक वुईके, सातारा शंभूराज देसाई, मुंबई (उपनगर) आशिष शेलार, वाशिम दत्तात्रय भरणे, लातूर शिवेंद्रसिंह भोसले, सोलापूर जयकुमार गोरे, नरहरी झिरवाळ, भंडारा संजय सावकारे, छत्रपती संभाजीनगर संजय शिरसाट, धाराशिव प्रताप सरनाईक, बुलढाणा मकरंद जाधव, अकोला आकाश फुंडकर, बीड बाबासाहेब पाटील, कोल्हापूर प्रकाश आबिटकर, गडचिरोली आशिष जयस्वाल, वर्धा पंकज भोयर, परभणी मेघना साकोरे - बोर्डीकर, गोंदिया इंद्रनील नाईक, तर नंदूरबार जिल्ह्यात योगेश कदम ध्वजवंदन करतील. रायगडचा मान शिवसेनेच्या भरत गोगावलेंना मिळाल्याने शिवसैनिकांत आनंद व्यक्त केला जात आहे.


स्वराज्याच्या राजधानीत गोगावले करणार ध्वजवंदन : रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा अद्याप सुटलेला नसला, तरी स्वराज्याच्या राजधानीत ध्वजवंदन करण्याचा मान अखेर भरत गोगावले यांना मिळाला आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर सामान्य प्रशासन विभागाने बुधवारी ध्वजवंदन करणाऱ्या मंत्र्यांची जिल्हानिहाय यादी जाहीर केली. त्यात रायगड जिल्ह्यासाठी मंत्री आदिती तटकरे यांच्याऐवजी यंदा गोगावले यांना संधी देण्यात आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने शरद पवारांच्या पक्षाशी सलगी केल्याने, महायुतीने हा निर्णय घेतल्याची चर्चा यानिमित्ताने सुरू झाली आहे.

Comments
Add Comment

एमपीसीबीचा ओसाखा सिटी प्रशासनासोबत सामंजस्य करार

मुंबई : पर्यावरण संवर्धन आणि प्रदूषण नियंत्रणासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) जपानच्या

लोकमान्य टिळक मंडईतील विक्रेत्यांवर कारवाई

नूतनीकरणावरून वाद तीव्र मुंबई : लोकमान्य टिळक मंडईमध्ये कोणतीही पूर्वसूचना किंवा नोटीस न देता वाढीव बांधकामावर

टोल थकबाकीमुळे वाहन सेवा थांबणार

एनओसी, फिटनेस प्रमाणपत्र व नॅशनल परमिटवर बंदी मुंबई : राष्ट्रीय महामार्गांवर प्रवास करणाऱ्या वाहनधारकांसाठी

गुन्ह्यांच्या रेकॉर्डमुळे तुमचे करिअर उद्ध्वस्त झाले

सत्र न्यायालयाचा एमएसडब्ल्यूच्या विद्यार्थ्यांना गंभीर इशारा मुंबई : मुंबईतील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल

प्रशासनालाच पडला पालिका सभागृहाच्या निर्णयाचा विसर

नगरसेवकांची हजेरी बायामेट्रिक पद्धतीने सचिन धानजी मुंबई : मुंबई महापालिकेतील कर्मचाऱ्यांची पुस्तिकेवरील

आशियातील सर्वात मोठा विकेंद्रीत सौर ऊर्जा कार्यक्रम राबवून महाराष्ट्राने रचली यशोगाथा

सौर ऊर्जेच्या माध्यमातून वर्षअखेरपर्यंत १६ गिगा वॅट वीज निर्मिती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस :