शेअर बाजारात तीन दिवसांच्या घसरणीनंतर 'रिबाऊंड' सुटकेचा निःश्वास,सेन्सेक्स ३९७.७४ व निफ्टी १३२.४० अंकांने उसळला

मोहित सोमण: आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात अखेरच्या सत्रातही वाढ झाली आहे. जागतिक साशंकता आज मिटल्यावर त्याचा फायदा बाजारात होताना दिसला. युएस राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ग्रीनलँडवरील व युरोपियन युनियनवरील नरमाईच्या भूमिकेनंतर व विशेषतः ८ फेब्रुवारीपासून लागू होणारी १०% अतिरिक्त टॅरिफची आकारणी रद्द केल्याचा भूराजकीय फायदा शेअर बाजारात होताना दिसला. युएस बाजारासह आशियाई व खासकरुन भारतीय तो परावर्तित झाला. त्यामुळे आज अखेरच्या सत्रात सेन्सेक्स ३९७.७४ अंकाने उसळत ८२३०७.३७ व निफ्टी १३२.४० अंकांने उसळत २५२८९.९० पातळीवर स्थिरावला आहे. सेन्सेक्स व निफ्टी बँक निर्देशांकात उसळी घेतल्याने आज बाजारात आधार पातळी दिवसभरात कायम राहिली होती. खासकरून कालच्या सत्रात ८% पेक्षा अधिक उसळलेला अस्थिरता निर्देशांक (VIX Volatility Index) ३.१२% पातळीवर घसरल्याने दिवसभरात शेअर बाजारातील स्थिरता अधोरेखित होते. निफ्टी व्यापक निर्देशांकात मिडकॅप व स्मॉलकॅप शेअर्समध्ये झालेल्या वाढीसह मिडकॅप १००, निफ्टी २००, निफ्टी ५०० वाढ कायम राहिली आहे. निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात सर्वाधिक वाढ एफएमसीजी, मिडिया, पीएसयु बँक, केमिकल्स, ऑटो निर्देशांकात झाली आहे. तर घसरण कंज्यूमर ड्युरेबल्स, रिअल्टी समभागात झाली आहे.


आज या स्थिरतेचा फायदा शेअर बाजारातच नाही कमोडिटी बाजारातही झाला. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढणारे सोने चांदी आज मोठ्या संख्येने कोसळले ज्यामुळे काही काळ का होईना गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला. कच्च्या तेलाच्या निर्देशांकातही दबाव कमी झाल्याने ते काही प्रमाणात घसरले. सकाळपर्यंत ९१.६२ या निचांकी पातळीवरून रूपयाने इंट्राडे पातळीवर चांगली वापसी केली. त्यामुळे डॉलरच्या तुलनेत रूपयात थेट ७७ पैशाने वाढ झाल्याने बाजार सुस्थितीत असल्याचे स्पष्ट झाले. तसेच आज मिड व स्मॉल कॅप सह लार्जकॅप शेअर्समध्ये झालेल्या वाढीमुळे घरगुती व परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी गुंतवणूक वाढवल्याचेही दिसून आले जे काही दिवसांपासून कंसोलिडेशन स्थितीत नफा बुकिंग करत होते. त्यामुळेच आजचा दिवस बाजारातील गुंतवणूकदारांसाठी सुगीचा असला तरी अद्याप भूराजकीय स्थिती अथवा स्थिती पूर्णपणे अनुकूल नाही.


अखेरच्या सत्रात सर्वाधिक वाढ वारी एनर्जीज (९.२१%), शिंडलर इलेक्ट्रॉनिक्स (७.५३%), मिंडा (७.२६%), वेलस्पून (७.०८%), ट्रायडंट (६.५३%), बँक ऑफ इंडिया (५.६८%), रेडिको खैतान (५.४३%) समभागात झाली असून सर्वाधिक घसरण आयआयएफएल फायनान्स (१३.५०%), पीएlबी हाऊसिंग (७.५५%), एबी लाईफस्टाईल (६.४७%), कल्याण ज्वेलर्स (५.८०%), हिंदुस्थान कॉपर (४.५३%), स्विगी (४.२६%), देवयानी इंटरनॅशनल (३.१३%) समभागात झाली आहे.


आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे हेड ऑफ रिसर्च विनोद नायर म्हणाले आहेत की,'दावोस बैठकीत ग्रीनलँड आणि टॅरिफबाबत राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी केलेल्या सकारात्मक भाष्यांमुळे देशांतर्गत बाजारात तेजी आली. तरीही, रुपयाची सततची कमजोरी आणि सततच्या एफआयआय बहिर्गमन (Foreign Institutional Investors FIIs Outflow) दरम्यान बाजारातील भावना सावध राहिल्या. कॉर्पोरेट कमाईच्या सुरुवातीच्या संचाने सध्याच्या मूल्यांकन पातळीला पाठिंबा देण्यासाठी फारसे काही केले नाही. तरीही, गुंतवणूकदारांनी मजबूत देशांतर्गत मागणी वातावरणामुळे संभाव्य वाढीची शक्यता नाकारली नाही, जी तिमाही कमाई घोषणांच्या आगामी फेरीत अधिक दृश्यमान होऊ शकते. पुढे पाहता, बाजार पुढील संकेतांसाठी आज नंतर अमेरिकेच्या जीडीपी वाढ आणि कोर चलनवाढ डेटा तसेच उद्या होणाऱ्या बीओजे धोरण निर्णयाचे बारकाईने निरीक्षण करतील.'


आजच्या बाजारातील निफ्टी पोझिशनवर भाष्य करताना एलकेपी सिक्युरिटीजचे वरिष्ठ तांत्रिक विश्लेषक रूपक डे म्हणाले आहेत की,'सकारात्मक सुरुवातीनंतर, मजबूत जागतिक संकेतांमुळे निर्देशांक मजबूत झाला. तथापि, त्याला ३८.२०% फिबोनाची रिट्रेसमेंट पातळीजवळ प्रतिकाराचा सामना करावा लागला, ज्यामुळे दिवसाच्या २५४३५ पातळीच्या उच्चांकावरून २५१६८ पातळीपर्यंत घसरण झाली आणि नंतर सत्र श्रेणीच्या मध्यबिंदूजवळ बंद झाला.


जरी निर्देशांक सलग दुसऱ्या दिवशी २०० DMA (,Daily Moving Average DMA) पातळीच्या वर बंद होण्यास यशस्वी झाला, तरी एकूण भावना कमकुवत राहिली आहे, जी १३.३५ वर असलेल्या भारताच्या अस्थिरता (VIX) निर्देशांक वरून दिसून येते.अल्पावधीत, शुक्रवारी निर्देशांक अस्थिर राहण्याची शक्यता आहे. प्रतिकार (Resistance) २५४८०-२५५०० झोनमध्ये आहे, तर समर्थन (Support ) २५१२५ च्या आसपास दिसून येत आहे.'


आजच्या बाजारातील बँक निफ्टीवर भाष्य करताना एलकेपी सिक्युरिटीजचे तांत्रिक विश्लेषक वत्सल भुवा म्हणाले आहेत की,'गुरुवारीच्या सत्रात, बँक निफ्टीने त्याच्या २०-दिवसांच्या SMA जवळ विक्रीचा दबाव पाहिला आणि तो ५०-दिवसांच्या SMA च्या किरकोळ खाली बंद झाला, जो सावध भावना दर्शवितो. तासिक चार्टवर, आर एस आय (Relative Strength RSI ने तेजीच्या क्रॉसओवरमध्ये प्रवेश केला आहे, जो अल्पकालीन पुनर्प्राप्ती प्रयत्नांचे संकेत देतो. तथापि, सध्याचे सेटअप वाढलेले अस्थिरता सूचित करते आणि मागील घसरणीनंतर ट्रेंड रिव्हर्सलऐवजी उसळीला तांत्रिक पुलबॅक म्हणून मानले पाहिजे. जर निर्देशांकाने त्याचा २०-दिवसांचा SMA आणि ५९८०० पातळीवर बंद आधारावर परत मिळवला तरच शाश्वत तेजीचा दृष्टिकोन विचारात घेतला पाहिजे. तोपर्यंत, बँक निफ्टी ५८७००-५९५०० पातळीच्या श्रेणीत व्यापार करेल अशी अपेक्षा आहे.


आजच्या बाजारातील परिस्थितीवर भाष्य करताना एलकेपी सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष रिसर्च विश्लेषक जतीन त्रिवेदी म्हणाले आहेत की,'नंतर रुपया किरकोळ सुधारला आणि ०.०८ पैशांनी वाढून ९१.५७ रूपयांवर पोहोचला, याला देशांतर्गत शेअर बाजारातील अस्थिर पण सकारात्मक सत्राचा पाठिंबा होता. भारतासोबतच्या रचनात्मक व्यापार दृष्टिकोनाचे संकेत देणाऱ्या दावोस येथील अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या टिप्पण्या आणि ग्रीनलँडवरील मऊ सूर यामुळे भावनांना काहीसा दिलासा मिळाला. तथापि, अस्थिरता कायम आहे, रुपया ९१.००-९२.०० रूपयांच्या श्रेणीत व्यापार करण्याची शक्यता आहे.'

Comments
Add Comment

प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथावर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा जयघोष निनादणार

गणेशोत्सव: आत्मनिर्भरतेचे प्रतीक' चित्ररथ सज्ज नवी दिल्ली: भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७७ व्या

दावोसमध्ये महाराष्ट्राने केले तब्बल ३० लाख कोटींचे गुंतवणूक करार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती; १८ देशांमधून राज्यात मोठी गुंतवणूक येणार मुंबई : स्वित्झर्लंडमधील

आताची सर्वात मोठी बातमी: सरकारची कर्मचाऱ्यांचे पगार दणदणीत वाढणार वेतन आयोगाकडे 'या' मोठ्या शिफारशी

प्रतिनिधी: आठवे वेतन आयोगाबात आताची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठे गिफ्ट

आयडब्ल्यूडीसी ३.०' अंतर्देशीय जलमार्ग विकासाला नवी दिशा देणार

कोची : अंतर्देशीय जल वाहतूक (आयडब्ल्युटी) क्षेत्रातील यशावर प्रकाश टाकण्यासाठी आणि भविष्यातील दृष्टिकोन

वायू गुणवत्ता मापन प्रणाली न बसणाऱ्या प्रकल्पांची बांधकामे थांबवली

तब्बल १०६ बांधकामांना बजावल्या स्टॉप वर्कची नोटीस मुंबई : मुंबईत सुरु असलेल्या सर्व बांधकाम प्रकल्पांच्या

कोळंबी उत्पादन आणि मत्स्यव्यवसाय विकासासाठी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक संपन्न

महाराष्ट्राचे मंत्री नितेश राणे यांची उपस्थिती नवी दिल्ली: देशातील मत्स्यव्यवसाय क्षेत्राचा कायापालट