बस पुरवण्यासह चार्जिंग स्टेशनचे कामही पुरवठादाराकडून रखडले

ठोस कारवाई करण्यास एसटी महामंडळ धजावत नसल्याची चर्चा


मुंबई :राज्य परिवहन (एसटी) महामंडळाच्या ई-बस प्रकल्पाचा मोठा गाजावाजा करण्यात आला असला तरी प्रत्यक्षात चित्र निराशाजनक आहे. ३१ डिसेंबरपर्यंत अपेक्षित एक हजार गाड्यांपैकी २५ टक्के गाड्या ताफ्यात दाखल झालेल्या नाहीत. पुरवठादाराकडून बस पुरवण्यासह चार्जिंग स्टेशनचे कामही रखडले आहे. वारंवार कालमर्यादा ओलांडलेल्या पुरवठादारांवर ठोस कारवाई करण्यास एसटी महामंडळ धजावत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.


केंद्रीय अनुदानावर एसटी महामंडळाच्या ताफ्यातील ३० टक्के बसगाड्या विजेवर धावणाऱ्या करण्यासाठी पाच हजार १५० ई-बस भाडेतत्त्वावर घेण्याचा निर्णय महामंडळाने घेतला. १३ फेब्रुवारी २०२४ पासून या ताफ्यात येण्यास सुरुवात झाली. वर्षभरानंतर केवळ २२२ गाड्या दिल्याने महामंडळाने पुरवठादाराला नाममात्र चार कोटी रुपयांचा दंड ठोठावला. एप्रिल २०२५ पासून दरमहा २०० गाड्या देण्याचे आश्वासन कंत्राटदाराने महामंडळाला दिले, मात्र डिसेंबरअखेर ५१५ गाड्यांची भर पडली.


३१ डिसेंबर २०२५ अखेर ७३७ बसगाड्या एसटी ताफ्यात दाखल झाल्या आहेत. यात नऊ मीटरच्या २६० व १२ मीटरच्या ४७७ अशा गाड्यांचा समावेश आहे. परिणामी, एसटी प्रवासी अन्य प्रवासी वाहनांकडे वळत आहेत. एसटीच्या वाहन स्थितीनुसार ३१ डिसेंबरपर्यंत एसटी ताफ्यात १५ हजार २२१ बसगाड्या आहेत. यातील निम्म्याहून अधिक आयुर्मान पूर्ण झालेल्या गाड्यांचा समावेश आहे. यामुळे मार्गात बंद पडणे, नादुरुस्त असणे, गाड्यांची स्थिती बिकट असणे अशा तक्रारी वाढत आहेत.


राज्यातील १७१ ठिकाणी उच्च क्षमतेचे चार्जिंग स्टेशन उभारणीचे कामदेखील याच बस-पुरवठादाराकडे आहे. डिसेंबरअखेर केवळ ३१ ठिकाणी अशी स्टेशन कार्यान्वित करण्यात आली आहेत.


एसटी महामंडळाला बसची गरज : एसटी कर्मचाऱ्यांचा दोन वर्षांपूर्वी झालेल्या संपाची एसटी महामंडळाला मोठी झळ बसली आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा २०२१ मध्ये झालेला संप सुमारे ५४ दिवस चालला होता, जो २८ ऑक्टोबर २०२१ रोजी सुरू झाला आणि २० डिसेंबर २०२१ रोजी संपला, ज्यात कर्मचाऱ्यांनी शासनात विलीनीकरण आणि पगारवाढीच्या मागण्यांसाठी आंदोलन केले होते. तब्बल दोन महिने बस जाग्यावरच उभ्या राहिल्याने अनेक बसवर परिणाम झाल्याचे कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

Comments
Add Comment

बारावी–दहावी परीक्षेआधी महाराष्ट्र बोर्डाचा निर्णय, नियम, मार्गदर्शन, प्रेरणा सर्व काही यूट्यूब चॅनेलवर

मुंबई : बारावी आणि दहावी परीक्षांच्या आधी, महाराष्ट्र बोर्डाने विद्यार्थी, शाळा आणि परीक्षा केंद्र अधिकाऱ्यांना

टीईटीच्या निकालात यंदा ८.५३ टक्के उमेदवार पात्र

पावणेचार लाख उमेदवारांनी दिली परीक्षा उत्तीर्ण बंधनकारक केल्याने वाढली संख्या मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या

महापौरपदाची सोडत चक्राकार पद्धतीने?

या पध्दतीत खुल्या गटातील महापौराची शक्यता कमी मुंबई : मुंबईच्या महापौरपदासाठी येत्या २२ जानेवारी रोजी आरक्षण

श्री सिद्धिविनायक मंदिरात ‘माघी गणेश जयंती महोत्सवा'स सुरुवात

गायन, वादन, शोभायात्रांसह आठवडाभर चालणार धार्मिक सोहळा मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरात

माघी श्रीगणेशोत्सव २०२६ करता कृत्रिम तलावांसह विविध सुविधा सज्ज

मुंबई : माघी श्रीगणेशोत्सव २२ जानेवारी २०२६ पासून साजरा करण्यात येणार आहे. हा उत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा

मुंबई पालिकेच्या शैक्षणिक इतिहासात नवा टप्पा

सीबीएसईच्या पहिल्या १० वीच्या बॅचसाठी ३६६ विद्यार्थी तयार मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागात