विश्वचषकापूर्वी भारतीय संघाची परीक्षा

नागपुरात आज न्यूझीलंडविरुद्ध पहिली टी-२० लढत ; पांड्या, बुमराह, श्रेयसवर लक्ष


नागपूर : न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत पराभवाचा धक्का बसल्यानंतर, आता भारतीय संघ बुधवारपासून सुरू होणाऱ्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी सज्ज झाला आहे. आगामी टी-२० वर्ल्ड कपपूर्वीची ही भारताची शेवटची आंतरराष्ट्रीय मालिका असल्याने, संघ निवडीसाठी आणि सराव चाचपणीसाठी ही 'अंतिम संधी' मानली जात आहे. नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदानावर बुधवारी संध्याकाळी ७ वाजता हा थरार रंगणार आहे.


मालिकेपूर्वीच भारतीय संघाला मोठे धक्के बसले आहेत. तिलक वर्मा पहिल्या तीन सामन्यांना मुकणार आहे, तर वॉशिंग्टन सुंदरला संपूर्ण मालिकेतून बाहेर व्हावे लागले आहे. या संकटकाळात मधल्या फळीत श्रेयस अय्यर दोन वर्षांनंतर पुनरागमन करत आहे. आयपीएल २०२५ मध्ये पंजाब किंग्सला फायनलपर्यंत नेणाऱ्या श्रेयसकडून भारतीय चाहत्यांना अपेक्षा आहेत.


खराब फॉर्मामुळे शुभमन गिलला संघातून डच्चू देण्यात आल्याने, सलामीला संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा ही स्फोटक जोडी दिसण्याची शक्यता आहे. कर्णधार सूर्यकुमार यादव सध्या फॉर्मसाठी संघर्ष करत असून, वर्ल्ड कपच्या दृष्टीने त्याला या मालिकेत लयीत येणे अनिवार्य आहे. दुसरीकडे, अष्टपैलू हार्दिक पांड्या सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असून विजय हजारे ट्रॉफीतील आपली लय तो कायम ठेवण्यास उत्सुक आहे. वन डे मालिकेत विश्रांती मिळाल्यानंतर तो ट्वेंटी-२० मालिकेतून संघात पुनरागमन करणार आहे. त्याच्यासोबतीला अक्षर पटेल, शिवम दुबे ही अष्टपैलू खेळाडूंची फौज आहे. वॉशिंग्टनच्या जागी संघात स्थान मिळालेल्या रिंकू सिंगसाठी ही मोठी संधी आहे. तोही पहिल्या सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये दिसेल. जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग या जलदगती गोलंदाजांसह वरुण चक्रवर्थी हा फिरकीपटू खेळेल.




  • भारताचा संभाव्य प्लेइंग इलेव्हन : संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या, रिंकू सिंग, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह.

  • न्यूझीलंड संघाविषयी : मिचेल सँटनरच्या नेतृत्वाखाली किवी संघात काही अनुभवी खेळाडूंचे पुनरागमन झाले आहे.

  • फलंदाजी : डेव्हन कॉनवे आणि फिन ॲलन ही जोडी सुरुवातीला आक्रमक फटकेबाजी करण्यासाठी प्रसिद्ध आहे. मधल्या फळीत डॅरेल मिचेल आणि ग्लेन फिलिप्स सारखे स्फोटक फलंदाज आहेत.

  • अष्टपैलू : कर्णधार मिचेल सँटनर आणि मायकेल ब्रेसवेल फिरकीसह फलंदाजीतही योगदान देऊ शकतात.

  • वेगवान गोलंदाजी : लॉकी फर्ग्युसन आपल्या वेगाने भारतीय फलंदाजांना अडचणीत आणू शकतो. त्याला मॅट हेन्री आणि बेन सिअर्स साथ देतील.

  • संभाव्य प्लेइंग इलेव्हन : फिन ॲलन, डेव्हन कॉनवे (यष्टीरक्षक), मार्क चॅपमन, डॅरेल मिचेल, ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मिचेल सँटनर (कर्णधार), मॅट हेन्री, लॉकी फर्ग्युसन, ईश सोढी, बेन सिअर्स.


वर्ल्ड कपची तालीम


टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची ही शेवटची तालीम आहे. दुखापतींचे सावट आणि वरिष्ठ खेळाडूंचा फॉर्म या पार्श्वभूमीवर, कर्णधार सूर्यकुमार यादव कोणत्या ११ खेळाडूंना मैदानात उतरवतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




  • पहिला टी-२० : २१ जानेवारी, नागपूर (आज)

  • दुसरा टी-२० : २३ जानेवारी, रायपूर

  • तिसरा टी-२० : २५ जानेवारी, गुवाहाटी

  • चौथा टी-२० : २८ जानेवारी, विशाखापट्टणम

  • पाचवा टी-२० : ३१ जानेवारी, तिरुवनंतपुरम

Comments
Add Comment

ICC ODI Rankings: कोहलीचा अव्वल सिंहासनावरून पायउतार, डॅरिल मिशेल नंबर-वन

ICC ODI Rankings : आयसीसी वनडे क्रमवारीत मोठा आणि मनाला वेदना देणारा बदल पाहायला मिळाला असून भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी

ड्रीम-११ आणि माय-११ नंतर गुगलचा बीसीसीआयला आधार

मुंबई : बीसीसीआय पूर्वी ऑनलाइन गेमिंग कंपन्यांकडून भरपूर उत्पन्न मिळवत होते. मात्र आता अशावेळी बोर्ड हे नुकसान

बॅडमिंटनपटू सायना नेहवालची निवृत्ती

गुडघ्याच्या दुखापतीने कारकिर्दीला पूर्णविराम मुंबई : भारतीय बॅडमिंटनला जागतिक नकाशावर मानाचे स्थान मिळवून

‘ए+’ श्रेणीतून विराट, रोहित, बुमराहला डच्चू?

बीसीसीआयच्या करारात ट्विस्ट : मानधनात कपात होण्याची शक्यता नवी दिल्ली : न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मैदानावर

कर्णधार सूर्यकुमार यादव गाठणार ‘शतकी’ टप्पा

नागपूर : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेचा थरार बुधवारपासून नागपूरच्या विदर्भ

‘गचाळ क्षेत्ररक्षणामुळे मालिका गमाविली’

मुंबई : भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका पार पडली. मालिकेतील तिसरा सामना