शिवसेनेचे 'मिशन मुंबई महापालिका'

कडोंमपा, उल्हासनगरमध्ये भाजपला ‘चेकमेट’ करण्याचा डाव


ठाणे/ कल्याण/ उल्हासनगर : मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदावरून भाजप आणि शिवसेनेत सुरू असलेल्या स्पर्धेचा परिणाम एमएमआरडीए क्षेत्रातील इतर महत्त्वाच्या महानगरपालिकांवरही दिसू लागला आहे. मुंबईचे महापौरपद मिळाले नाही, तर कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगर महानगरपालिकांमध्ये शिवसेनेकडून भाजपला 'चेकमेट' करण्याच्या हालचाली सुरू झाल्याची चर्चा आहे.


ठाण्यातही महापौरपदावरून ताण:


ठाणे महानगरपालिकेत शिंदे सेनेने ७५ जागा जिंकत एकहाती बहुमत मिळवले आहे, तर भाजपला केवळ २८ जागांवर समाधान मानावे लागले. तरीही भाजपकडून ठाण्यात किमान दोन वर्षांसाठी महापौरपदाची मागणी होत असल्याची माहिती आहे. त्यामुळे मुंबईनंतर आता ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगरमध्येही भाजप-शिवसेना यांच्यात महापौरपदावरून संघर्ष वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.


कल्याण-डोंबिवलीत स्वतंत्र डावपेच?


कडोंमपामध्ये एकूण १२२ नगरसेवक असून शिवसेनेचे ५३, तर भाजपचे ५० नगरसेवक निवडून आले आहेत. युतीत निवडणूक लढवूनही दोन्ही पक्षांतील संख्याबळात फारसा फरक नसल्याने भाजपकडून सत्तेत समसमान वाटपाची मागणी होण्याची शक्यता आहे. मात्र, शिवसेना महापौरपद व प्रमुख पदे सोडण्यास तयार नसल्याचे समजते. त्यामुळे श्रीकांत शिंदे यांच्याकडून इतर पक्षांच्या नगरसेवकांशी संपर्क वाढवण्यात येत असल्याची चर्चा असून, उबाठातील एका नगरसेवकाच्या भेटीने राजकीय वातावरण तापले आहे.


उल्हासनगरमध्ये वंचितसोबत युतीची शक्यता :


उल्हासनगर महानगरपालिकेत भाजपचे ३७, तर शिंदे गटाचे ३६ नगरसेवक निवडून आले आहेत. अंबरनाथप्रमाणे येथेही शिंदे गट भाजपला डावलून वेगळी सत्ता स्थापन करू शकतो. वंचित बहुजन आघाडीच्या दोन नगरसेवकांनी शिंदे गटाला पाठिंब्याचे पत्र दिल्याची माहिती असून, त्यामुळे उल्हासनगरमध्ये शिवसेनेचा महापौर बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Comments
Add Comment

Dhurandhar 2:धुरंदरमध्ये 2 दिसणार हा अभिनेता..,प्रेक्षकांचा उत्साह वाढणार..

धुरंधर २: हिंदी चित्रपटसृष्टीत नुकताच प्रदर्शित झालेला ‘धुरंधर’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड यशस्वी

अंगावर काटा येणारा ‘दलदल’चा ट्रेलर प्रदर्शित, भूमी पेडणेकरची भूमिका थरकाप उडवणारी

मुंबई : सिरीयल किलरच्या कथांवर आधारित थ्रिलर नेहमीच प्रेक्षकांना खिळवून ठेवतात. याच धाटणीतील एक नवी वेब सिरीज

Pension Scheme India : पेन्शनधारकांना सरकारने दिलयं मोठ गिफ्ट..नक्की काय ?

Pension Scheme India: केंद्र सरकारने पेन्शनधारकांसाठी दिलासादायक निर्णय घेत अटल पेन्शन योजनेचा वेळ वाढवण्याची मंजुरी दिली

Mumbai Bellasis Bridge : मुंबई सेंट्रल परिसरातील वाहतुक कोंडीला दिलासा;मुंबई सेंट्रलमधील हा ब्रिज सुरु होणार...

मुंबई: मुंबई सेंट्रल परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्याच्या दृष्टिकोनातून मुंबईकरांसाठी मोठी आनंदाची बातमी

रणपति शिवराय स्वारी आग्रा टीमकडून ‘छत्रपतींना’ मानाचा मुजरा

रणपति शिवराय स्वारी आग्रा टीमकडून ‘छत्रपतींना’ मानाचा मुजरा मुंबई :  छत्रपती शिवराय केवळ धैर्य आणि

शिक्रापूर पोलिसांची मोठी कारवाई..सापळा रचून दोन युवक गजाआड

पुणे : पुणे जिल्ह्यातील शिरूर सणसवाडी परिसरात अमली पदार्थांच्या विरोधात शिक्रापूर पोलिसांनी मोठी कारवाई केली