पोलिसांच्या या कारवाईत पुणे-नगर महामार्गावर गांजा विक्रीसाठी आलेल्या दोन युवकांना पोलिसांनी सापळा रचून रंगेहात पकडण्यात आले . युवकांकडून गांजाचा साठा आणि दुचाकी जप्त करण्यात आली आहे.
पकडण्यात आलेल्या आरोपींमध्ये किरण दत्तात्रय इंगळे (वय २३, रा. दहिवडी) याच्यासह एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. सुरुवातीला या दोघांनी पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली, मात्र त्यांच्या जवळील पिशवीची झडती घेतली असता पोलिसांना गांजाच्या पुड्या आढळून आल्या. पोलिसांनी आरोपींजवळील एमएच १२ वायपी ०२५३ क्रमांकाची दुचाकी, दोन मोबाईल फोन आणि गांजाचा साठा असा मुद्देमाल जप्त केला आहे.