Dhurandhar 2:धुरंदरमध्ये 2 दिसणार हा अभिनेता..,प्रेक्षकांचा उत्साह वाढणार..

धुरंधर २: हिंदी चित्रपटसृष्टीत नुकताच प्रदर्शित झालेला ‘धुरंधर’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड यशस्वी ठरला.तसचं रणवीर सिंग, अक्षय खन्ना आणि संजय दत्त यांच्या दमदार अभिनयामुळे चित्रपटाने प्रेक्षकांची मनं जिंकली आणि जगभरात तुफान कमाई केली. या यशानंतर आता दिग्दर्शक आदित्य धरच्या ‘धुरंधर २’कडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

‘धुरंधर’च्या यशानंतर दुसऱ्या भागाबाबत सतत चर्चा सुरू असतानाच आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. रिपोर्ट्सनुसार, आदित्य धरचा आवडता अभिनेता विक्की कौशल ‘धुरंधर २’मध्ये स्पेशल अपीयरन्स अर्थात कॅमियो करताना दिसू शकतो. ही बातमी समोर येताच सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे ‘धुरंधर’ आणि ‘उरी : द सर्जिकल स्ट्राईक’ यांच्यातील कनेक्शनमुळे या चर्चेला अधिक बळ मिळाले आहे. ‘धुरंधर’च्या पहिल्या भागाच्या क्लायमॅक्समध्ये रणवीर सिंगच्या पात्राचे नाव जसकीरत सिंह रांगी दाखवण्यात आले होते. हेच नाव ‘उरी’ चित्रपटात कीर्ती कुल्हारीने विक्की कौशलच्या पात्राच्या पतीचे नाव म्हणून घेतले होते. त्यामुळे ‘धुरंधर युनिव्हर्स’ तयार होत असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, विक्की कौशल ‘धुरंधर २’मध्ये मेजर विहान शेरगिलच्या भूमिकेत काही अॅक्शन सीन्स करताना दिसू शकतो. जरी त्याची भूमिका छोटी असली, तरी ती कथेसाठी महत्त्वाची ठरणार असल्याचे सांगितले जात आहे. या वरुन सोशल मिडीयावर चर्चा सुरु आहे. आदित्य धर या चित्रपटाबाबत सर्व तपशील गुप्त ठेवत असून, प्रेक्षकांसाठी काही मोठे सरप्राइजेस तयार करण्यात येत आहेत.
Comments
Add Comment

अंगावर काटा येणारा ‘दलदल’चा ट्रेलर प्रदर्शित, भूमी पेडणेकरची भूमिका थरकाप उडवणारी

मुंबई : सिरीयल किलरच्या कथांवर आधारित थ्रिलर नेहमीच प्रेक्षकांना खिळवून ठेवतात. याच धाटणीतील एक नवी वेब सिरीज

Bigg Boss Marathi 6 :बिग बॉस मध्ये राधा पाटीलचा मोठा खुलासा; तीन वर्षांच्या लिव्ह-इन रिलेशनशिप कबुली

Bigg Boss Marathi 6 : बिग बॉस मराठी सीझन ६ मधील स्पर्धक व नृत्यांगना राधा पाटील सध्या बिग बॅासच्या घरात आणि बाहेरही चर्चेचा

रणपति शिवराय स्वारी आग्रा टीमकडून ‘छत्रपतींना’ मानाचा मुजरा

रणपति शिवराय स्वारी आग्रा टीमकडून ‘छत्रपतींना’ मानाचा मुजरा मुंबई :  छत्रपती शिवराय केवळ धैर्य आणि

२०२६ प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला (शनिवार/रविवार) ओटीटी वर येणारे प्रोग्राम

या प्रजासत्ताक दिनी, धैर्य, न्याय, ओळख आणि बदल दर्शविणाऱ्या कथा पुन्हा एकदा पाहून स्वातंत्र्याचा सन्मान करूया.

धुमधडाक्यात प्रसाद ओकच्या मुलगा साखरपुडा संपन्न; कोण आहे होणारी सून ?

गेल्या काही दिवसांपासून मराठी फ्लीट इंडस्ट्रीमध्ये लग्नाचे वारे वाहताना दिसत आहेत. सध्या सोशल मीडियावर प्रसाद

गमन : जीवनाला कलाटणी देणारे स्थलांतर

मुंबई :  स्थलांतराचा अनुभव आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात एकदा तरी येतोच येतो, पण हा केवळ एक अनुभव नसून त्यावेळी