मुंबई लोकल प्रवाशांसाठी मोठा प्रकल्प, बोरिवली–विरार पट्ट्यात रेल्वे स्थानकांचा कायापालट

मुंबई : मुंबईच्या पश्चिम रेल्वे मार्गावर प्रवाशांच्या सोयीसाठी मोठ्या पायाभूत बदलांचा आराखडा अंतिम टप्प्यात आला आहे. बोरिवली ते विरारदरम्यान रेल्वे वाहतूक अधिक वेगवान आणि सुरक्षित करण्यासाठी स्वतंत्र मार्गिका उभारण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे. या प्रकल्पामुळे लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्या वेगळ्या मार्गावर धावणार असून, गर्दी आणि विलंब कमी होण्याची अपेक्षा आहे.


कांदिवली ते बोरिवलीदरम्यान पाचवी आणि सहावी मार्गिका पूर्ण झाल्यानंतर आता पश्चिम रेल्वेने पुढील टप्प्याला सुरुवात केली आहे. सुमारे २६ किलोमीटरच्या या संपूर्ण पट्ट्यात मोठ्या प्रमाणावर बांधकाम आणि पुनर्रचना केली जाणार आहे. या कामासाठी आतापर्यंत विविध टप्प्यांमध्ये वाहतूक ब्लॉक्स घेण्यात आले होते.



२१८४ कोटींचा खर्च, २०२८ पर्यंत पूर्ण होणार प्रकल्प


या संपूर्ण योजनेसाठी अंदाजे २१८४ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून २०२८ पर्यंत काम पूर्ण करण्याचं लक्ष्य ठेवण्यात आलं आहे. विद्यमान मार्गिकांच्या पश्चिम बाजूला दोन नवीन रेल्वे ट्रॅक उभारले जाणार आहेत. यासोबतच तीन मोठे पूल, १६ लहान पूल आणि एक नवीन भुयारी मार्ग तयार केला जाणार आहे.


वसई खाडीवरील महत्त्वाचे पूल क्रमांक ७३ आणि ७४ या प्रकल्पाचा भाग असून, त्यातील एका पुलाच्या पायाभरणीचे काम सुरू झाले आहे. तर भाईंदर परिसरातील जुना आणि जीर्ण झालेला ऐतिहासिक पूल हटवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.



या स्थानकांमध्ये मोठे बदल


भाईंदर आणि वसई रोड स्थानकांमध्ये मोठ्या प्रमाणावर फेरबदल केले जाणार आहेत. नव्या प्लॅटफॉर्मची उभारणी, सध्याच्या फलाटांचा पुनर्वापर आणि प्रवाशांच्या हालचाली सोप्या व्हाव्यात यासाठी रचना बदलली जाणार आहे. दहिसर, मीरा रोड, नायगाव, नालासोपारा आणि विरार या स्थानकांवरही सुधारणा केल्या जाणार आहेत.


दहिसरचे प्लॅटफॉर्म उत्तरेकडे, भाईंदरचे पश्चिम दिशेला तर विरारचे प्लॅटफॉर्म थोडेसे दक्षिणेकडे हलवले जाणार आहेत. या बदलांमुळे स्थानकांतील गर्दी कमी होईल आणि गाड्यांच्या थांबण्याचा वेळ कमी होण्यास मदत होणार आहे.



प्रवाशांना काय फायदा होणार?


या प्रकल्पामुळे उपनगरीय लोकल आणि एक्सप्रेस गाड्यांसाठी स्वतंत्र मार्ग उपलब्ध होतील. परिणामी वेळापत्रक अधिक शिस्तबद्ध होईल, विलंब कमी होतील आणि रोजच्या प्रवासात मुंबईकरांना दिलासा मिळेल. पश्चिम रेल्वेवरील हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबईतील रेल्वे प्रवास अधिक गतिमान होण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

Arun Datte : गुरुत्वाकर्षणालाही चकवणारी कला!

मूर्तिकार अरुण दत्ते या वर्षी काय नवा 'बॅलन्स' साधणार ? मुंबई : गणेशोत्सवाचे वेध सर्वत्र लागले असून यंदाच्या

Makarand Jadhav-Patil : नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना ८६.६५ कोटींची मदत; मंत्री मकरंद जाधव-पाटील

नाशिक विभागातील नाशिक, अहिल्यानगर व जळगाव जिल्ह्यांसाठी शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई : “खरीप २०२५ मध्ये

Hasan Mushrif : किडनी, यकृत प्रत्यारोपणाच्या सुविधा शासकीय रुग्णालयांत वाढविण्यावर भर द्या; वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

मुंबई : राज्यातील गरजू रुग्णांना किडनी व यकृत प्रत्यारोपणाची सुविधा शासकीय रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून

Bharat Gogawale : ‘व्हीबी जी राम जी’ योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कामांना गती द्या; मंत्री भरत गोगावले

मुंबई : ‘व्हीबी जी राम जी’ योजनेच्या माध्यमातून राज्यातील गरजू नागरिकांना अधिकाधिक रोजगार उपलब्ध करून

Prabhadevi Water Pipeline : प्रभादेवीत एलफिन्स्टन पुलाजवळ जलवाहिनी फुटली

मुंबई : प्रभादेवीत एलफिन्स्टन पुलाजवळ जलवाहिनी फुटल्यामुळे हजारो लिटर पाणी वाहून गेले. सेनापती बापट मार्गावर ही

Arrested for throwing eggs : माझगावच्या मोरया गणपतीच्या मिरवणुकीवर अंडी फेकल्याप्रकरणी दानिश शेर खानला अटक, भायखळा पोलिसांची कारवाई

Mumbai : २३ ऑगस्ट रोजी माझगावच्या मोरया गणपती मंडळाच्या मिरवणुकीत अंडी फेकल्याच्या आरोपानंतर मुंबईच्या भायखळा