माघी गणेश जयंतीमुळे जलवाहिनी वळवण्याचे काम ढकला

भाजपाच्या माजी अध्यक्षाची आयुक्तांकडे मागणी


मुंबई : अंधेरी पूर्व विभागात मेट्रो कामा मूळे काही जलवाहिनी जलवाहिनीच्या जोडणीचे काम हाती घेण्यात येत आहे. हे काम २० ते २१ जानेवारी दरम्यान नियोजित करण्यात आले आहे. परंतु २२ जानेवारीपासून मागे गणेश जयंती असल्याने या उत्सवाच्या काळात मोठ्या प्रमाणात नागरिकांना पाण्याची समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे नेमक्या माघी गणेश जयंती च्या तोंडावर के पूर्व व इतरत्र पाणी पुरवठा ठप्प करून नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून हाती घेण्यात येणारे जलवाहिनी दुरुस्ती तथा जोडणीचे काम पुढे ढकलण्यात यावे,अशा प्रकारची मागणी भाजपच्या वतीने करण्यात आलेली आहे. भाजपचे माजी नगरसेवक अभिजीत सामंत यांनी महापालिका आयुक्तांना अशा प्रकारचा निवेदन देत ही मागणी केलेली आहे.


सामंत यांनी महापालिका आयुक्त यांना दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की या जगवाही दुरुस्तीच्या कामा नंतर किमान २ दिवस पाणी पुरवठा नियमित होत नाही हा अनुभव आहे. त्यातच येत्या २२ जानेवारी रोजी माघी गणेश जयंती आहे.पण महापालिका प्रशासन अशी नियोजित कामे नेमक्या हिंदू सणाच्या तोंडावर सुरु करतात व त्यामूळे सण साजरे करताना हिंदू समाजास अडचणी येतात. त्यामुळे माघी गणेश जयंतीचा उत्सव लक्षात महापालिका जल अभियंता विभागाने हाती घेतले नियोजित जल जोडणीचे काम पुढे ढकलावे अशी मागणी सामंत यांनी केली आहे.


मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) च्‍या मेट्रो लाईन ७ अ प्रकल्पाच्या कामासाठी २ हजार ४०० मिलीमीटर व्यासाच्या अपर वैतरणा मुख्य जलवाहिनीचा काही भाग वळविण्यात आला आहे. या वळविण्यात आलेल्या भागाचे छेद - जोडणी (क्रॉस कनेक्शन) चे काम के पूर्व विभागात मुंबई महानगरपालिकेमार्फत करण्यात येणार आहे. ही कार्यवाही मंगळवार, २० जानेवारी २०२६ रोजी सकाळी ९ वाजेपासून गुरुवार, २२ जानेवारी २०२६ रोजी पहाटे ५ वाजेपर्यंत (एकूण ४४ तास) सुरु राहणार आहे. परिणामी, जी उत्‍तर, के पूर्व, एस विभाग, एच पूर्व आणि एन विभागातील काही भागांमध्ये वेगवेगळ्या वेळापत्रकानुसार कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. नियमित पाणीपुरवठ्याच्‍या वेळेतही बदल होणार आहे. तसेच, काही भागांमध्ये पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे, याची नागरिकांनी कृपया नोंद घ्‍यावी, असे आवाहन मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्‍या वतीने करण्‍यात आले होते.

Comments
Add Comment

मुंबईत भर रस्त्यात पत्नीची पतीने केली हत्या

मुंबई : अंधेरी पूर्व भागातील सागबाग रोडवरील आराध्या रुग्णालयासमोर शनिवार २८ फेब्रुवारी २०२६ रोजी संध्याकाळी

माजी खासदाराचे निधन, मुख्यमंत्र्यांनी पाठवला शोकसंदेश

लातूर : लातूर पॅटर्नचे शिल्पकार, माजी खासदार, माजी कुलगुरू आणि प्रख्यात विचारवंत डॉ. जनार्दन वाघमारे यांचे

कोकणच्या विकासाची नवी नांदी

मुंबई-विजयदुर्ग रो-रो सेवेला मंत्री नितेश राणे यांनी दाखवला हिरवा झेंडा प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद,

कॅनडाला महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी अनेक संधी

मुंबई : जगात पर्यावरणाचे संवर्धन आणि हवामान बदलाच्या संकटाला सामोरे जात प्रगती साधण्याचे आव्हान उभे आहे.

मध्य रेल्वेच्या १८ होळी विशेष गाड्यांची घोषणा

मुंबई : होळी सणाच्या निमित्ताने होणारी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे छत्रपती शिवाजी महाराज

BMC : मुंबईत शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन

मुंबई : जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार आदरणीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या