भाजपाच्या माजी अध्यक्षाची आयुक्तांकडे मागणी
मुंबई : अंधेरी पूर्व विभागात मेट्रो कामा मूळे काही जलवाहिनी जलवाहिनीच्या जोडणीचे काम हाती घेण्यात येत आहे. हे काम २० ते २१ जानेवारी दरम्यान नियोजित करण्यात आले आहे. परंतु २२ जानेवारीपासून मागे गणेश जयंती असल्याने या उत्सवाच्या काळात मोठ्या प्रमाणात नागरिकांना पाण्याची समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे नेमक्या माघी गणेश जयंती च्या तोंडावर के पूर्व व इतरत्र पाणी पुरवठा ठप्प करून नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून हाती घेण्यात येणारे जलवाहिनी दुरुस्ती तथा जोडणीचे काम पुढे ढकलण्यात यावे,अशा प्रकारची मागणी भाजपच्या वतीने करण्यात आलेली आहे. भाजपचे माजी नगरसेवक अभिजीत सामंत यांनी महापालिका आयुक्तांना अशा प्रकारचा निवेदन देत ही मागणी केलेली आहे.
सामंत यांनी महापालिका आयुक्त यांना दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की या जगवाही दुरुस्तीच्या कामा नंतर किमान २ दिवस पाणी पुरवठा नियमित होत नाही हा अनुभव आहे. त्यातच येत्या २२ जानेवारी रोजी माघी गणेश जयंती आहे.पण महापालिका प्रशासन अशी नियोजित कामे नेमक्या हिंदू सणाच्या तोंडावर सुरु करतात व त्यामूळे सण साजरे करताना हिंदू समाजास अडचणी येतात. त्यामुळे माघी गणेश जयंतीचा उत्सव लक्षात महापालिका जल अभियंता विभागाने हाती घेतले नियोजित जल जोडणीचे काम पुढे ढकलावे अशी मागणी सामंत यांनी केली आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) च्या मेट्रो लाईन ७ अ प्रकल्पाच्या कामासाठी २ हजार ४०० मिलीमीटर व्यासाच्या अपर वैतरणा मुख्य जलवाहिनीचा काही भाग वळविण्यात आला आहे. या वळविण्यात आलेल्या भागाचे छेद - जोडणी (क्रॉस कनेक्शन) चे काम के पूर्व विभागात मुंबई महानगरपालिकेमार्फत करण्यात येणार आहे. ही कार्यवाही मंगळवार, २० जानेवारी २०२६ रोजी सकाळी ९ वाजेपासून गुरुवार, २२ जानेवारी २०२६ रोजी पहाटे ५ वाजेपर्यंत (एकूण ४४ तास) सुरु राहणार आहे. परिणामी, जी उत्तर, के पूर्व, एस विभाग, एच पूर्व आणि एन विभागातील काही भागांमध्ये वेगवेगळ्या वेळापत्रकानुसार कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. नियमित पाणीपुरवठ्याच्या वेळेतही बदल होणार आहे. तसेच, काही भागांमध्ये पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे, याची नागरिकांनी कृपया नोंद घ्यावी, असे आवाहन मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले होते.






