राजकीय फोडाफोडी; उबाठाचे नितीन खंबायत श्री मलंगगडच्या जंगलात ?

नऊ जण सुरक्षित; उबाठातर्फे दोन नगरसेवकांना नोटीस; कारवाईचा इशारा


कल्याण : कल्याण–डोंबिवली महानगरपालिकेत संख्याबळ वाढवण्यासाठी शिवसेनेने (शिंदे गट) उबाठाचे नगरसेवक फोडण्याचे काम सुरू केले आहे. उबाठातील दोन नगरसेवक शिवसेनेच्या (शिंदे गट) संपर्कात असल्याचा दावा केला जात आहे. फोडाफोडीपासून दूर कल्याण पू.मधील उबाठाचे नवनिर्वाचित नगरसेवक नितीन खंबायत श्री मलंगगड परिसरातील जंगलात लपून बसल्याची खळबळजनक चर्चा रंगली आहे. दरम्यान उबाठाचे जिल्हाप्रमुख शरद पाटील यांनी दोघांनाही नोटीस दिली आहे. उद्या पक्षाच्या गट स्थापनेकच्या बैठकीस उपस्थित राहावे, अन्यथा पक्ष विरोधी काम केल्याने पक्षाकडून कारवाई केली जाईल असा इशारा देण्यात आला आहे.


कडोंमपाचा निकाल जाहीर झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी उबाठाचे नवनिर्वाचित नगरसेवक मधुर म्हात्रे यांनी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यासह खा. श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली होती. त्यानंतर उबाठाच्या नगरसेविका ॲड. कीर्ती ढोणे यांनीही खा. श्रीकांत शिंदेंची भेट घेतल्याने खळबळ उडाली. या घडामोडींमुळे उबाठासह भाजपमध्येही तीव्र नाराजी आहे.


कल्याणमधील शिवसेनेचे (शिंदे गट) काही मातब्बर नगरसेवक स्वतःच्या प्रभागात पराभूत झाले असताना, त्यांच्या विजयासाठी ताकद लावण्याऐवजी फोडाफोडीवर भर दिला जात असल्याची टीका होत आहे. कल्याण पू. येथील नितीन खंबायत हे उबाठाचे नवनिर्वाचित नगरसेवक आहेत. त्यांना शिवसेनेत(शिंदे गट) सामील करून घेण्यासाठी दोन दिवसांपासून सतत दबाव टाकला जात असल्याचा आरोप उबाठाडून होत आहे. पक्षांतर बंदी कायद्याची चिंता करू नका, आम्ही सर्व बघून घेऊ, असे सांगण्यात आल्याचेही म्हटले जात आहे. दरम्यान, उबाठाचे कल्याण लोकसभा जिल्हा संघटक अभिजीत सावंत यांनी नऊ नगरसेवक सुरक्षित असल्याचा दावा करत ते आमच्या वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात आहेत असे सांगितले.

Comments
Add Comment

अंबरनाथमध्ये चिमुकलीवर भटक्या कुत्र्याचा हल्ला; पण भावाला वाचवलं

अंबरनाथ : भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या त्रासाचे आणखी एक गंभीर उदाहरण अंबरनाथमधून समोर आले आहे. श्वानाने लहान

व्यावसायिक एलपीजीच्या कोट्यात ५० टक्क्यांपर्यंत वाढ; हॉटेल आणि उद्योगांना मोठा दिलासा

ठाणे : देशातील व्यावसायिक एलपीजी (LPG) गॅसच्या पुरवठ्याबाबत केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून,

ठाणे जिल्ह्यात पमी गुरुचा दबदबा, व्हायरल झाले अनेक रील

ठाणे : नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यात अशोक खरात नावाच्या भोंदू बाबाने धुमाकूळ घातला. या भोंदू बाबाला पोलिसांनी

बदलापूर ते नवी मुंबई थेट लोकलचा प्रस्ताव

बदलापूर : बदलापूर येथून थेट नवी मुंबईपर्यंत लोकल सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने मोठी हालचाल सुरू झाली आहे.

कडोंमपाचा ३ हजार १८६ कोटींचा शिलकी अर्थसंकल्प

कोणतीही कर आणि दरवाढ नाही राज्य सरकारच्या अनुदानावर मदार कल्याण : चार वर्षांच्या प्रशासकीय राजवटीनंतर

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

ठाणे : डोंबिवली आणि ठाकुर्ली या दोन स्थानकांदरम्यान सिग्नल यंत्रणेत झालेल्या बिघाडामुळे मध्य रेल्वेच्या मुख्य