बंगळूरुत स्थानिक निवडणुका बॅलेट पेपरवर

राज्य निवडणूक आयोगाचा निर्णय


कर्नाटक राज्य निवडणूक आयोगाने २५ मे नंतर होणाऱ्या बंगळूरु येथील स्थानिक संस्थांच्या निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनऐवजी बॅलेट पेपर वापरण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रेटर बंगळूरु एरिया स्थानिक संस्थेच्या निवडणुकीत बॅलेट पेपरवर मतदान पार पडणार आहे. कर्नाटकचे मुख्य निवडणूक अधिकारी जी. एस संगरेशी यांनी ही घोषणा केली. येत्या मे-जून महिन्यात याठिकाणी निवडणूक लागणार आहे. जिल्हा पंचायत-पंचायत समिती निवडणूकही बॅलेट पेपरवर मुख्य निवडणूक अधिकारी जी. एस संगरेशी यांनी म्हटलं की, या वर्षीच्या अखेरीस होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकाही बॅलेट पेपरने घेतल्या जातील. १० वी, १२ वीच्या परीक्षा संपल्यानंतर २५ मे झाल्यावर स्थानिक निवडणुका घोषित केल्या जातील. यावेळी ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरचा वापर केला जाईल असं
त्यांनी सांगितले.

निवडणूक आयोगाने ईव्हीएम न वापरता बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याचं कारण स्पष्ट केले नाही. बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्यास कायद्यात कुठेही अडचण नाही. त्यामुळे या निवडणुकीत बॅलेटचा वापर केला जाईल इतकेच निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले. इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिनसोबत छेडछाड होत असल्याचा आरोप सातत्याने काँग्रेससह प्रमुख विरोधी पक्ष करतात. त्यामुळे काँग्रेस शासित राज्यात अशाप्रकारे बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याचा संदर्भ ईव्हीएमवरील आरोपांशी जोडला जातो.

तर बॅलेटच्या वापरावर बंदी नाही. अमेरिकेसारख्या विकसित देशातही बॅलेट पेपरवर निवडणूक घेतली जाते. भारतात केवळ विधानसभा, लोकसभा निवडणुकीसाठी ईव्हीएमचा वापर केला जातो. राज्य निवडणूक आयोगाने सर्वांशी सल्लामसलत करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बॅलेटवर घेण्याचा निर्णय घेतला आहे असं संगरेशी यांनी स्पष्ट केले.
Comments
Add Comment

युएईच्या अध्यक्षांच्या तीन तासांच्या भारत दौऱ्यात अनेक महत्त्वाच्या करारांवर स्वाक्षऱ्या

नवी दिल्ली : यूएईचे राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांच्या दिल्ली दौऱ्याने भारत-यूएई संबंधांना

नदी पुनरुज्जीवनासाठी महाराष्ट्राचे मोठे पाऊल

देशातील पहिल्या राज्य नदी पुनरुज्जीवन प्राधिकरणाचे मंत्री पंकजा मुंडे यांनी केले सादरीकरण नवी दिल्ली :

Indian Army : यावर्षी कर्तव्य पथावर दिसणार हे 'सहा शस्त्र' जी पाकिस्तानसह कोणत्याही शत्रूला भरवतील धडकी

नवी दिल्ली : भारताच्या कर्तव्य पाथ (प्रजासत्ताक दिन परेड) मध्ये यंदा देशाच्या संरक्षण आणि सामर्थ्याचे प्रदर्शन

भारतावर पुन्हा होणार दहशवादी हल्ला ? व्हायरल झालेल्या व्हिडीओमागचं सत्य आलं समोर

कराची : सोशल मीडियावर पाकिस्तानातून भारताला उद्देशून केलेले धमकीचे व्हिडीओ नवे नाहीत. मात्र सध्या व्हायरल होत

मोकाट कुत्र्यांचा हल्ला; मुरादाबादमध्ये चार वर्षांच्या मुलीचा मृत्यू, परिसर हादरला

मुरादाबाद : उत्तर प्रदेशातील मुरादाबादमध्ये मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्याने एक हृदयद्रावक घटना घडली आहे. चार

Nitin Nabin : "नितीन नवीन आता माझेही बॉस!"; भाजपच्या नव्या अध्यक्षांच्या सन्मानार्थ पंतप्रधान मोदींचे भावूक उद्गार

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा नितीन नवीन यांनी स्वीकारल्यानंतर आयोजित