ठाण्यातही महापौर पदावरून भाजपने थोपटले दंड

“दोन वर्षे महापौर द्या, अन्यथा विरोधात बसून सत्तेवर अंकुश ठेवू”


ठाणे : ठाणे महापालिका निवडणुकीत शिवसेनेने (शिंदे गट) एकहाती सत्ता मिळवली असली तरी, निवडणुकीपूर्वी शिवसेना–भाजप युती असल्याने आता महापौर पदासाठी भाजपने दबाव वाढवला आहे. जागा वाटपात भाजपने नमते घेतले होते पण आता ठाण्यात भाजपचा १०० टक्के स्ट्राईक रेट असल्यामुळे जनतेला दिलेल्या आश्वासनांचे पालन करण्यासाठी महत्त्वाची पदे मिळणे आवश्यक असल्याचा इशारा भाजपचे आमदार संजय केळकर आणि ठाणे निवडणूक प्रभारी आमदार निरंजन डावखरे यांनी दिला आहे.


भाजपची मागणी : महापौर पद हवेच!


ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेने शिंदे गटाने ८७ जागा लढवून ७५ जिंकल्या, तर भाजपने ३९ जागा लढवून २८ जागा जिंकल्या. त्यामुळे ठाण्यात भाजपने १००% स्ट्राईक रेट राखला आहे. या निकालानंतर महायुतीचा महापौर होणार असल्याचे स्पष्ट झाले असताना, भाजपनेही महापौर पदाची मागणी केली, ज्यामुळे युतीत तणाव वाढल्याचे दिसून येत आहे.


भाजपचा इशारा : “नाही तर विरोधी बाकावर बसू”


माध्यमांनी आ. डावखरे यांना विचारले की “दोन वर्ष महापौर मागणार का?”, तेव्हा त्यांनी स्पष्ट “हो” असे उत्तर दिले. ठाणेकरांना भाजपने निवडणुकीदरम्यान अनेक आश्वासने दिली असल्यामुळे, तेवढेच महत्त्वाचे पद भाजपला मिळावे, असे डावखरे म्हणाले.


त्यांनी याशिवायही इशारा दिला: “महापौर पद न मिळाल्यास आम्ही विरोधी बाकावर बसून पारदर्शक प्रशासनासाठी चौकीदाराची भूमिका बजावू” असा इशारा देत याबाबत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनाही कळविले असल्याचे आमदार डावखरे यांनी स्पष्ट केले.


दरम्यान, भाजपच्या या पवित्र्यावर शिंदेच्या सेनेचे खासदार नरेश म्हस्के यांना छेडले असता त्यांनी, आ. निरंजन डावखरे हे भाजपाचे ठाण्यातील नेते आहेत. त्यामुळे त्यांच्या पक्षातील नगरसेवकांना जास्तीत जास्त पदे कशी देता येतील, हे पाहणे त्यांचे काम आहे आणि त्यानुसार त्यांनी महापौर पदाची मागणी करणे गैर नाही. तरीही, याबाबतचा निर्णय वरिष्ठ नेते घेतील, असेही म्हस्के म्हणाले.

Comments
Add Comment

भिवंडीत श्वानदंश झालेल्या मुलाचा मृत्यू

भिवंडी : श्वानदंश झालेल्या १२ वर्षीय हमीद खान याचा उपचारादरम्यान मृत्यूची घटना भिवंडीत घडली आहे. १० जानेवारीला

ठाण्यातील भव्य त्रिमंदिर भाविकांसाठी खुले; तीन दिवसांच्या प्राणप्रतिष्ठेनंतर दर्शनास सुरुवात

ठाणे : ठाणे शहरात उभारण्यात आलेले भव्य त्रिमंदिर अखेर भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे. तीन दिवस चाललेल्या

ठाणे-घोडबंदर रोडचे रुंदीकरण होणार?

मीरा-भाईंदर (वार्ताहर): ठाणे-घोडबंदर रस्ता ६० मीटर रुंद करण्यासाठी आवश्यक असणारी भूसंपादनाची प्रक्रिया

कोयना प्रकल्पग्रस्त सुविधांपासून वंचित

ठाणे ( प्रतिनिधी): साडेसहा दशकांपूर्वी सातारा जिल्ह्यातील कोयना धरण प्रकल्पात बाधित झालेल्या सुमारे ८०हून अधिक

ठाणे शहरात उभारणार १९ ई-वाहन चार्जिंग स्टेशन्स

ठाणे (प्रतिनिधी) : महापालिका क्षेत्रातील इलेक्ट्रिक वाहनधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. शहरात ई-वाहन वापराला

सायबर दृष्टी सेलचा डिजिटल साक्षरता प्रवास

कल्याण (प्रतिनिधी) : बी. के. बिर्ला नाईट कॉलेज, कल्याण येथील सायबर दृष्टी सेल यांच्या विद्यमाने नागरिकांमध्ये