स्मार्टफोनवर येणार ९ नवीन इमोजी

युनिकोड १८.० अपडेटमध्ये नव्या इमोजींचा समावेश


आजच्या डिजिटल जगात आपण शब्दांपेक्षा इमोजीचा वापर अधिक करतो. सध्या आपल्याकडे ३ हजार ९०० हून अधिक इमोजी उपलब्ध असताना, २०२६ मध्ये यात आणखी ९ नवीन इमोजींची भर पडणार आहे. युनिकोडकडून या नवीन इमोजींची यादी समोर आली आहे. यावर्षी सप्टेंबर २०२६ पर्यंत खालील इमोजी तुमच्या कीबोर्डवर दिसू शकतात.

नव्या इमोजी सप्टेंबरपर्यंत होणार उपलब्ध

सप्टेंबर २०२६ पर्यंत युनिकोड १८.० अपडेटमध्ये या इमोजींना अंतिम मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. एकदा युनिकोडने मंजुरी दिली की, अॅपल, सॅमसंग आणि गुगल या कंपन्या आपापल्या पद्धतीने या इमोजी डिझाईन करतील. त्यामुळे प्रत्यक्ष फोनमध्ये येण्यासाठी २०२६ अखेर किंवा २०२७ उजाडू शकते.

 

१) डोळे मिचकावणारा चेहरा (स्क्वंटिंग फेस ) : हा चेहरा हसताना किंवा काहीतरी बारीक नजरेने पाहताना वापरता येईल.

२) डावीकडे दाखवणारा अंगठा (लेफ्टवार्ड थंब) : तिकडे बघ किंवा दिशा दर्शवण्यासाठी उपयुक्त.

३) उजवीकडे दाखवणारा अंगठा (राईटवार्ड थंब) : हा देखील दिशा दर्शवण्यासाठी वापरता येईल.

४) मोनार्क फुलपाखरू (मोनार्क बटरफ्लाय) : सध्याच्या फुलपाखरापेक्षा हे अधिक गडद आणि वेगळ्या प्रजातीचे असेल.

५) लोणच्याची फोड (पिकल) : ही इमोजी सोशल मीडियावर सर्वात जास्त चर्चेत आहे. काहींच्या मते, ही इमोजी वांग्याच्या (ऑबर्जिन) इमोजीची जागा घेऊ शकते.

६) दीपगृह (लाईटहाऊस) : समुद्रकिनारी असलेल्या प्रकाशस्तंभाची ही नवी इमोजी असेल.

७)  उल्का (मेटिअर) : अवकाशातील पडत्या ताऱ्यासाठी किंवा उल्केसाठी ही नवी डिझाईन असेल.

८)  रबर (इरेझर) : चुका सुधारण्यासाठी किंवा खोडण्यासाठी वापरता येणारे रबर.

९)  जाळे (नेट विथ अ हँडल) : फुलपाखरे किंवा मासे पकडण्यासाठी वापरले जाणारे हँडल असलेले जाळे.
Comments
Add Comment

Mulund Metro Slab Collapse: मुलुंडमधील मेट्रो दुर्घटनेत एमएमआरडीएची मोठी कारवाई; थेट पाच जणांना अटक

मुलुंड पश्चिम येथे शनिवारी (१४ फेब्रुवारी) दुपारी बांधकाम सुरू असलेल्या सिमेंट मेट्रोच्या खांबाचा काही भाग

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंची चिंता वाढली; चिरंजीव ३ दिवसांपासून रुग्णालयात

उद्धव ठाकरे यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उद्धव ठाकरे यांच्या मुलाची प्रकृती

Mhada Lottery Home: म्हाडाकडून सर्वसामान्यांना दिलासा; पैसे भरण्याच्या नियमात मोठा बदल

मुंबई: आगामी काळात 'अॅडव्हान्स कॉन्ट्रीब्युशन स्कीम' अंतर्गत मुंबईत घरे उभारण्यात येणार आहेत. खासगी बिल्डर

Mahashivratri Wishes : संयम आणि शक्तीचा सुरेख संगम म्हणजे महाशिवरात्र, महाशिवरात्रीनिमित्त द्या मराठीतून शुभेच्छा

मुंबई : आजच्या धकाधकीच्या जीवनात महाशिवरात्र आपल्याला संयम, ध्यान आणि आंतरिक शांततेचे महत्त्व समजावून सांगते.

त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेण्यासाठी जाणाऱ्या भाजप खासदाराच्या रेंज रोव्हरला भर रस्त्यात लागली आग

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राज्यात अग्नितांडव सुरु आहे. अशातच आता त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन

म्हाडाकडे महापालिकेच्या मालमत्ता कराची ६३ कोटींची थकबाकी

मुंबई: मुंबई महापालिकेने आता मालमत्ता कराची थकीत रक्कम वसूल करण्याची मोहिम हाती घेत मोठ्या थकबाकीदारांना