उबाठात राहूनही ९ जणांची उमेदवारी नाकारली, ९ जणांचा पराभव
मुंबई (सचिन धानजी) : शिवसेनेत जुलै २०२२ रोजी मोठा राजकीय भूकंप होत असून एकनाथ शिंदे मुख्य नेता असलेल्या शिवसेनेत मुंबईतील काही माजी नगरसेवकांनी प्रवेश केला. सन २०१७मध्ये निवडून आलेल्या तब्बल ५५ माजी नगरसेवकांनी शिवसेनेसह भाजपमध्ये प्रवेश केला. यातील काहींना उमेदवारी मिळाली तर काहींच्या नातेवाईकांना तर काहींचे आरक्षणामुळे प्रभाग केले तर काहींचे प्रभाग भाजपने आपल्याकडे घेतल्याने त्यांना आपल्या नगरसेवक पदावर पाणी सोडावे लागले. त्यातही निवडणूक लढलेल्या काही नगरसेवक आणि त्यांच्या कुटुंबांतील सदस्याचा पराभव झाला, त्यामुळे त्यांना आपले गड गमावावे लागले असले तरी काहींनी पुन्हा निवडून येत आपली लोकप्रियता आजही कायम असल्याचे दाखवून दिले. दरम्यान, उबाठाने निष्ठावान ९ जणांचे पत्ते कापले तर ९ जणांचा पराभव पत्कारावा लागला.
मुंबईत शिवसेनेचे सन २०१७च्या सार्वत्रिक निवडणुकीत ८४ नगरसेवक निवडून आले होते. त्यातत मनसेच सहा आणि जात पडताळणीमध्ये प्रतिस्पर्धी पक्षाचे नगरसेवक बाद झाल्यामुळे त्या रिक्त जागेवर शिवसेनेच्या उमेदवारांची वर्णी लागल्याने त्यांची एकूण संख्या १०२ एवढी झाली होती. यातील दोन माजी नगरसेवक मृत पावल्यामुळे ही संख्या १०० एवढी होती. परंतु उबाठाच्या १०० माजी नगरसेवकांपैंकी टप्प्या टप्प्याने शिवसेनेत प्रवेश करत निवडणुकीपर्यंत ही संख्या ५० एवढी झाली होती. त्यामुळे सन २०१७मध्ये निवडून आलेल्यांपैंकी ५० नगरसेवक शिवसेनेकडे तर ५० नगरसेवक हे उबाठाकडे राहिले होते. त्यातील शीतल म्हात्रे, बाळकृष्ण ब्रीद, गीता सिंघण रेखा रामवंशी, प्रविण शिंदे,संजय अगलदरे, उमेश माने, उपेंद्र सावंत, चंद्रावती मोरे, परमेश्वर कदम, ऋतुजा तारी, संतोष खरात, दिनेश कुबल आदींना उमेदवारी देण्यात आली नव्हती.
उबाठाचे शिवसेनेसह भाजपातही काही माजी नगरसेवकांनी प्रवेश केला होता. यामध्ये आकांक्षा शेट्ये, अर्चना भालेराव,श्रीकांत शेट्ये, अनिल कोकीळ आणि तेजस्वी घोसाळकर आदीनींही प्रवेश केला. त्यामुळे १०० पैंकी ५५ माजी नगरसेवकांनी शिवसेना,भाजपात प्रवेश केला होता, त्यामुळे उबाठाकडे ४५ माजी नगरसेवक शिल्लक राहिले होते, त्यातील काहींना उबाठाने उमेदवारी दिली तर काहींना घरी बसवले.
काँग्रेसमधून शिवसेना,भाजपा गेले, पण काय झाले?
काँग्रेसमधून सुप्रिया सुनील मोरे, पुष्पा कोळी, वाजिद कुरेशी आदींनी शिवसेनेत प्रवेश केला होता, हे तिन्ही उमेदवार पराभूत झाले आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रसमधून शिवसेनेत प्रवेश केलेल्या वकील शेख यांचा पराभव झाला असून नाझिया सोफिया यांचा विजय झाला आहे. काँग्रेसमधून रवी राजा,राजेंद्र नरवणकर, जगदीश अमीन कुट्टी, श्वेता कोरगावकर आदींनी प्रवेश केला होता, यातील श्वेता कोरगावकर आणि जगदीश अमीन कुट्टी यांची पत्नी जगदीश्वरी हे विजयी झाले असून रवी राजा आणि राजेंद्र नरवणकर यांचे नातेवाईक हे पराभूत झाले आहे.
उबाठातून शिवसेनेत प्रवेश केलेल्यांपैंकी किती सभागृहात किती घरात बसले
कोण जिंकले :संजय घाडी, हर्षद कारकर यांची पत्नी दीक्षा, रिध्दी खुरसुंगे यांची कन्या डॉ अदिती, संध्या विपुल दोशी, स्वप्निल टेंबवलकर यांची पत्नी वर्षा, सुषमा राय यांचे पुत्र रितेश, रुपाली आवळे यांचे पती सुरेश, अंजली संजय नाईक, अश्विनी माटेकर, किरण लांडगे, विजयेंद्र शिंदे ,दिलीप लांडे यांची पत्नी शैला, अमेय घोले, मंगेश सातमकर यांची पत्नी मानसी, दत्ता नरवणकर यांची पत्नी वनिता, यशवंत जाधव यांची पत्नी यामिनी
कोण पडले : एकनाथ हुडारे यांची कन्या वृषाली, आत्माराम चाचे यांच्या नातेवाईक रिशिता चाचे, विनया सावंत, प्रतिभा खोपडे, राजुल पटेल, राजू पेडणेकर, सायली सदानंद परब, सुवर्णा करंजे, राजराजेश्वरी रेडकर, अश्विनी दिपकबाबा हांडे, वैशाली शेवाळे, सान्वी तांडेल, रामदास कांबळे यांची पत्नी पुजा , समाधान सरवणकर, सुजाता सानप, प्रिती पाटणकर
उबाठातून भाजपात गेले नगरसेवक
कोण जिंकले : तेजस्वी घोसाळकर, जगदीश अमीन यांची पत्नी जगदीश्वरी, अर्चना भालेराव
कोण पडले : रवी राजा, राजेंद्र नरवणकर यांचे नातेवाईक, आकांक्षा शेट्ये, ईश्वर तायडे, श्रीकांत शेट्ये यांची पत्नी,
उमेदवारी नाकारत घरी बसवले :
शीतल म्हात्रे, बाळकृष्ण ब्रीद, गीता सिंघण, रेखा रामवंशी, प्रविण शिंदे,संजय अगलदरे, उमेश माने, उपेंद्र सावंत, चंद्रावती मोरे, परमेश्वर कदम, ऋतुजा तारी, संतोष खरात, दिनेश कुबल
उबाठात राहिलेले किती विजयी, किती पराभूत
विजयी : गीता भंडारी, सुहास वाडकर, तुळशीराम शिंदे,संगीता सुतार, प्रमोद सावंत,श्रवरी सदा परब,रोहिणी कांबळे, प्रज्ञा भूतकर, दिपमाला बढे, स्नेहल मोरे यांचे पती सुनील, तुकाराम पाटील यांची पत्नी स्वरुपा, विठ्ठल लोकरे, अनिल पाटणकर यांची पत्नी मिनाक्षी,चित्रा सांगळे, प्रविणा मोरजकर, मिलिंद वैद्य, टी जगदीश, हर्षला मोरे, विशाखा राऊत, आशिष चेंबुरकर यांची पत्नी, हेमांगी वरळीकर, उर्मिला पांचाळ, श्रध्दा जाधव, सचिन पडवळ, रमाकांत रहाटे, सोनम जामसूतकर,
पराभूत : सुजाता पाटेकर,शुभदा गुडेकर यांची कन्या, योगेश भोईर, संदीप नाईक, हाजी हालिम खान याची पत्नी, समिक्षा सक्रे, निधी शिंदे यांचे पती प्रमोद, स्मिता गावकर, वसंत नकाशे यांची पत्नी,
उमेदवारी नाकारली : शेखर वायंगणकर, दिपाली गोसावी, रमेश कोरगावकर, कोमल जामसंडेकर, मरिअम्मल थेवर, स्नेहल आंबेकर, सिंधु मसुरकर, दत्ता पोंगडे, अरुंधती दुधवडकर