निर्यातक्षम राज्यांत महाराष्ट्र आघाडीवर

नीती आयोगाच्या निर्यात निर्देशांकात तामिळनाडू मागे


नवी दिल्ली : नीती आयोगाच्या निर्यात सज्जता निर्देशांक - २०२४ मध्ये (ईपीआय) महाराष्ट्राने तामिळनाडूला मागे टाकत पहिले स्थान पटकावले आहे. देशातील पाच राज्यांत गुजरात, उत्तर प्रदेश आणि आंध्र प्रदेशचा अनुक्रमे तीन, चार आणि पाचवा क्रमांक लागतो.


केंद्र सरकारने बुधवारी जाहीर केलेल्या यादीनुसार, महाराष्ट्राने तामिळनाडूकडून पहिले स्थान संपादन केले आहे. आर्थिक वर्ष २०२२ ते २०२४ या कालावधीत केलेल्या कामगिरीवरून ही यादी तयार करण्यात आली आहे. आर्थिक वर्ष २०२२ मध्ये तामिळनाडूचा पहिला क्रमांक होता. खालोखाल महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात आणि हरियाणाचा क्रमांक लागत होता. आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, ‘ईपीआय २०२४’ची क्रमवारी ‘ईपीआय २०२२’शी तुलना करण्यायोग्य नाही. कारण, राज्यांचे मूल्यांकन करण्याची संपूर्ण कार्यपद्धती बदलली आहे. लहान राज्ये, ईशान्येकडील राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या क्रमवारीत, उत्तराखंडने अव्वल स्थान पटकावले आहे. त्यानंतर जम्मू आणि काश्मीर, नागालँड, दादरा आणि नगर हवेली, दमण आणि दीव, गोवा यांचा क्रमांक लागतो. निर्यात हे विकासाच्या प्रमुख चालकांपैकी एक आहे. भारताला ३० लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था बनण्यासाठी निर्यातीचा वाटा ७.५ लाख कोटी डॉलरवर न्यावा लागेल. त्यात ज्या राज्यांची निर्यात सज्जता आहे. ज्या राज्यांची तशी क्षमता आहे, त्यांची या यादीत निवड करण्यात आल्याचे ते म्हणाले.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राने राबविलेल्या विविध धोरणांमुळे निर्यातीत पहिला क्रमांक पटकावण्यात राज्य यशस्वी ठरल्याचे नीती आयोगाने म्हटले आहे. ऑटोमोबाईल्स, अभियांत्रिकी वस्तू, औषधनिर्माण, रसायने, कापड आणि आयटी सेवा यासारख्या क्षेत्रांत राज्याने धडाकेबाज कामगिरी केली आहे. तसेच, मुंबई आणि जवाहरलाल नेहरू बंदर यासारख्या प्रमुख बंदरांच्या उपस्थितीने निर्यात वाढवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. निर्यातदारांसाठी एकल-खिडकी प्रणाली, लॉजिस्टिक्स सुधारणा, औद्योगिक क्लस्टर्सचा विकास आणि जिल्हा-विशिष्ट उत्पादन ओळख, यासारख्या उपक्रमांमुळे राज्याची निर्यात तयारी बळकट झाल्याचे नीती आयोगाने म्हटले आहे.

Comments
Add Comment

गिफ्ट सिटीमध्ये १५ देशांच्या परकीय चलनांमध्ये करता येतात व्यवहार

भारतातील एक शहर जिथे रुपयांऐवजी वापरले जाते परकीय चलन नवी दिल्ली : आपल्याला भारतात कोठेही उद्योग करायचा असेल तर

मणिकर्णिका घाटावर बुलडोजर

दोन खासदारांसह अनेकांवर गुन्हा वाराणसी : वाराणसीतील मणिकर्णिका घाटावर सुशोभीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे.

बदरी-केदारसह चारधाममध्ये मोबाईल बंदी ,प्रशासनाची रील आणि फोटोवर कडक नजर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तराखंड सरकारने चारधाम यात्रेची मर्यादा आणि शांतता अबाधित राखण्यासाठी यावर्षी

कर्तव्यपथावर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा जयघोष

प्रजासत्ताक दिनी अवतरणार आत्मनिर्भर 'गणेशोत्सवा'चा भव्य चित्ररथ नवी दिल्ली(वृत्तसंस्था ) : राजधानी नवी दिल्ली

भाजप हीच देशाची पहिली पसंती: पंतप्रधान मोदी

सुशासनासाठी जनतेचा विक्रमी जनादेश! देशाला आता केवळ विकास आणि 'गुड गव्हर्नन्स' हवा दिसपुर (वृत्तसंस्था): आज भाजप

Papa Rao Killed in Encounter : नक्षलवाद्यांचा अजून ईक्का ठार..पोलीसांची मोठी कारवाई.

छत्तीसगड: छत्तीसगडमधील नक्षलविरोधी मोहिमेत सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे व तेथील नागरिकांना ही दिलासा