मोहित सोमण: डिफ्रेल टेक्नॉलॉजीज कंपनीचा शेअर आज बाजारात सूचीबद्ध (Listed) झाला आहे. कंपनीला तुलनात्मकदृष्ट्या मोठा प्रतिसाद मिळाल्याने गुंतवणूकदारांनी सूचीबद्ध होतानाही मोठा प्रतिसाद दिला आहे. मूळ प्राईज बँड असलेल्या ७४ रूपयांच्या तुलनेत २८.३८% प्रिमियमसह शेअर ९५ रूपयाला सूचीबद्ध झाला आहे. १३.७७ कोटी रूपयांच्या या छोट्या बीएसई एसएमई आयपीओला तब्बल १०५.५४ पटीने सबस्क्रिप्शन मिळाले होते. तज्ञांच्या मते हा शेअर ९१ रूपयाला सूचीबद्ध होणे अपेक्षित होते. त्याहूनही अधिक प्रतिसाद गुंतवणूकदारांनी दिला आहे. ९ ते १३ जानेवारी दरम्यान हा आयपीओ गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध होता. तर आज १९ जानेवारी रोजी शेअर सूचीबद्ध झाला असून बीएसई एसएमई प्रवर्गात शेअर सूचीबद्ध झाला आहे.
आयपीओत ०.१९ कोटी शेअरचा पूर्णपणे फ्रेश इशू नव्हता. त्यामुळे या आयपीओत ऑफर फॉर सेलसाठी शेअर उपलब्ध नव्हते. किरकोळ गुंतवणूकदारांना किमान २३६८०० रुपयांची गुंतवणूक (३२०० शेअर) अनिवार्य करण्यात आली होती. आयपीओआधी कंपनीने ३.८४ कोटीची गुंतवणूक अँकर गुंतवणूकदारांकडून प्राप्त केली होती. ऑक्टोबर २०२३ मध्ये स्थापन झालेली डेफ्रेल टेक्नॉलॉजीज लिमिटेड ही कंपनी रबरचे भाग आणि घटक, ज्यात रबर होसेस आणि असेंब्ली, रबर प्रोफाइल्स आणि बीडिंग्ज, आणि मोल्डेड रबर पार्ट्स यांची निर्मिती करते. तिच्या उत्पादनांचा वापर ऑटोमोटिव्ह, रेल्वे आणि संरक्षण यांसारख्या उद्योगांमध्ये होत असून कंपनी आपल्या ग्राहकांना प्रमाणित उत्पादने तसेच त्यांच्या कार्यात्मक गरजांनुसार तयार केलेले विविध उपाय असे दोन्ही पर्याय प्रदान करते. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार या आयपीओतील मिळणाऱ्या निधीचा वापर मशिनरी खरेदी करण्यासाठी, सोलार पॅनलच्या उभारणीसाठी (Installation), दैनंदिन कामकाजासाठी करण्यात येणार आहे. कंपनीचे सध्याचे बाजार भांडवल (Market Capitalisation) ५१.९८ कोटी रुपये आहे.