जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी भाजपचे चिपळूणमधील उमेदवार जाहीर

जि.प.साठी तीन, तर पं.स. साठी सात उमेदवार निवडणूक रिंगणात


भाजपचे नेते माजी आमदार डॉ. विनय नातू, भाजपचे नेते प्रशांत यादव आणि जिल्हाध्यक्ष सतीश मोरे यांच्याकडून उमेदवारांना विजयासाठी शुभेच्छा


चिपळूण : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांची नावे आज जाहीर करण्यात आली. भाजप-शिवसेना युतीच्या माध्यमातून चिपळूणमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक लढविली जाणार असून भाजपकडून तीन जिल्हा परिषद गट तर सात पंचायत समिती गणात उमेदवार उभे केले जाणार आहेत. भाजपचे नेते माजी आमदार डॉ. विनय नातू, भाजपचे नेते प्रशांत यादव आणि जिल्हाध्यक्ष सतीश मोरे यांच्या नेतृत्वाखाली या निवडणुका लढविल्या जाणार आहेत.


नगरपालिका निवडणुकीत चांगले यश मिळाल्याने भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये चैतन्याचे वातावरण आहे. तसेच, महानगरपालिकांमध्ये राज्यभरात भाजपला मोठे यश मिळाल्याने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक लढविण्याकरिता आणि युतीच्या विजयाचा भगवा फडविण्याकरिता भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते सज्ज झाले आहेत. भाजपचे नेते माजी आमदार डॉ. विनय नातू, भाजपचे नेते प्रशांत यादव आणि जिल्हाध्यक्ष सतीश मोरे यांच्या नेतृत्वाखाली या निवडणुका लढविण्यासाठी उमेदवारही सज्ज झाले असून, आज भारतीय जनता पार्टीने आपले उमेदवार जाहीर केले.


यात पेढे जिल्हा परिषद गटासाठी सौ. दीप्ती दीपक महाडिक, खेर्डी जिल्हा परिषद गटासाठी सौ. रावी सतीश मोरे आणि उमरोली जिल्हा परिषद गटासाठी योगेश चंद्रकांत शिर्के यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तसेच कळवंडे पंचायत समिती गणासाठी सौ. सायली सुनील वाजे, खेर्डी पंचायत समिती गणासाठी विनोद जयवंत भुरण, पिंपळी खुर्द पंचायत समिती गणासाठी सौ. सुप्रिया सुनील देवरुखकर, वेहेळे पंचायत समिती गणासाठी राम दशरथ राजेशिर्के, शिरगाव पंचायत समिती गणासाठी सौ. नयना उदय पवार, गुढे पंचायत समिती गणासाठी सौ. आराध्या अमोल रावणंग आणि कुटरे पंचायत समिती गणासाठी कु. अक्षता राजाराम होवले यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.


भाजपचे नेते माजी आमदार डॉ. विनय नातू, भाजपचे नेते प्रशांत यादव आणि जिल्हाध्यक्ष सतीश मोरे यांनी सर्व उमेदवारांना निवडणुकीतील विजयासाठी शुभेच्छा दिल्या आणि भाजप-शिवसेना युतीच्या माध्यमातून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर युतीचा भगवा फडकवूया, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी चिपळूण ग्रामीण पूर्वचे मंडल अध्यक्ष विनोद भुरण आणि चिपळूण ग्रामीण पश्चिमचे तालुकाध्यक्ष उदय घाग उपस्थित होते.

Comments
Add Comment

जाणून घ्या वंदे भारत स्लीपर ट्रेनचे तिकीट दर, शिवाय तिकीट रद्द केल्यास मिळेल इतका रिफंड.. जाणून घ्या संपूर्ण माहिती

मुंबई: रात्रीच्या प्रवासासाठी खास तयार करण्यात आलेली वंदे भारत स्लीपर ट्रेन आता सेवेत दाखल झाली असून

जिथे धुरंधर १  थांबला, तिथून धुरंधर २  बोलेल: रणवीर सिंगचे दमदार संवाद

धुरंधर १  ची वारसा, धुरंधर २  चे वादळ: रणवीर सिंगच्या लक्षात राहणाऱ्या संवादांची झलक काही कलाकार असे असतात जे

नणंद भावजयीचा वाद ; मालमत्ता वादात प्रिया कपूरचा मोठा निर्णय

Sunjay Kapur Property Case: कपूर कुटुंबियातील मालमत्ता आणि वारसाहक्काचा वाद गेल्या काही काळापासून सातत्याने चर्चेत राहिला

शेफालीच्या मृत्यूमागे'काळी जादू' केल्याचा आरोप; अभिनेता पराग त्यागीचा खळबळजनक दावा

अभिनेता पराग त्यागीने पारस छाब्राच्या पॉडकास्टमध्ये शेफाली जरीवालाच्या मृत्यूवर खळबळजनक वक्तव्य केले आहे.जून

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पालघरमध्ये आज आणि उद्या वाहतूक निर्बंध

पालघर : पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणाऱ्या मोर्चा व आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा

भंसालींचा ‘लव्ह अँड वॉर’२०२६ मध्ये प्रदर्शित होणार; २०२७ च्या अफवांना सूत्रांकडून फेटाळणी

भंसालींच्या ‘लव्ह अँड वॉर’च्या प्रदर्शनावर शिक्कामोर्तब: २०२६ मध्येच येणार, २०२७च्या अफवा खोट्या ठरल्या संजय