भेल कंपनीचा तिमाही निकाल जाहीर नफ्यात १९०% दणक्यात वाढ तरीही ३% शेअर घसरला 'या' कारणामुळे

मोहित सोमण: भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड (Bharat Heavy Electricals Limited) या भारतीय पीएसयु कंपनीने आज आपला तिमाही आर्थिक निकाल जाहीर केला आहे. कंपनीच्या एकत्रित निव्वळ नफ्यात (Consolidated Net Profit) इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) १९०% वाढला आहे. गेल्या वर्षीच्या डिसेंबर तिमाहीतील १३४.७० कोटी तुलनेत या तिमाहीत ३९०.४० कोटींवर नफा पोहोचला आहे. कंपनीच्या कामकाजातून मिळणाऱ्या महसूलात (Revenue from Operations) ७५११.८० कोटी तुलनेत या तिमाहीत ८४७३.१० कोटींवर वाढ झाली आहे. कंपनीने एक्सचेंज फायलिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसार, कंपनीच्या एकूण उत्पन्नात (Total Income) ७३८५.०० कोटी तुलनेत या तिमाहीत ८६९१.८५ कोटीवर वाढ झाली आहे. तिमाहीतील आकडेवारीनुसार, कंपनीच्या करपूर्व नफ्यात (Profit before tax PBT) गेल्या वर्षीच्या तिमाहीतील १७८.७५ कोटी रुपये तुलनेत या तिमाहीत ५१९.८३ कोटींवर वाढ झाली आहे. बेसिक ईपीएस (Basic Earning per share EPS) ०.३६ रुपये वरून १.१० रुपयांवर पोहोचले आहे.


कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, तिसऱ्या तिमाहीत (Q3FY26) मध्ये ईबीटा (EBITDA) इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) ७९% वाढून ३०४.५ कोटींवरून ५४५ कोटी झाला आहे तर माहितीनुसार, ईबीटा (EBITDA) मार्जिन ४.२% वरून ६.४% पर्यंत सुधारला आहे. आर्थिक वर्ष २०२४ मध्ये, भेल (BHEL) कंपनीच्या संचालक मंडळाने वाराणसी येथील करखियांव येथे नवीन प्लांट स्थापन करण्यासाठी भांडवली गुंतवणूक योजनेला मंजुरी दिली होती.


एक्सचेंज फायलिंगमध्ये कंपनीच्या संचालक मंडळाने आज झालेल्या बैठकीत सध्याच्या व्यावसायिक परिस्थितीचा विचार करून, उपरोक्त योजना लवकर बंद करण्यास मंजुरी दिली आहे. कंपनीने वाराणसी येथील करखियांव येथील नवीन प्लांटसाठी मूळतः नियोजित उत्पादने आता भेलच्या इतर ठिकाणी तयार करण्याची योजना आखली जात आहे असे कंपनीने म्हटले आहे.


भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडने (BHEL) रेल वाहतूक क्षेत्रासाठीच्या आपल्या 'मेक इन इंडिया' उपक्रमांमध्ये आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला होता. कंपनीच्या (Bhel) TRSL सोबतच्या कन्सोर्टियमद्वारे कार्यान्वित केल्या जात असलेल्या प्रतिष्ठित वंदे भारत स्लीपर ट्रेन प्रकल्पासाठी अंडरस्लंग ट्रॅक्शन ट्रान्सफॉर्मरचा पुरवठा सुरू केला जात असल्याचे कंपनीने स्पष्ट केले होते. यापूर्वी कंपनीला भारत कोल गॅसिफिकेशन अँड केमिकल्स लिमिटेड (BCGCL) - कोल इंडिया लिमिटेड (५१%) आणि भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (४९%) यांची एक संयुक्त उद्यम कंपनीकडून तिच्या बीसीजीसीएलच्या लखनपूर, झारसुगुडा जिल्हा,ओडिशा येथील 'कोल टू २००० टीपीडी अमोनियम नायट्रेट' प्रकल्पाच्या कोल गॅसिफिकेशन आणि रॉ सिनगॅस क्लीनिंग प्लांटसाठी ८ जानेवारी २०२६ रोजी प्राप्त झालेल्या बोलीचे स्वीकृती पत्र (Letter of Agreement LOA) म्हणजेच ५४०० कोटींची व्यवसायिक ऑर्डर मिळाल्याचे म्हटले होते.


चांगला नफा मिळाला असतानाही संचालक मंडळाने प्रकल्प बंद करण्याचा निर्णय घेतल्याने गुंतवणूकदारांनी शेअरला नकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे कंपनीच्या शेअर्समध्ये ३% इंट्राडे उच्चांकावर घसरण झाली आहे. दुपारी २.११ वाजेपर्यंत कंपनीच्या शेअर्समध्ये ०.७२% घसरण झाल्याने शेअर २६५.५० रूपयांवर व्यवहार करत आहे. गेल्या ५ दिवसात कंपनीचा शेअर १.५७% घसरला असून गेल्या महिनाभरात शेअर्समध्ये ४.४४% घसरण झाली आहे. गेल्या वर्षभरात शेअरमध्ये २१.४७% घसरण झाली असून इयर टू डेट बेसिसवर (YTD) ९.५९% घसरण झाली आहे.

Comments
Add Comment

Domstic Violence : 'ओएसडी'कडून पत्नीला बेदम मारहाण; मंत्री अतुल सावे यांनी दिले चौकशीचे आदेश

मुंबई : आपल्या कार्यालयातील विशेष कार्य अधिकारी (ओएसडी) विजय कारंडे याच्याविरोधात पत्नीने दाखल केलेली तक्रार

Nashik : त्र्यंबकेश्वर मंदिरात बेकायदेशीर व्हीआयपी दर्शनाचा बाजार, नोकरी नाही व्यवसाय नाही तरी 'त्याच्या' बँक खात्यात लाखों रुपये

नाशिक : त्र्यंबकेश्वर मंदिरात (Trimbakeshwar Temple) व्हीआयपी दर्शनासाठी भाविकांची फसवणूक करून कशाप्रकारे लूट होते याचा

Suvendu Adhikari : "हा एक सुनियोजित कट"; पीए चंद्रनाथ रथ यांच्या हत्येनंतर सुवेंदू अधिकारी यांनी दिली पहिली प्रतिक्रिया

- पक्ष कार्यकर्त्यांना संयम राखण्याचे आवाहन कोलकाता : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते सुवेंदू अधिकारी (Suvendu Adhikari)

Suvendu Adhikari PA Death : पश्चिम बंगाल हादरले! सुवेंदू अधिकारी यांच्या स्वीय सहाय्यकाची निर्घृण हत्या; नव्या भाजप सरकारसमोरील कायदा-सुव्यवस्थेचे मोठे आव्हान

कोलकाता : बुधवारी उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील दोहरियाजवळ एक अत्यंत धक्कादायक घटना घडली. अज्ञातांनी भाजप नेते

Bihar Oath Ceremony 2026 : बिहारमध्ये सम्राट चौधरींचा ‘मेगा’ मंत्रिमंडळ विस्तार; गांधी मैदानावर मोदी-शाहांच्या उपस्थिती शपथविधी सोहळ्याचे आयोजन

पाटणा : बिहारचे नवनियुक्त मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या मंत्रिमंडळाचा आज म्हणजेच गुरुवार ७ मे रोजी भव्य

India's First 'All-Weather Subway : भिवंडीत साकारतोय देशातील पहिला 'ऑल वेदर सबवे': रेल्वे रुळ ओलांडण्याच्या समस्येवर कायमचा तोडगा!

मुंबई : वेळ वाचवण्याच्या नादात रेल्वे रुळ ओलांडून जीव धोक्यात घालणाऱ्या प्रवाशांसाठी एक अत्यंत दिलासादायक