Pune School Holiday: पुणेकरांसाठी मोठी बातमी! 19 जानेवारीला शाळांना सुट्टी, मुख्य रस्ते बंद,ग्रँड टूरमुळे शहरात...

पुणे: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पुण्यामध्ये प्रशासनाकडून शाळा, महाविद्यालयांना रजा देण्यात येणार आहे. वाहतुकीचे मार्ग पण बदलण्यात येणार आहेत. कारण पुणे शहरात बजाज पुणे ग्रँड टूर २०२६ या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा १९ ते २३ जानेवारी २०२६ दरम्यान होणार आहे. या मोठ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेमुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाने महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.


स्पर्धेच्या पहिल्या टप्प्याच्या दिवशी म्हणजेच १९ जानेवारी २०२६ रोजी पुणे शहरातील सर्व शाळा, महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शालेय विद्यार्थ्यांना वाहतुकीच्या अडचणींना सामोरे जावे लागू नये, यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी हे आदेश दिले आहेत. यासोबतच खासगी कार्यालयांनी शक्य असल्यास सुट्टी द्यावी किंवा कर्मचाऱ्यांनी मेट्रो व सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे. स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर फर्ग्युसन कॉलेज रोड आणि जंगली महाराज रोडवरील वाहतूक सकाळी ८ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच पुणे जिल्हा प्रशासन आणि सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या या स्पर्धेचा पहिला टप्पा पौड, लोणावळा ग्रामीण, कामशेत आणि वडगाव मावळ या भागांमधून जाणार असून सुमारे ५३.८ किलोमीटरचा मार्ग यामध्ये समाविष्ट आहे.


या मार्गावर कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून अनेक ठिकाणी वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे, तर काही ठिकाणी वाहने पर्यायी मार्गाने वळवली जाणार आहेत. पौड परिसरात पर्यायी मार्ग उपलब्ध नसल्याने काही प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक पूर्णतः बंद राहणार आहे. लोणावळा ग्रामीण आणि कामशेत परिसरातही अनेक गावांकडून येणाऱ्या वाहनांना वेगळ्या मार्गाने वळवण्यात येणार आहे.


काय आहे वाहतुकीत बदल ?


पौड पोलीस स्टेशन हद्दीत: पर्यायी रस्ता नसल्याने राज्य महामार्ग क्र. १३० वरील घोटावडे गाव बापुजीबुवा मंदिर ते अंबडवेट कमान, एम.डी.आर प्रमुख जिल्हा रस्ता क्र. ११० वरील अंबडवेट कमान ते पौड करमोळी चौक तसेच एम.डी.आर प्रमुख जिल्हा रस्ता क्र. २६ वरील पौड करमोळी चौक ते काशिंग जवण चौक दरम्यान संपूर्ण वाहतूक बंद करण्यात येत आहे.


लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत: मौजे चावसर, जवन क्र. २, ३ आदी गावाकडून येणारी वाहने मुंबई व पुणे बाजुकडे जाण्याकरिता जवन क्र. १ येथे न येता जवन क्र. २ व ३ चावसर आदी गावातील वाहने ही मौजे तुंगी फाटा मार्गे लोणावळा या पर्यायी मार्गे वळविण्यात येणार आहे.


मौजे आवेगाव, शिंदगाव आदी गावाकडून येणारी वाहने ही कार्ले फाटा येथे येण्यास बंद करण्यात येणार असून आंबेगाव, शिंदगाव आदी गावातील वाहने ही दुधिवरे मार्गे औंढे औंढोली पुढे लोणावळा या पर्यायी मार्गे वळविण्यात येणार आहे.


कामशेत पोलीस स्टेशन हद्दीत: कडधेगांव हे हिंजवडी, पवनानगर, पौडकडे जाणारे मुख्य जंक्शन असल्याने कामशेत ते पवनानगर पौड अशी जाणारी वाहतूक स्पर्धा संपेपर्यंत संपूर्ण बंद करण्यात येणार आहे. कामशेत कि.मी ४५/६०० ओव्हर ब्रीज पवना चौक कामशेत ते पवनानगर, पौड अशी पवनानगर मार्गाकडे जाणारी वाहतूक स्पर्धेच्या दिवशी जुने पुणे-मुंबई हायवे (एनएच ४८) कामशेत कि. मी ४५/६०० ओव्हर ब्रीज पवना चौक या ठिकाणी पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे.





पवनानगर, पौड, आर्डव, शिंवणे, महागांव, शिरगांवकडे जाणारा कामशेतकडून एकचमार्ग असून पर्यायी मार्ग नसल्याने कामशेत ते पवनानगर, पौडकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येत आहे. वडगाव मावळ पोलीस स्टेशन हद्दीत: शिरगाव परंदवडीकडून येणारी वाहतूक बेबडओहोळ मार्गे शिवणे शिवली बाजुकडे न पाठवता जुने मुंबई-पुणे हायवेने वळविण्यात येणार आहे. चांदखेडकडून डोणेकडे येणारी वाहतूक चांदखेड दरम्यान तसेच कामशेतमार्गे थुगांवकडे जाणारी वाहतूक पर्यायी मार्ग उपलब्ध नसल्याने मौजे कामशेत येथे स्पर्धा संपेपर्यंत संपूर्ण बंद करण्यात येणार आहे. मळवंडी ढोरे, येळघोल शिवली गावाकडून आर्डव बाजुकडे येणारी वाहतूक भडवली गावाच्या अलीकडील चौकात येलघोल फाटा येथे सायकल स्पर्धा पूर्ण होईपर्यंत पुर्णपणे बंद करण्यात येत आहे, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

Ladki Bahin Yojana : 'हा' तर लाडका निघाला ! अहिल्यानगरात ५२३ पुरुषांनी लाटले ७४.७५ लाख

Ladki Bahin Yojana : राज्य सरकारने राज्यातील गरजू महिलांसाठी सुरु केलेली लाडकी बहीण योजना अनेक महिलांसाठी मोठा आधार देणारी

Minister Nitin Gadkari : जळगाव बायपास प्रकरणी मोठी कारवाई ! नितीन गडकरींचे चौकशीचे आदेश, दोषी ठेकेदार होणार ब्लॅकलिस्ट

Minister Nitin Gadkari : सुरत–नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील (Surat–Nagpur National Highway) पाळधी ते तरसोद बायपासच्या रेल्वे उड्डाणपूलाच्या

Radhakrishna Vikhe-Patil : मराठा जात प्रमाणपत्र रद्द प्रकरणावर सरकार अलर्ट! ‘जाणीवपूर्वक गैरप्रकार आढळल्यास कारवाई करू’ : राधाकृष्ण विखे-पाटील

संगमनेर : मराठा जात प्रमाणपत्र रद्द झाल्याच्या काही घटनांवरून सुरू झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर जलसंपदा

State Government : राज्यातील १ लाख ६० हजार गोविंदांना १० लाखांचे विमा संरक्षण

अपघाती मृत्यू व अपंगत्वासाठी आर्थिक मदत; वैद्यकीय उपचारासाठी १ लाखांपर्यंतचे कवच मुंबई : दहीहंडी उत्सवाच्या

Jalgaon : दोघांचा अपघातात तर एकाचा तलावात बुडाल्याने मृत्यू , एकाच दिवशी तीन दुर्दैवी घटना घडल्याने जळगाव जिल्हा हळहळला

Jalgaon : जळगाव जिल्ह्यात बुधवारी घडलेल्या तीन वेगवेगळ्या दुर्घटनांनी जिल्हा हळहळला आहे. घडलेल्या दुर्घटनांमध्ये

Pratap Sarnaik : १ लाखांहून अधिक अमराठी चालकांनी गिरवले मराठीचे धडे

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक; मराठीचा मान राखणाऱ्या प्रत्येकाला महाराष्ट्र कवेत घेईल मुंबई : "