उल्हासनगर महापालिकेत भाजप-शिवसेनेची सत्तेसाठी 'सेटिंग'

वंचितचे नगरसेवक सुरक्षित स्थळी हलवले


उल्हासनगर : महानगरपालिका निवडणुकीनंतर उल्हासनगरमध्ये सत्तेसाठी खऱ्या अर्थाने राजकीय चढाओढ सुरू झाली आहे. ७८ सदस्यीय सभागृहात कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने सत्ता स्थापन करण्यासाठी भाजप आणि शिंदे गटाची शिवसेना यांच्यात जोरदार ‘सेटींग' सुरू आहे. या सत्तानाट्यात वंचित बहुजन आघाडीच्या दोन नगरसेवकांना किंगमेकरची भूमिका मिळाल्याने त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. उल्हासनगर महापालिकेत बहुमतासाठी ४० नगरसेवकांचा आकडा गाठणे आवश्यक आहे. भाजपकडे ३७, तर शिंदे गटाच्या शिवसेना (ओमी टीम) कडे ३६ जागा आहेत. साई पक्षाच्या दीप्ती दुधानी आणि अपक्ष सविता तोरणे–रगडे या शिंदे गटाच्या महाआघाडीतील नगरसेवक असल्याने शिंदे गटाचा आकडा ३८ वर पोहोचतो. मात्र सत्तेसाठी त्यांना अद्याप २ नगरसेवकांची गरज आहे.
वंचित बहुजन आघाडीकडे विकास खरात आणि सुरेखा सोनावणे असे दोन नगरसेवक असून, हेच सध्या सत्तेचे पारडे फिरवू शकतात. वंचितचे दोन्ही नगरसेवक शिंदे गटाला पाठिंबा दिल्यास, त्यांची एकूण संख्या थेट ४० वर जाणार आहे.


वंचितचे नगरसेवक गेले कुठे?


वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते सोनू पवार यांनी खळबळजनक दावा करत सांगितले की, भाजप आणि शिंदेसेनेकडून त्यांच्या नगरसेवकांना गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सत्तेसाठी विविध आमिषे दाखवली जात असल्याच्या पार्श्वभूमीवर, पक्षाने खबरदारीचा उपाय म्हणून दोन्ही नवनिर्वाचित नगरसेवकांना अज्ञातस्थळी पाठवले आहे. पक्षप्रमुखांच्या आदेशानुसार हा निर्णय घेण्यात आला असून, कोणताही दगाफटका होऊ नये यासाठी ही काळजी घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

Comments
Add Comment

Gatari Amavasya : गटारीच्या दिवशीच सूर्यग्रहण? नॉन वेज खाण्यापूर्वी 'हे' नक्कीच जाणून घ्या...

मुंबई :  महाराष्ट्रात गटारी अमावस्या म्हणून ओळखली जाणारी आषाढ दीप अमावस्या यंदा 12 ऑगस्ट 2026 रोजी येत आहे. श्रावण

Eknath Shinde : दूध, पनीरसह अन्न भेसळखोरांवर संघटीत गुन्हेगारी अंतर्गत कारवाई करा!

- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश; कायदे तज्ज्ञांची समिती तयार करण्याची सूचना मुंबई : नागरिकांच्या

गौतम अदानी यांच्यावरील अमेरिकेतील फौजदारी खटला रद्द

नवी दिल्ली : प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांच्याविरोधात अमेरिकेत दाखल करण्यात आलेला लाचखोरी आणि आर्थिक

Nashik : शेकडो अनोळखींसाठी आधार ठरलेला विशाल काळाच्या पडद्याआड

Nashik : संकटात सापडलेल्या, अडचणीत असलेल्या अनेक सर्वसामान्य आणि अनोळखी लोकांच्या मदतीला धावून जाणारा नाशिक (Nashik)

Ajay Devgan : बाॅलिवूडचा सिंघम 'अजय देवगण' लवरकच झळकणार सूत्रसंचालकाच्या भूमिकेत

मुंबई : बॉलिवूडचा सिंघम म्हणून ओळखला जाणारा अभिनेता 'अजय देवगण' आता सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसणार आहे. अजय

Nashik : नाशिक-नांदुरी रस्त्याच्या रुंदीकरण कामाची पाहणी, गुणवत्ता निकषांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश

Nashik : सिंहस्थ कुंभमेळा २०२७च्या (Simhastha Kumbh Mela 2027) पार्श्वभूमीवर नाशिक–नांदुरी रस्त्याच्या (Nashik-Nanduri road) सुरू असलेल्या