Yes Bank मजबूत तिमाही निकाल बँकेच्या निव्वळ नफ्यात थेट ५५.४% वाढ

मोहित सोमण: येस बँकेने (Yes Bank) आपला तिमाही निकाल जाहीर केला आहे. बँकेच्या निव्वळ नफ्यात यंदा मजबूत वाढ झाली आहे. एक्सचेंज फायलिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसार, बँकेच्या निव्वळ नफ्यात तिसऱ्या तिमाहीत इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) ५५.४% वाढ झाली आहे. गेल्या डिसेंबरमध्ये असलेल्या ६१२ कोटींच्या तुलनेत या डिसेंबरमध्ये ९५२ कोटींवर निव्वळ नफा वाढला‌ आहे. विशेष म्हणजे बँकेच्या तरतूदीत (Provision) इयर ऑन इयर बेसिसवर २५९ कोटीवरून २२ कोटीवर घसरण झाली आहे. बँकेच्या निव्वळ व्याज उत्पन्नात (Net Interest Income NII) इयर ऑन इयर बेसिसवर १०.९% वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या तिमाहीतील २२२४ कोटी रुपये तुलनेत या तिमाहीत २४६६ कोटीवर वाढ झाली आहे. बँकेच्या बेसिक ईपीएस (Earning per share EPS) इयर ऑन इयर बेसिसवर ५५.३% वाढ झाल्याने ते ०.२० रूपये वरून ०.३० रूपयांवर पोहोचले आहे. आरओई (Return on Assets RoA) इयर ऑन इयर बेसिसवर ०.६% वरून ०.९% वाढ झाली आहे.


बँकेच्या निव्वळ एनपीए (Net Non Performing Assets NPA) इयर ऑन इयर बेसिसवर ०.५% वरून ०.३% वर घसरण झाली आहे. तर कासा गुणोत्तर (CASA Ratio) कासा गुणोत्तरात (Current Account Saving Account CASA Ratio) ३३.१% वरुन ३४.०% वर वाढ झाली आहे. बँकेच्या माहितीनुसार, बँकेच्या अँडव्हान्समध्ये इयर ऑन इयर बेसिसवर ५.२% वाढ झाली असून तिमाही बेसिसवर २.९% वाढ झाली आहे. तसेच एकूणच मूळ शुल्क उत्पन्न, क्रेडिट कार्ड शुल्क आणि थर्ड पार्टी उत्पादन वितरणातील चांगल्या कामगिरीमुळे, बिगर व्याज उत्पन्न (Non Interest Income) इयर ऑन इयर बेसिसवर ८% वाढून १६३३ कोटी रुपये इतके मजबूत राहिले. काल बँकेच्या शेअर्समध्ये २.१८% वाढ झाली असून तो २३.४५ रूपयांवर बंद झाला होता.

Comments
Add Comment

इंदापूरचे माजी नगराध्यक्ष प्रदीप गारटकर यांचा भाजपमध्ये प्रवेश

मुंबई : महापालिका निवडणुकीनंतर भाजपने आता जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीवर लक्ष केंद्रीत केले

राणेंचे घर तोडण्यापासून सुरुवात झाली, आता मातोश्री-२ ची वेळ!

मंत्री नितेश राणेंचा इशारा; ‘जय श्रीराम’चा जयघोष करीत मुंबईत आमचा महापौर विराजमान होणार मुंबई : “उद्धव ठाकरेंनी

महापालिका निकालानंतर मुंबई काँग्रेसमध्ये नाराजीनाट्य - शहराध्यक्ष बदला; भाई जगताप यांनी केली वर्षा गायकवाडांच्या राजीनाम्याची मागणी

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीत २४ जागा राखून सर्वांनाच धक्का देणाऱ्या काँग्रेसमध्ये नवे नाराजीनाट्य सुरू

महापालिका निवडणुकीनंतरच्या पहिल्या कॅबिनेटला दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची दांडी

मुंबई : राज्यातील महापालिका निवडणुकीनंतरच्या पहिल्या कॅबिनेट बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी दांडी

ना विजयोत्सव, ना मिरवणूक! थेट हॉटेलमध्ये रवानगी; उपमुख्यमंत्री शिंदेंच्या त्या निर्णयाने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून, भारतीय जनता पक्षाने (भाजप) निर्विवाद

२६ जानेवारीपासून पश्चिम रेल्वेवर एसी लोकल सेवांचा विस्तार; दररोजसाठी वाढणार इतक्या फेऱ्या

मुंबई : पश्चिम रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे. २६ जानेवारी २०२६ पासून पश्चिम