उबाठा पहिल्यांदा बसणार मुंबईत विरोधी पक्षात

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून त्यामध्ये मागील २५ वर्षांपासून सत्तेत असलेल्या उबाठाला आजवर सर्वांधिक कमी जागा मिळाल्या आहेत. या निवडणुकीत उबाठाचे सुमारे ५७ नगरसेवक न निवडून आले असून ही संख्या आजवरची सर्वांत कमी आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेत उबाठा शिवसेना प्रथमच विरोधी पक्षात बसलेला पहायला मिळणार आहे.


मुंबई महापालिकेच्या सन २०२५च्या निवडणुकीत उबाठा पक्षाचे नगरसेवक निवडून आले आहेत. या निवडणुकीत उबाठा पक्षाने १३७ जागी आपले उमेदवार दिले होते. या निवडणुकीत उबाठाचे ५७ नगरसेवक निवडून आले आहेत. यापूर्वी झालेल्या सन २०१७च्या निवडणुकीत शिवसेनेने भाजपासोबत युती तोडून प्रथमच स्वबळावर निवडणूक लढवली होती. त्यामध्ये ८२ नगरसेवक निवडून आले होते. परंतु यावेळी शिवसेनेचे दोन तुकडे झाल्यानंतर मूळ शिवसेना ठाकरेंचीच म्हणणाऱ्या उबाठाला मुंबईत पुन्हा आपले यश मिळवता आलेले नाही. त्यामुळे प्रथमच त्यांचा आकडा कमीवर आला आहे.


यापूर्वी २०१२मध्ये शिवसेनेचे ७५ नगरसेवक निवडून आले होते. तर त्यापूर्वी २००७मध्ये ८४ नगरसेवक निवडून आले होते. त्यामुळे मागील निवडणुकीतील उबाठा शिवसेनेच्या नगरसेवकांची संख्या पाहता प्रथमच त्यांचे प्रथमच नगरसेवक कमी आले आहे. त्यामुळे मागील १९९७ पासून सलग सत्तेवर असणाऱ्या उबाठाला आता प्रथमच विरोधी पक्षात बसवण्याची वेळ आली आहे.



उबाठाची मागील चार निवडणुकीतील आकडेवारी


सन २०२६ : सुमारे ६५ नगरसेवक


सन २०१७ : ८२ नगरसेवक


सन २०१२ : ७५ नगरसेवक


सन २००७ : ८४ नगरसेवक


सन २००२ : ९० नगरसेवक


सन १९९७ : ९६ नगरसेवक

Comments
Add Comment

पुण्यात शिवसेना शून्यावर बाद !

मुंबई : पुणे महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेच्या युतीमध्ये केवळ १५ जागा भाजपने शिंदेसेनेला दिल्या होत्या.

Raj Thackeray : राज ठाकरेंचे मतदारांना पत्र, पत्रातील भाषेवरुन भाजपची राज ठाकरेंवर टीका

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निकालाने महाराष्ट्राच्या राजकारणात भाजपचं निर्विवाद वर्चस्व सिद्ध

सांगलीत भाजप बहूमताच्या उंबरठ्यावर अडखळली

एका जागेसाठी देणार शिवसेनेला उपमहापौर मुंबई : महायुतीत फाटाफूट झालेली, काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची

परभणीत मशाल पेटली, नांडेमध्ये कमळ फुलले

मुंबई : महापालिका निवडणुकीत सर्वत्र सत्ताधारी पक्षांचा बोलबाला दिसत असताना येथे मात्र उद्धव बाळासाहेब ठाकरे

मुंबई महापालिका निवडणूक निकालात काय घडले?

नार्वेकरांनी तिन्ही गड राखले मुंबई : कुलाबा विधानसभेत भाजपच्यावतीने विधानसभेचे अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर

राज्यातील २२ मनपात राज ठाकरेंच्या मनसेला भोपळा

मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्रातील २९ महापालिका निवडणुकांचे निकाल लागले. आतापर्यंत हाती आलेल्या निकालांनुसार,