केरळच्या पर्यटकांवर अरुणाचलमध्ये काळाचा घाला; गोठलेल्या तलावात पडून एकाचा मृत्यू दुसऱ्याचा शोध सुरु

अरुणाचल प्रदेश : थंड हवेचा अनुभव घेण्यासाठी अरुणाचल प्रदेशात आलेल्या केरळमधील पर्यटकांच्या सहलीला दुर्दैवी वळण लागले आहे. तवांग परिसरात घडलेल्या अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाला असून एका मृतदेहाचा शोध अजूनही सुरू आहे. या घटनेमुळे संपूर्ण पर्यटन क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.


केरळमधून सात तरुणांचा एक गट अरुणाचल प्रदेशातील तवांग शहरात पर्यटनासाठी दाखल झाला होता. शुक्रवारी हे सर्वजण सुमारे १३ हजार फूट उंचीवर असलेल्या प्रसिद्ध सेल लेक परिसरात गेले. या भागात प्रचंड थंडीमुळे तलावाचे पाणी पूर्णपणे गोठले होते. बर्फावरून चालण्याचा मोह काही पर्यटकांना आवरता आला नाही.


दरम्यान, चालताना एका तरुणाचा पाय घसरला आणि तो थेट बर्फाखालील थंड पाण्यात पडला. त्याला वाचवण्यासाठी दिनू आणि महादेव या दोघांनी कोणताही विचार न करता पाण्यात उडी घेतली. पाय घसरलेला तरुण सुदैवाने बाहेर काढण्यात यश आले, मात्र दिनू आणि महादेव हे दोघेही बर्फाळ पाण्यात अडकले. या घटनेनंतर तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले. अनेक तास प्रयत्न करूनही रात्री उशिरापर्यंत एकाच तरुणाचा मृतदेह सापडला, तर दुसऱ्याचा शोध अद्याप सुरू आहे. अत्यंत थंड तापमान आणि बर्फामुळे शोधमोहीमेत अडथळे येत असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.


या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन आणि पोलीस अधिकाऱ्यांनी पर्यटकांना सावधगिरीचा इशारा दिला आहे. डिसेंबर महिन्यातच गोठलेल्या तलावांजवळ जाणे आणि बर्फावर चालणे धोकादायक असल्याबाबत नियमावली जाहीर करण्यात आली होती. वरून मजबूत वाटणारा बर्फाचा थर प्रत्यक्षात वजन सहन करू शकत नाही, असेही स्पष्ट करण्यात आले होते. सूचना फलक असूनही इशाऱ्यांकडे दुर्लक्ष झाल्यानेच हा अपघात घडल्याचे सांगितले जात आहे.


पर्यटकांना सावध करण्यासाठी परिसरात ठिकठिकाणी सुचना फलकही लावण्यात आले आहेत. मात्र पर्यटकांनी या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष केल्याने ही दुर्घटना घडल्याचे बोलले जात आहे

Comments
Add Comment

Amazon Flipkart Sale Discount Reality : Amazon-Flipkart च्या सेलमध्ये ७०% डिस्काउंटचा झगमगाट! पण ऑर्डर करण्यापूर्वी 'हा' फंडा समजून घ्या, अन्यथा खिसा होईल खाली!

नवी दिल्ली : स्वातंत्र्य दिनाचे (Independence Day) औचित्य साधून Amazon, Flipkart आणि Myntra यांसारख्या नामांकित ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्सवर

Ted Sarandos Meets PM Modi : Netflix ची भारतासाठी मोठी घोषणा! देश बनणार ‘ग्लोबल कंटेंट क्रिएशन हब’; टेड सारंडोस यांनी घेतली PM मोदींची भेट

नवी दिल्ली : भारतातील नेटफ्लिक्सच्या (Netflix) प्रवासाला १० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने कंपनीचे सह-मुख्य

ONGC Russia Venezuela oil wells : कच्च्या तेलाच्या बाजारात भारताची मोठी झेप! व्हेनेझुएला अन् रशियातील तेल विहिरींवर आता ONGC चे वर्चस्व

नवी दिल्ली : जागतिक इंधन बाजारात आणि ऊर्जा क्षेत्रात भारताचा प्रभाव अधिक मजबूत करणारी एक अत्यंत महत्त्वाची

Resident Doctors Strike High Court Verdict : "काम नसेल तर पगार..."; संपावर जाणाऱ्या निवासी डॉक्टरांना मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा दणका!

मुंबई : होमियोपॅथी डॉक्टरांना महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेत (MMC) सशर्त नोंदणी देण्याच्या राज्य सरकारच्या

Phuket delhi air india flight Turbulence : हवेत अचानक लागला भीषण झटका अन् प्रवासी थेट छतावर आदळले! एअर इंडियाच्या विमानात ताणतणाव आणि किंचाळ्या; १७ जण जखमी

नवी दिल्ली : विमानातून प्रवास करताना "सीटबेल्ट बांधा" अशी सूचना मिळणे ही अगदी सामान्य गोष्ट आहे. मात्र, मंगळवारी

Tarun Tejpal : मोठी बातमी! 'तहलका'चे संस्थापक तरुण तेजपाल यांना १० वर्षांचा तुरुंगवास

२०१३ च्या लैंगिक अत्याचार प्रकरणात उच्च न्यायालयाचा मोठा निकाल! पणजी : प्रसिद्ध 'तहलका' मासिकाचे संस्थापक तरुण