मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना (शिंदे गट) महायुतीने मिळवलेल्या ऐतिहासिक विजयानंतर राजकीय वर्तुळात उत्साहाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर, भाजपचे फायरब्रँड नेते आणि मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. या विजयाचे श्रेय त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या लोकाभिमुख नेतृत्वाला आणि कार्यकर्त्यांच्या एकजुटीला दिले आहे.
हापूर : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) हापूर जिल्ह्यात एका विवाह सोहळ्यात आनंदाच्या वातावरणाऐवजी धक्कादायक आणि गोंधळाची परिस्थिती पाहायला मिळाली. येथे ...
मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वावर मोहोर
नितेश राणे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये मुख्यमंत्र्यांचे विशेष कौतुक केले आहे. "राज्यातील महापालिका निवडणुकीत मिळालेले दणदणीत यश हे जनतेच्या प्रचंड विश्वासाचे प्रतीक आहे. विशेषतः मुंबई महापालिकेसह राज्यभरात महायुतीने जो विजय मिळवला आहे, त्यामागे मुख्यमंत्री महोदयांचे दूरदृष्टीपूर्ण आणि ठाम नेतृत्व महत्त्वाचे ठरले आहे," अशा शब्दांत राणे यांनी मुख्यमंत्र्यांच्या कामाची पावती दिली.
मुंबईत परिवर्तनाचा नवा अध्याय
मुंबई महानगरपालिकेत २५ वर्षांची सत्ता उलथवून महायुतीने बहुमताचा आकडा (११८ जागा) पार केला आहे. या विजयाचा उल्लेख करताना नितेश राणे म्हणाले की, हा विजय महाराष्ट्राच्या विकासाचा आणि प्रगतीचा नवा अध्याय ठरेल. महायुतीच्या या विजयामुळे मुंबईसह राज्यातील प्रमुख शहरांच्या विकासाला आता नवी गती मिळणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे फळ
केवळ नेतृत्वच नाही, तर तळागाळातील कार्यकर्त्यांचेही नितेश राणे यांनी आभार मानले आहेत. महायुतीतील प्रत्येक घटक पक्ष, पदाधिकारी आणि निष्ठावान कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळेच विरोधकांना धूळ चारणे शक्य झाले, असे त्यांनी नमूद केले. भेटीनंतर त्यांनी सोशल मीडियावर 'जय श्री राम' लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या.