३०००० कोटी मालमत्तेतील वाद शिगेला? करिष्मा कपूरला दोन आठवड्यात खुलासा करण्याचे न्यायालयाकडून आदेश

नवी दिल्ली: करिष्मा कपूर व प्रिया कपूर यांच्यातील मालमत्तेतील वाद आता नव्या उंचीवर पोहोचवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ३०००० कोटी रूपयांच्या मालमत्तेतील संघर्षावरून आता नवा वाद पेटणार आहे. आता प्रिया कपूर यांच्या नव्या अर्जावरुन करिष्मा कपूर यांच्या वकीलांना दोन आठवड्यात स्पष्टीकरण देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. अभिनेत्री करिश्मा कपूर व दिवंगत पती सोनाकॉमस्टार कंपनीचे सर्वेसर्वा संजय कपूर यांच्या घटस्फोटानंतर मालमत्तेतील हिस्सावरून संजय कपूर यांची विद्यमान पत्नी प्रिया कपूर व संजय कपूर यांची पूर्व पत्नी करिष्मा कपूर यांच्यात मालमत्तेवरून दावे प्रतिदावे केले जात होते. आता हा वाद आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचला असताना प्रिया कपूर यांनी संजय व करिष्मा कपूर यांच्या घटस्फोटाची कागदपत्रे मिळावीत यासाठी अर्ज दाखल केला आहे.


दरम्यान या प्रकरणी करिष्मा कपूर यांचे वकील रवी शर्मा व अपूर्व शुक्ला यांनी मात्र या प्रिया यांच्या मागणीविरोधात स्वतंत्र अपील केले आहे. संजय कपूर व करिष्मा कपूर यांच्या घटस्फोटा दरम्यान कुठल्या प्रकारचे आर्थिक व्यवहार झाले तसेच किती रकमेची तडजोड आणि उलाढाल झाली याचा छडा लावण्यासाठी या सगळ्या व्यवहारांची कागदपत्रे प्रिया कपूर यांच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात केली असताना मात्र करिश्मा कपूरचे वकील रवी शर्मा आणि अपूर्व शुक्ला यांनी प्रिया कपूरच्या अर्जाला आक्षेप घेतला. हा अर्ज 'निरर्थक' असून कौटुंबिक न्यायालयातील एका प्रकरणातील वैयक्तिक माहिती बाहेर काढण्याच्या उद्देशानेच दाखल करण्यात आला आहे, जी माहिती संजय कपूर आणि करिश्मा कपूर यांच्यात गोपनीय आहे, असे त्यांनी म्हटले.


उपलब्ध माहितीनुसार, या प्रकरणात प्रिया सचदेव कपूर यांच्या वकीलांनी संजय कपूर यांच्या एका स्वतंत्र घटस्फोट प्रकरणात करिष्मा कपूर यांच्या दोन मुलांच्या मालमत्तेतील मागणी संबंधित वादावर आपले स्पष्टीकरण संजय कपूर हयात असतानाच दिल्याचा दावा केला होता. संजय कपूर यांच्या वैयक्तिक मालमत्तेवरील कौटुंबिक वादाशी संबंधित आहे. करिश्मा कपूर यांच्याशी झालेल्या विवाहातून झालेल्या त्यांच्या मुलांनी वाटा मागितला आहे. त्यांनी असा आरोप केला आहे की विधवा पत्नी प्रिया सचदेव कपूर यांच्या बाजूने असलेल्या मृत्युपत्रात फेरफार करण्यात आलेला आहे


त्यामुळे ही मागणी रास्त नसून संजय कपूर व करिष्मा कपूर यांच्या घटस्फोटातील खाजगी माहितीची विचारणा झाली असताना यावेळी याचिकेवर उद्देशून करिष्मा कपूर यांच्या वकिलांनी न्यायालयात प्रतिदावा केला आहे. हा अर्ज प्रिया सचदेव यांनी अर्ज दाखल केला असून या खटल्याची सुनावणी न्यायमूर्ती ए एस चांदुरकर यांच्या खंडपीठासमोर सुरू आहे. दुसरीकडे प्रिया कपूर यांच्या वकिलांच्या म्हणण्यानुसार, मालमत्तेच्या खटल्यामध्ये मुलांच्या घटस्फोटातील आर्थिक तरतूदी, व्यवस्थेशी शिक्षणाच्या खर्चाशी आणि घटस्फोटानंतरच्या जबाबदाऱ्यांशी संबंधित मुद्दे वारंवार उपस्थित झाले आहेत ज्यामुळे घटस्फोटाच्या समझोत्याची संपूर्ण वस्तुस्थिती रेकॉर्डवर ठेवणे आवश्यक झाले आहे.


प्रिया सचदेव यांच्या वकीलांनी संजय कपूर आणि करिश्मा कपूर यांच्यात घटस्फोटाच्या वेळी ठरलेल्या अटींबाबत स्पष्टता असणे आवश्यक असल्याचे वारंवार म्हटले आहे जेणेकरून आता उपस्थित केले जाणारे मुद्दे संजय कपूर यांच्या हयातीतच निकाली काढले गेले होते की नाही हे निश्चित करता येईल. २०१६ मध्ये करिश्मा कपूर आणि संजय कपूर यांच्यातील वैवाहिक वादाचे परस्पर संमतीने (Mutual Consent) निराकरण झाले. सर्वोच्च न्यायालयात दोन्ही पक्षांनी स्वाक्षरी केलेल्या 'संमतीच्या अटी' नोंदीवर घेतल्या होत्या. उपलब्ध माहितीनुसार त्यांच्या दोन मुलांचा ताबा अभिनेत्रीकडे राहणार असून तर विभक्त पतीला मुलांना भेटण्याचा आणि त्यांच्यासोबत वेळ घालवण्याचा अधिकार न्यायालयाने दिला होता.


संजय कपूर ज्यांनी २००३ मध्ये करिश्मा कपूर यांच्याशी लग्न केले होते व २०१६ मध्ये करिष्मा कपूर यांनी त्यांना घटस्फोट दिला होता. यूकेमध्ये पोलो खेळत असताना दिल्ली स्थित उद्योगपती संजय कपूर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने ५३ व्या वर्षी निधन झाले. त्यांनी सुमारे ३०००० कोटी रुपयांची मालमत्ता मागे ठेवली आहे. त्यावरून वाद वाढला असताना करिष्मा कपूरने झालेल्या सुनावणीत आणखी काही धक्कादायक वैयक्तिक माहिती सुनावणी दरम्यान उघडकीस आणली आहे.

Comments
Add Comment

महापालिका निवडणुकीनंतरच्या पहिल्या कॅबिनेटला दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची दांडी

मुंबई : राज्यातील महापालिका निवडणुकीनंतरच्या पहिल्या कॅबिनेट बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी दांडी

Yes Bank मजबूत तिमाही निकाल बँकेच्या निव्वळ नफ्यात थेट ५५.४% वाढ

मोहित सोमण: येस बँकेने (Yes Bank) आपला तिमाही निकाल जाहीर केला आहे. बँकेच्या निव्वळ नफ्यात यंदा मजबूत वाढ झाली आहे.

ना विजयोत्सव, ना मिरवणूक! थेट हॉटेलमध्ये रवानगी; उपमुख्यमंत्री शिंदेंच्या त्या निर्णयाने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून, भारतीय जनता पक्षाने (भाजप) निर्विवाद

२६ जानेवारीपासून पश्चिम रेल्वेवर एसी लोकल सेवांचा विस्तार; दररोजसाठी वाढणार इतक्या फेऱ्या

मुंबई : पश्चिम रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे. २६ जानेवारी २०२६ पासून पश्चिम

आरबीआयकडून आयात निर्यातीसाठी FEMA 1999 ऐवजी FEMA 2026 लागू होणार नेमके काय बदल वाचा!

मोहित सोमण: भारतातील उत्पादन क्षेत्रासह आणखी प्रमुख क्षेत्र म्हणजे आयात निर्यात क्षेत्र आहे. भारतीय

राष्ट्रीय शिक्षण धोरणातून सक्षम व सृजनशील भारत घडेल — उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

मुंबई विद्यापीठाचा वार्षिक दीक्षान्त समारंभ संपन्न विविध विद्याशाखांतील १ लाख ७२ हजार ५२२ स्नातकांना पदव्या