राज्यभरात एमआयएमने जिंकल्या तब्बल १२५ जागा

मुंबई (प्रतिनिधी) : "मुंबईत हिंदूंचा जन्मदर १.३ टक्के तर मुस्लिमांचा जन्मदर २.६ टक्के म्हणजे दुप्पट आहे. त्यामुळे २०५० मध्ये हिंदू ५४ टक्क्यांखाली आणि मुस्लीम लोकसंख्या ३० टक्क्यांवर जाईल", असा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी अलीकडे केला होता. तुष्टीकरणाचे राजकारण करणाऱ्या असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएम पक्षाचे राज्यभरात तब्बल १२५ नगरसेवक निवडून आल्याने या दाव्याला पुष्टी मिळाली आहे. मुंबईत सहा जागांवर एमआयएमचे उमेदवार विजयी झाले. मानखुर्द-गोवंडी या भागात एमआयएमने समाजवादी पक्षाला मोठा धक्का दिला. मुंबईतील मुस्लीम लोकसंख्या असलेल्या भागात औवेसी यांची जादू चालल्याचे दिसून येते. छत्रपती संभाजी नगरमध्ये संख्या सर्वाधिक राज्यातील २९ पैकी १३ महापालिकांमध्ये एमआयएमचे १२५नगरसेवक विजयी झाले आहेत. छत्रपती संभाजीनगर महापालिकेत त्यांचे सर्वाधिक ३३ नगरसेवक निवडून आले, तर मालेगाव महापालिकेत २० नगरसेवक निवडून आले आहेत.



सायकलचा टायर पंक्चर, पतंग हवेत उडाला


मुंबई महापालिकेत मागील सार्वत्रिक निवडणुकीत केवळ दोन जागांवर नगरसेवक निवडून येणाऱ्या एमआयएमने या निवडणुकीत तब्बल सहा नगरसेवक निवडून आले आहेत. मात्र, या निवडणुकीत समाजवादी पक्षाचे केवळ दोनच नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे या निवडणुकीत समाजवादी पक्षाच्या सायकलचा टायर पंक्चर झाला असून एमआयएमचा पतंग भलताच हवेत उडाला असल्याचे दिसून येत आहे. मुंबई महापालिकेत मागील निवडणुकीत समाजवादी पक्षांचे सहा नगरसेवक निवडून आले होते, तर एमआयएमचे दोन नगरसेवक निवडून आले होते. एमआयएमचा एक नगरसेवक शिवसेनेत गेले होते. परंतु, या निवडणुकी एमएमआयने, समाजवादी पक्षाला मागे टाकले आहे. या निवडणुकीत एमआयएमने बाजी मारत आपले सहा नगरसेवक निवडून आणले आहेत. समाजवादी पक्षाचा गड असलेल्या मानखुर्द गोवंडीतच एमआयएमचा विजय झाला. एमआयएमचे सहा नगरसेवक निवडून आल्यामुळे त्यांचा पक्षाचा एक गटनेता निवडला जाणार असून त्यांना गणसंख्येच्या आधारे स्थायी समिती तसेच अन्य समित्यांमध्ये गटनेत्याला सदस्य प्राप्त होणार आहे. समाजवादी पक्षामध्ये आमदार अबू आझमी आणि आमदार रईस शेख यांच्यांत उघडपणे युध्द चालले होते आणि रईस शेख यांनी काँग्रेस उमेदवाराचा प्रचार केला होता. त्यामुळे रईस शेख यांच्याकडून बंडखोरी झाल्याचा आरोप होत होता आणि समाजवादी पक्षाच्या अपयशाला रईस शेख हेच जबाबदार असल्याचेही बोलले जात आहे.



एमआयएमचे विजयी ६ उमेदवार


प्रभाग क्र. १४५ खैरुनिसा हुसेन विजयी
प्रभाग क्र.१३६ जमीर कुरेशी विजयी
प्रभाग क्र.१३७ समीर पटेल विजयी
प्रभाग क्र. १३९ शबाना शेख विजयी
प्रभाग क्र. १३८ रोशन शेख विजयी
प्रभाग क्र. १३४ मेहजबिन एतिक अहमद खान विजयी



समाजवादी पक्षाचे विजयी उमेदवार


अमरीन शहेशाह अब्राहनी

Comments
Add Comment

पुण्यात शिवसेना शून्यावर बाद !

मुंबई : पुणे महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेच्या युतीमध्ये केवळ १५ जागा भाजपने शिंदेसेनेला दिल्या होत्या.

Raj Thackeray : राज ठाकरेंचे मतदारांना पत्र, पत्रातील भाषेवरुन भाजपची राज ठाकरेंवर टीका

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निकालाने महाराष्ट्राच्या राजकारणात भाजपचं निर्विवाद वर्चस्व सिद्ध

सांगलीत भाजप बहूमताच्या उंबरठ्यावर अडखळली

एका जागेसाठी देणार शिवसेनेला उपमहापौर मुंबई : महायुतीत फाटाफूट झालेली, काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची

परभणीत मशाल पेटली, नांडेमध्ये कमळ फुलले

मुंबई : महापालिका निवडणुकीत सर्वत्र सत्ताधारी पक्षांचा बोलबाला दिसत असताना येथे मात्र उद्धव बाळासाहेब ठाकरे

मुंबई महापालिका निवडणूक निकालात काय घडले?

नार्वेकरांनी तिन्ही गड राखले मुंबई : कुलाबा विधानसभेत भाजपच्यावतीने विधानसभेचे अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर

उबाठा पहिल्यांदा बसणार मुंबईत विरोधी पक्षात

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून त्यामध्ये मागील २५