महापालिका निकालानंतर मुंबई काँग्रेसमध्ये नाराजीनाट्य - शहराध्यक्ष बदला; भाई जगताप यांनी केली वर्षा गायकवाडांच्या राजीनाम्याची मागणी

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीत २४ जागा राखून सर्वांनाच धक्का देणाऱ्या काँग्रेसमध्ये नवे नाराजीनाट्य सुरू झाले आहे. मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष आमदार भाई जगताप यांनी विद्यमान अध्यक्ष खा. वर्षा गायकवाड यांच्या विरोधात शड्डू ठोकला असून, त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.


वास्तविक महायुती आणि ठाकरेंमधील सत्तासंघर्षात काँग्रेसचा निभाव लागेल की नाही, याबाबत काँग्रेस नेत्यांच्या मनातच साशंकता होती. परंतु, काँग्रेसने २४ जागांपर्यंत मजल मारली आणि सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. त्यामुळे वर्षा गायकवाड स्वतःची पाठ थोपटून घेत असताना, भाई जगताप यांनी गायकवाड यांच्यामुळे पक्ष चांगली कामगिरी करू शकला नसल्याचा आरोप केला आहे. “मुंबईत अपेक्षित न मिळण्यास नेतृत्वच जबाबदार आहे. प्रभावी रणनीतीचा अभाव आणि कमकुवत संघटनेमुळे मुंबईत पक्षाची ताकद कमी झाली. मागील निवडणुकीच्या तुलनेत यावेळी पक्षाला जागा कमी मिळाल्या आहेत. या निकालांचे विश्लेषण केल्यास नेतृत्वातील त्रुटी स्पष्टपणे दिसतात. त्यामुळे वर्षा गायकवाड यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून पद सोडावे”, असे जगताप यांनी म्हटले आहे.



जगताप-गायकवाड यांच्यातील संघर्ष


या वादाला केवळ पालिका निवडणुकीतील पराभव नव्हे, तर पक्षांतर्गत संघर्षही कारणीभूत आहे. वर्षा गायकवाड यांच्या गळ्यात मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदाची माळ पडल्यापासून पक्षावर एकहाती वर्चस्व मिळवण्याच्या नादात त्यांनी अनेकांना दुखावले. प्रिया दत्त, संयज निरुपम, भाई जगताप, मिलिंद देवरा, अशी अनेक नावे सांगता येतील. भाई जगताप यांची खुर्ची काढून हायकमांडने गायकवाड यांना अध्यक्षपदावर बसवले. तेव्हापासून या दोघांमध्ये सुप्त संघर्ष सुरू झाला, तो आजतागायत कायम आहे.

Comments
Add Comment

Nashik : 9 कर्मचाऱ्यांवर वेतन कपातीची कारवाई, जि.प.सीईओंची सरप्राईज व्हिजीट

Nashik : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार (Chief Executive Officer Omkar Pawar) यांनी प्राथमिक शिक्षण विभागाची अचानक

Nashik : नैसर्गिक कीड नियंत्रणासाठी नाशिक जिल्ह्यात १० हजार पक्षी थांबे

Nashik : राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशनअंतर्गत नाशिक जिल्ह्यातील शेतकरी गटांच्या शेतावर जैविक व नैसर्गिक पद्धतीने

Prakash Abitkar : मिशन मोडवर १०० दिवसांचे आरोग्य अभियान राबवावे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश

तीस वर्षांचा पल्ला, तपासणी अन् सल्ला’ अभियानातून मधुमेह, उच्च रक्तदाब व कर्करोगाचे होणार निदान मुंबई : राज्यातील

सिगारेटच्या पाकिटावर लिहिलं देशभक्तीचं अमर गीत! लतादीदींनी सुरुवातीला दिला होता नकार; ‘ऐ मेरे वतन के लोगों’ची कहाणी थक्क करणारी

मुंबई : स्वातंत्र्यदिन जवळ आला की देशभक्तीच्या गाण्यांनी संपूर्ण देशाचं वातावरण भारून जातं. मात्र, ‘ऐ मेरे वतन के

Nashik FDA Raid : नाशिकच्या 'या' भागात अन्न व औषध प्रशासनाचा मोठा छापा, बनावट सोनपापडी, मिठाई व नमकीन जप्त

Nashik FDA Raid : नाशिकमध्ये अन्न व औषध प्रशासनाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. सणासुदीच्या काळात अन्नपदार्थांच्या

Sukhbir Singh Badal : सुखबीर सिंह बादल यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी मुख्यमंत्री फडणवीसांचे चौकशीचे आदेश

- हल्लेखोराला तातडीने अटक; मुख्यमंत्र्यांनी फोनवरून केली बादल यांच्या प्रकृतीची विचारपूस मुंबई : शिरोमणी अकाली