मनपा निवडणुकीच्या निकालानंतर कोल्हापुरात काँग्रेसला धक्का

गोकुळ दूध संघाचे माजी अध्यक्ष विश्वासराव पाटील यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश


उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश संपन्न


ठाणे :  कोल्हापूरमधील गोकुळ दूध संघाचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक विश्वासराव आबाजी पाटील यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षातील आपल्या असंख्य समर्थकांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेची ताकद अधिक वाढल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. सदरचा कार्यक्रम उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या ठाणे येथील निवासस्थानी पार पडला.


यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विश्वासराव पाटील आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे शिवसेनेत स्वागत करत भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. विश्वासराव पाटील यांचा सहकार क्षेत्रातील तसेच पक्ष संघटनात्मक कामाचा प्रदीर्घ अनुभव शिवसेनेसाठी मार्गदर्शक ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.


या पक्षप्रवेशात शिरोली दुमला गावचे सरपंच सचिन पाटील, हनुमान दूध संघ महेचे अध्यक्ष बुद्धिराज शंकर पाटील महेकर, यशवंत सहकारी बँक कुडित्रेचे संचालक नंदकुमार अण्णासाहेब पाटील, तसेच अनिल सोलापूरे, राहुल पाटील, एस. के. पाटील, माधव पाटील, सुनील पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा समावेश होता.


कार्यक्रमाला करवीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रदीप नरके हेही उपस्थित होते. या पक्षप्रवेशामुळे आगामी स्थानिक व विधानसभा राजकारणात शिवसेनेची भूमिका अधिक मजबूत होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

Comments
Add Comment

जे साथ देतील त्यांच्यासोबत, अन्यथा त्यांच्याशिवाय पुढे जाऊ!- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; राजकारणात कोणीही शत्रू नाही

मुंबई : “निवडणुका संपल्या, आता आमचा कोणीही शत्रू नाही. जे असतील, ते आमचे वैचारिक विरोधक आहेत. त्यामुळे मुंबईच्या

मुंबईच्या महापौरपदाबाबत कोणताही वाद नाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : मुंबईच्या महापौरपदाबाबत कोणताही वाद नाही महापौरपदाचा निर्णय एकनाथ शिंदे, मी आणि दोन्ही पक्षांचे वरिष्ठ

इंदापूरचे माजी नगराध्यक्ष प्रदीप गारटकर यांचा भाजपमध्ये प्रवेश

मुंबई : महापालिका निवडणुकीनंतर भाजपने आता जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीवर लक्ष केंद्रीत केले

राणेंचे घर तोडण्यापासून सुरुवात झाली, आता मातोश्री-२ ची वेळ!

मंत्री नितेश राणेंचा इशारा; ‘जय श्रीराम’चा जयघोष करीत मुंबईत आमचा महापौर विराजमान होणार मुंबई : “उद्धव ठाकरेंनी

महापालिका निकालानंतर मुंबई काँग्रेसमध्ये नाराजीनाट्य - शहराध्यक्ष बदला; भाई जगताप यांनी केली वर्षा गायकवाडांच्या राजीनाम्याची मागणी

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीत २४ जागा राखून सर्वांनाच धक्का देणाऱ्या काँग्रेसमध्ये नवे नाराजीनाट्य सुरू

महापालिका निवडणुकीनंतरच्या पहिल्या कॅबिनेटला दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची दांडी

मुंबई : राज्यातील महापालिका निवडणुकीनंतरच्या पहिल्या कॅबिनेट बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी दांडी